पुणे

खेवलकरच्या मोबाईलमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ

CD

पुणे, ता. ७ : खराडी येथील कथित ड्रग्ज पार्टी प्रकरणातील आरोपी प्रांजल खेवलकरच्या मोबाईलमधून आक्षेपार्ह अश्लील छायाचित्रे आणि व्हिडिओ सापडले आहेत. महिलांचे शोषण आणि मानवी तस्करीबाबत विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) सखोल चौकशी करावी, अशी मागणी पोलिस महासंचालकांकडे केली आहे, अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली.
चाकणकर म्हणाल्या, ‘‘खेवलकरच्या मोबाईलमधील ‘हिडन फोल्डर’मध्ये एक हजार ७४९ अश्लील छायाचित्रे आणि व्हिडिओ सापडले आहेत. यापैकी २३४ फोटो आणि १९ व्हिडिओ अत्यंत अश्लील स्वरूपाचे आहेत. काही महिलांना नशा देऊन विवस्त्र करून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचे पुरावे त्यात आहेत. चित्रपटात काम देण्याचे प्रलोभन दाखवून अत्याचार केला आहे. या अश्लील व्हिडिओंचा वापर महिलांना ब्लॅकमेल करण्यासाठीही केला आहे.’’
‘‘महिलांची मानवी तस्करी मोठ्या प्रमाणावर झाली आहे. परराज्यांत व्यापार करून लैंगिक शोषण करण्यात आले आहे. महिलांचे शोषण आणि महिलांच्या मानवी तस्करीबाबत ‘एसआयटी’मार्फत चौकशी करण्याबाबत पोलिस महासंचालकांना पत्र दिले आहे. पुणे, मुंबई, ठाणे शहरच नव्हे तर लोणावळा, साकीनाका, जळगाव आदी ठिकाणी ‘पार्टी’च्या नावाखाली हा सगळा प्रकार सुरू होता. यामागे एक रॅकेट कार्यरत असून, काही वर्षांपासून आरोपी एकमेकांच्या संपर्कात होते,’’ असेही त्यांनी सांगितले.
यावेळी माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसेंबाबत विचारले असता चाकणकर म्हणाल्या, ‘‘त्यांच्याबद्दल सहानुभूती वाटते. त्यांचे अनेक गैरसमज दूर झाले असतील. त्यांना काही सांगायचे असल्यास त्यांनी ते न्यायालयात मांडावे.’’

तक्रारकर्त्यांचे नाव गोपनीय ठेवणार
‘‘आरोपींनी २८ वेळा विविध ठिकाणी रूम्स बुक केल्याची माहिती मिळाली असून, त्यामुळे मोबाईलमधील डेटा, आर्थिक व्यवहार, ई-मेल्स व इतर डिजिटल पुराव्यांची तपासणी करावी. संबंधित हॉटेल व्यावसायिकांचीही चौकशी करावी. या प्रकरणात काही महिलांनी तक्रार दाखल केली आहे. इतरांनीही समोर येऊन तक्रार करावी. तक्रारकर्त्यांचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवून त्यांना सर्व कायदेशीर मदत दिली जाईल,’’ अशी ग्वाही चाकणकर यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Opening: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स 150 अंकांनी खाली, कोणते शेअर्स वाढले?

Pune Municipal Corporation : कोंढव्यातील आठमजली अनधिकृत इमारतीवर पुणे महापालिकेची धडक कारवाई

Baramati News : रेशीमकोषांची कोटीची उलाढाल; बारामती बाजार समितीत २२२ शेतकऱ्यांकडून २३ टनांची विक्री

Shalarth ID Scam: पुणे विभागीय आयुक्त करणार शालार्थ आयडीचा तपास; नव्या एसआयटीत पोलिस महानिरीक्षक, शिक्षण आयुक्तालयातील सहसंचालक

Latest Marathi News Updates : जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जाबाबत याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

SCROLL FOR NEXT