Cycle
Cycle 
पुणे

पर्यटकांना आता सायकल सवारी

सकाळवृत्तसेवा

कात्रज - स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या पुणे शहरातील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी नागरिकांना वाहनांऐवजी सायकल चालवण्यास प्रवृत्त करण्यारी सायकल योजना राजीव गांधी प्राणिसंग्रहालयातही येऊन पोचली आहे. प्राणिसंग्रहालयात मनमुराद फेरफटका मारण्यासाठी युलू ॲपवर चालणारी सुविधा शुक्रवारी सकाळी सुरू झाली. 

पिवळा पट्टेरी आणि पांढरा वाघ, हत्ती, अस्वलं, गवे, चिंकारा व निलगाईंसह विविध प्रजातींचे तब्बल चारशे वन्यजीव पक्षी, सरपटणारे प्राणी पाहण्यासाठी वर्षाकाठी अठरा लाखांहून अधिक पर्यटक राजीव गांधी प्राणिसंग्रहालयास भेट देतात. वर्षापूर्वी सिंहाची जोडी दाखल झाल्यानंतर तर पर्यटकांची संख्येत भर पडू लागली. प्राणिसंग्रहालयात बॅटरीवर धावणाऱ्या चार मोटारी अनेक वर्षे कार्यरत आहेत. 

सुटीत दिवसभरात येणाऱ्या आठ ते दहा हजार पर्यटकांच्या प्रमाणात बॅटरी वर चालणाऱ्या मोटारींची संख्या कमी पडत होती. परिणामी अनेक ज्येष्ठ पर्यटक, महिलांना दोन किलोमीटरची पायपीट करावी लागत होती.

नगरसेवक वसंत मोरे यांनी महापालिका आयुक्तांना स्मार्ट सिटीअंतर्गत सायकल योजनेतील सायकल उपक्रम प्राणिसंग्रहालयात सुरू करावा, अशी मागणी केली होती.

आयुक्तांनीही सकारात्मक 
प्रतिसाद दिला होता. या पार्श्वभूमीवर पन्नास युलू सायकली प्राणिसंग्रहालयात दाखल झाल्या आहेत. या उपक्रमाचा प्रारंभ नगरसेवक वसंत मोरे, पर्यावरण आधिकारी मंगेश दिघे, प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. राजकुमार जाधव, उपसंचालक डॉ. नवनाथ निघोट, जयंती गिरी उपस्थित होते. युलू बायसिकल्सचे शहर प्रमुख रितेश राठोड, गौरी घोष यांनी या योजनेची
माहिती दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covid 19 : कोविडची पहिली लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञावर चीनची मोठी कारवाई; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे केलं बरखास्त

Nashik Crime News : बेद टोळीचा शुटर बारक्याला पुण्यातून अटक! 3 महिन्यांपासून होता फरार; गुंडाविरोधी पथकाची कामगिरी

Nashik Traffic Problem: नियोजनाअभावी वाहतुकीचा बट्ट्याबोळ! उमेदवारी अर्जामुळे गर्दी; वाहतूक पोलिसांची तारांबळ

Modi Rally Pune: "एका अतृप्त आत्म्यानं महाराष्ट्रासह देशाला अस्थिरतेत लोटलं"; PM मोदींकडून नाव न घेता शरद पवारांवर घणाघाती टीका

Latest Marathi News Live Update : महायुती महाराष्ट्रातल्या विकासाचा अनुशेष भरुन काढेल- मोदी

SCROLL FOR NEXT