Traffic
Traffic 
पुणे

वाहतूक कोंडीतून आळंदीकरांची सुटका

विलास काटे

आळंदी - चऱ्होली खुर्द (ता. खेड) आणि चऱ्होली बुद्रुक (ता. हवेली) यांना जोडणारा ४५ मीटर रस्ता पूर्णत्वाकडे असल्यामुळे आळंदीची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. त्यामुळे पंधरा दिवसांवर आलेल्या कार्तिकी वारीत दरवर्षी असणारा वाहतूक नियंत्रणाचा पोलिसांवरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे.  

यात्रा कालावधीत दरवर्षी आळंदीतील वाहतूक बंद केली जाते. नगर रस्ता- मरकळ एमआयडीसीकडून येणारी वाहने धोनोरे फाटा येथे, सेल पिंपळगावकडून येणारी वाहने विश्रांतवड, चाकणकडून येणारी वाहने केळगाव- हनुमानवाडी येथील कारवा धर्मशाळा, मोशीकडून येणारी वाहने डुडुळगाव आणि पुण्याकडून येणारी वाहने चऱ्होली फाटा येथे थांबविली जातात. केवळ दिंड्यांची वाहने गावात सोडली जातात. स्थानिक भाजीपाला विक्रेते आणि दूध वाहतूक करणाऱ्या वाहनांना पास दिलेले असतात. त्यांनाच यात्रा काळात आळंदीत प्रवेश दिला जातो. त्यामुळे मरकळकडून येणाऱ्या वाहनचालकांना नगर रस्त्याने वाघोलीमार्गे, तर नाशिक महामार्गाने येणाऱ्या वाहनचालकांना चाकण-मोशीमार्गे पुण्यात जावे लागते. चिंबळी रस्त्यावरील वाहतूकही बंद केली जाते. मरकळ एमआयडीसीत जाणाऱ्या कामगारांच्या बस चऱ्होली बुद्रुकमार्गे सोडल्या जातात. यात्रा कालावधीत आळंदीतील नेहमीची वाहतूक बंद केली जाते. मात्र, यंदा चऱ्होली बुद्रुक येथील दाभाडे वस्तीतील रस्त्याचा पर्याय उपलब्ध होणार आहे. 

अपघातांचे प्रमाण घटणार
चऱ्होली बुद्रुक- दाभाडे वस्ती येथील रस्त्यामुळे आळंदीला बाह्यवळण मार्ग उपलब्ध झाला आहे. त्यामुळे सर्व अवजड वाहने नवीन रस्त्याने जातील. पर्यायाने आळंदीतील रहदारी कमी होऊन रस्तेही चांगले राहतील व नेहमी भेडसावणारा वाहतूक कोंडीचा प्रश्‍न सुटणार आहे. अवजड वाहतूक पर्यायी रस्त्याने गेल्यामुळे अपघाताचे प्रमाणही कमी होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

क्रिकेट विश्वात उडाली मोठी खळबळ! T20 World Cupवर दहशतवादी हल्ल्याचे संकट, पाकिस्तानमधून आली धमकी

ED Raid Video : झारखंडमध्ये ईडीची मोठी कारवाई; अनेक ठिकाणांवर मारली रेड, नोटांचा डोंगर बघून अधिकारीसुद्धा चक्रावले

Share Market Today: शेअर बाजारात नफा कमावण्याची मोठी संधी; आज 'या' 10 शेअर्सवर ठेवा लक्ष

Latest Marathi News Update : नाशिकच्या गंगापूर रोडवरील ICICI बँकेत चोरी

Nashik Crime News : बँकेच्या सेफ्टी लॉकरमधील 5 कोटींचे दागिन्यांवर डल्ला! घरफोडीचा गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT