mashine.jpg
mashine.jpg 
पुणे

नाशिक फाट्याजवळ पायलिंग मशीन कोसळल्यामुळे वाहतूक ठप्प

ज्ञानेश्वर बिजले

पिंपरी : नाशिकफाटा येथील दुहेरी उड्डाण पुलाजवळ वर्दळीच्या रस्त्यावर मेट्रोच्या पाया खोदण्यासाठी वापरण्यात येणारे पायलिंग मशीन आज दुपारी सव्वादोनच्या सुमाराला कोसळले. पीएमपीची बस थोडी पुढे गेलेली, तर पाठीमागून येणाऱ्या कारचालकाने जोरात ब्रेक दाबत गाडी जागीच थांबविल्यामुळे, या अपघातात वाहन अथवा व्यक्ती सापडली नाही. पुण्याकडून पिंपरीकडे येणाऱ्या मार्गावर काही टन वजनाची अवाढव्य मशीन कोसळल्यामुळे तेथील सर्व वाहतूक ठप्प झाली.

पुण्याकडून चौकाच्या दिशेने येणाऱ्या पुलाच्या उताराजवळ ही घटना घडली. पूल व सेवा रस्ता यांच्यामधील भागात मेट्रोने दोन्ही बाजूला लोखंडी बॅरीकेट लावून मशीनद्वारे पाया खोदण्याचे काम सुरू केले आहे. पायलिंगचे काम संपल्यानंतर मशीन पाठीमागे घेत असताना, ते कोसळले, असे महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. मशीन हळूहळू जमिनीच्या दिशेने आल्यामुळे पुलावरून येणाऱ्या वाहनचालकाला त्याची गाडी थांबविता आली, तर सिग्नल सुरू राहिल्यामुळे तेथील बसगाडी व अन्य वाहने पुढील बाजूला निघाली होती. त्यामुळे मशीनच्या खाली कोणतेही वाहन सापडले नाही, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. कामाच्या दृष्टीने आव्हानात्मक असलेल्या नाशिकफाटा परीसरात 31 खांब उभारण्यात येणार असून, त्या कामासाठी पाया खोदताना ही घटना घडली. येथील काम आणखी पाच-सहा महिने सुरू राहणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Car Accident : ''जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी घटनास्थळावर पोहोचलो अन्...'', आमदार टिंगरेंनी अपघाताबद्दल आरोपावर स्पष्टच सांगितलं

Beed Bogus Voting : ''बोगस वोटिंग प्रकरणात कठोर कारवाई करा'' बीडच्या प्रकरणात शरद पवारांनी घातलं लक्ष

Nashik Crime News: आयुक्तालय हद्दीत आचारसंहिता भंगचे 7 गुन्हे! विविध पोलीस ठाण्यांमध्ये अदखलपात्र गुन्हे दाखल

Julian Assange : 'विकीलिक्स'चे संस्थापक असांज यांना लंडनमधील कोर्टाचा मोठा दिलासा! प्रत्यार्पणाला देता येणार आव्हान

Nashik Lok Sabha Election 2024: ना पाण्याची सोय, ना उन्हापासून संरक्षण! मतदारांमध्ये तीव्र नाराजी; व्हिलचेअरमुळे दिलासा

SCROLL FOR NEXT