peth polis
peth polis 
पुणे

पोलिसांच्या या कामाला सॅल्यूट कराच...माळरानावर बहरणार नंदनवन

जयदीप हिरवे

सातगाव पठार (पुणे) : पुणे- नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील आळेफाटा महामार्ग पोलिस मदत केंद्रातील वाहतूक पोलिस वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन, जलसंधारण यांसारख्या कामातून आपल्या मातृभूमीची सेवा करत आहेत. उजाड माळरानावर तब्बल 151 प्रकारची झाडे लावून माळरानाचे नंदनवन करण्यासाठी पोलिस उपनिरीक्षक संजय सुतनासे यांच्यासह त्यांचे सहकारी प्रयत्न करत आहेत.

पेठ (ता. आंबेगाव) येथे पुणे- नाशिक राष्ट्रीय महामार्गावर अवसरी घाट वन उद्यानाजवळील डोंगरावर आळेफाटा महामार्ग पोलिसांचे मदत केंद्र आहे. या ठिकाणी झाडे अतिशय फारच कमी प्रमाणात होती. उन्हाळ्यात उन्हाच्या झळा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जाणवत होत्या. त्यामुळे पोलिस उपनिरीक्षक संजय सुतनासे यांनी आपल्या सहकाऱ्यांना या ठिकाणी झाडे लावू, असा विचार सांगितला. लगेचच सहकाऱ्यांनी होकार देताच मंचर वनविभाकडून 151 विविध प्रकारची झाडे त्यांनी मिळवली. यामध्ये चिंच, वड, आंबा, आवळा, लिंब, जांभूळ, निलगिरी, पिंपळ, बांबू, बेल, रामफळ आदी विविध प्रकारच्या झाडांचा समावेश आहे. 

झाडे मिळताच लगेचच स्वतः सर्वांनी श्रमदान करत डोंगरावर खड्डे घेत या खड्डयांमध्ये वृक्षरोपण केले. पावसाळ्याच्या सुरवातीलाच ही झाडे लावली, मात्र पाऊस झाला नाही. मग टँकरने पाणी आणून झाडांना पाणी दिले. भविष्यात परत या झाडांना पाणी कमी पडू नये, यासाठी येथे शेततळे देखील तयार केले. तसेच, सर्व झाडांना ठिबक सिंचनची सोय देखील करून ठेवली. त्यामुळे या झाडांना पाणी वेळेवर मिळणार आहे. या सर्व कामी पोलिस उपनिरीक्षक संजय सुतनासे यांना त्यांचे सहकारी दादासाहेब मोसे, बाळासाहेब सुरकुले, माणिक मांडगे, शंकर कोढरे, प्रकाश नेटके, पोलिस नाईक योगेश गायकवाड, संदीप सूर्यवंशी, अरुण उबाळे, विलास कोंढवळे व इतर सर्व कर्मचारी आदींनी सहकार्य केले.

सर्व प्रवाशांच्या सेवेसाठी आम्ही रस्त्यावर उभे राहून काम करत असतो. त्याचबरोबर वृक्षरोपण व वृक्षसंवर्धान ही काळाची गरज आहे. त्यामुळे आम्ही 151 झाडे लावत ती जगवण्याचा प्रयत्न करत आहोत. समाजातील प्रत्येक व्यक्तीने आपण निसर्गाचे काही तरी देणेकरी आहोत, या भावनेतून, कर्तव्यातून वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन करावे, असे मत पोलीस उपनिरीक्षक संजय सुतनासे यांनी व्यक्त केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

Rinku Singh T20 WC 2024 : रोहितला जास्त पर्याय... रिंकू सिंहला वगळण्याबाबत अजित आगरकर काय म्हणाला?

Water On Moon : चंद्रावर अपेक्षेपेक्षा जास्त पाण्याचे साठे.... इस्त्रोने केला मोठा खुलासा

T20 WC 2024 Team India Squad : हार्दिकला कॅप्टन्सीवरून का हटवलं...? आगरकर गडबडला अन् रोहितनं सावरलं

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसामुळे आसामच्या काही भागांमध्ये पूर

SCROLL FOR NEXT