न्यायालय केवळ तात्काळ प्रकरणांवर सुनावणी; पेंडिंग केसेसना होतोय उशीर

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 6 August 2020

गेल्या चार महिन्यांहून अधिक काळ अशाच पद्धतीने कामकाज सुरू आहे. लॉकडाउन काळात नव्याने दाखल होणाऱ्या प्रकरणांची संख्या कमी असली तरी त्यावर पूर्ण क्षमतेने सुनावणी होत नाही. आधीच मोठ्या प्रमाणात प्रलंबित असणाऱ्या दाव्यात आणखी वाढ होत आहे. त्यामुळे कामकाजाची वेळ आणि न्यायाधीशांची संख्या वाढविण्याची मागणी करणारे पत्र पीबीएने मुंबई उच्च न्यायालयाला पाठवले आहे, अशी माहिती असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. सतीश मुळीक यांनी दिली.

पुणे : लॉकडाऊनमुळे न्यायालयात केवळ तात्काळ प्रकरणांवर तेही फक्त एका शिफ्टमध्ये सुनावणी होत आहे. याचा परिणाम प्रलंबित खटल्यांवर होत असून न्याय मिळण्यास देखील उशीर होत आहे. त्यामुळे न्यायालयाच्या कामकाजाची वेळ वाढवण्यात यावी, अशी मागणी पुणे बार असोसिएशनने (पीबीए) उच्च न्यायालयात केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गेल्या चार महिन्यांहून अधिक काळ अशाच पद्धतीने कामकाज सुरू आहे. लॉकडाऊन काळात नव्याने दाखल होणाऱ्या प्रकरणांची संख्या कमी असली तरी त्यावर पूर्ण क्षमतेने सुनावणी होत नाही. आधीच मोठ्या प्रमाणात प्रलंबित असणार्‍या दाव्यात आणखी वाढ होत आहे. त्यामुळे कामकाजाची वेळ आणि न्यायाधीशांची संख्या वाढविण्याची मागणी करणारे पत्र पीबीएने मुंबई उच्च न्यायालयाला पाठवले आहे, अशी माहिती असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. सतीश मुळीक यांनी दिली. या पत्राबाबत माहिती देण्यासाठी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी पुणे जिल्हा न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश एन. पी. धोटे यांची भेट घेतली. कमी वेळ सुनावणी होत असल्याने त्याचा खटला व वकिलांवर काय परिणाम होत आहे, याची माहिती त्यांना दिली.

Video : मान-प्रसिद्धी देऊ शकत नाही दोनवेळची भाकर; कलाकारांवर आली बोंबिल-सुकट विकण्याची वेळ!

सर्व प्रकरणांची सुनावणी होत नसल्याने वकिलांच्या अडचणींमध्ये भर पडू लागली आहे. सरकारने अनलॉक प्रक्रियेत इतर उद्योग-धंदे सुरु करण्यास परवानगी दिली आहे. त्याप्रमाणे न्यायालयीन कामकाज वाढविण्याची मागणी त्यांच्याकडे केली. असोसिएशनतर्फे करण्यात आलेल्या मागणीबाबत मुंबई उच्च न्यायालयाला कळवणार असल्याचे न्यायाधीश धोटे यांनी पीबीएला सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PBA Request to High Court for extension of court hours