esakal | प्रत्येक बारामतीकराची आजपासून आरोग्य तपासणी होणार
sakal

बोलून बातमी शोधा

Every Baramati citizen will have a health check up from today

बारामती नगरपालिकेच्या 19 प्रभागातील सर्व नागरिकांची आजपासूनच आरोग्यतपासणी करण्यात येणार आहे. कोरोना सोबतच इतर साथजन्य आजार, किटकजन्य रोग व चिकूनगुनिया, डेंगी यावर प्रभावी नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. शहरातील सर्व नागरिकांची तपासणी व सर्वेक्षण करण्याचे काम आजपासून सुरु होणार आहे.​

प्रत्येक बारामतीकराची आजपासून आरोग्य तपासणी होणार

sakal_logo
By
मिलिंद संगई

बारामती : शहरातील कोरोना विषाणूचा संसर्ग व वाढता प्रादुर्भाव विचारात घेता यावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रत्येक बारामतीकर नागरिकांची आरोग्य तपासणी करण्याचा निर्णय बारामती नगरपालिकेने घेतला आहे. नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, उपनगराध्यक्षा तरन्नूम सय्यद, गटनेते सचिन सातव, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर व मुख्याधिकारी किरणराज यादव यांनी या बाबत माहिती दिली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बारामती नगरपालिकेच्या 19 प्रभागातील सर्व नागरिकांची आजपासूनच आरोग्यतपासणी करण्यात येणार आहे. कोरोना सोबतच इतर साथजन्य आजार, किटकजन्य रोग व चिकूनगुनिया, डेंगी यावर प्रभावी नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. शहरातील सर्व नागरिकांची तपासणी व सर्वेक्षण करण्याचे काम आजपासून सुरु होणार आहे. प्रत्येक प्रभागासाठी आशा स्वयंसेविका व नगरपालिका अधिकारी व कर्मचारी यांची टीम हे काम करणार आहे. 

हॉटेल-मॉल सुरू झाल्यानंतर शहरात कसं होतं वातावरण? वाचा सविस्तर

कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत असल्याने प्रशासन चिंतेत आहे. मृत्यूदरही वाढलेला असल्याने आता तोही आटोक्यात ठेवण्याचे आव्हान आहे. प्रत्येक प्रभागात संबंधित नगरसेवक या मोहिमेचे समन्वय नगरपालिका प्रशासनाच्या मदतीने करणार आहेत. या पथकामध्ये असलेल्या आशा स्वयंसेविका व इतर कर्मचारी मास स्क्रिनिंगमध्ये थर्मल स्कॅनिंग व पल्स ऑक्सिमीटरद्वारे तपासणी करुन नोंदी घेणार आहेत. 

Breaking : अखेर 'टीईटी'चा निकाल जाहीर; 'इतके' शिक्षक ठरले पात्र

दुसरीकडे प्रत्येक प्रभागामध्ये बारामती नगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने डेंगी होऊ नये या साठी धूरफवारणी करणार आहे. या बाबतचे सविस्तर नियोजन बारामती नगरपालिकेने केले असून आजपासूनच या तपासणीस प्रारंभ होईल. या नोंदीचा अहवाल उपमुख्याधिकारी पद्मश्री दाईंगडे व मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमंत नाझिरकर यांच्याकडे देण्यात येणार आहे. सर्वेक्षणामध्ये संशयित वाटणाऱ्या नागरिकांची तातडीने पुढील तपासणी केली जाणार आहे. बारामतीकरांनी या पथकातील कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.