Truck hit 5-6 vehicles in Accident near Navale bridge In Pune 
पुणे

पुण्यात पुन्हा विचित्र अपघात; नवले पुलाजवळ भरधाव ट्रकने 5-6 वाहनांना उडवले

सकाळवृत्तसेवा

पुणे :  पुणे शहरातील नवले पुलाजवळ भरधाव ट्रकने 5 ते 6 फोर-व्हिलर आणि टु-व्हिलरला धडक दिली आहे. या विचित्र अपघातात काही जण जखमी झाले असून जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे
 ► क्लिक करा

पुण्यातील कात्रज बायपास रोडवर नवले पुलाखाली आज सकाळी पुन्हा एकदा विचित्र अपघात घडला. अचानक ट्रकचा टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि भरधाव ट्रकने अक्षरशः वाहनांना चिरडले. भरधाव ट्रकने 5 ते 6 गाड्यांना जोराची धडक दिल्याने प्रंचड नुकसान झाले आहे.दरम्यान, अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

अपघातानंतर नवले पुलाजवळ वाहतूक कोंडी झाली होती, पोलिसांनी तात्काळ क्रेन लावून वाहने बाजुला हलविल्याने वाहतूक कोंडी सुरळीत झाली  आहे.

मागील महिन्यातच 6 ऑक्टोबरला असाच विचित्र अपघात नवले पुलाजवळ झाला होता. ब्रेक निकामी झाल्याने भरधा ट्रकने 10 ते 15 गाड्यांना उडविले होते. या अपघातात एकाचा मृत्यू झाला होता तर 4-5 जण जखमी झाले होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संगमनेरकरांना मोठा दिलासा! आमदार खताळ यांच्यामुळे भूखंड आरक्षणावर निघाला तोडगा

Pune Traffic Issue : वाहतूक अडथळ्यांच्या कारणांचा अहवाल सादर करा; आयुक्तांचा आदेश

Sachin Yadav: नीरजलाही मागे टाकणारा कोण आहे सचिन यादव? पोलिस भरतीनंतर भालाफेक सोडण्याचा केलेला विचार, पण...

Mamata Banerjee: ८४० कैदी तुरुंगातून मुक्त! विधानसभा निवडणुकीपूर्वी ममता बॅनर्जी यांचा निर्णय, नेमकं कारण काय?

Latest Maharashtra News Updates : प्राध्यापकाने केली विद्यार्थिनीची छेडखानी, तक्रार करुनही कारवाई नाही

SCROLL FOR NEXT