वैद्यकीय महाविद्यालायतील सहायक प्राध्यापकांचे सामुहिक रजा आंदोलन सुरू

Collective leave agitation of assistant professor in medical colleges started
Collective leave agitation of assistant professor in medical colleges startedesakal
Updated on

पुणे : राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये तात्पुरत्या नियुक्तीवर असलेल्या सहायक प्राध्यपकांनी सोमवारपासून बेमुदत सामुहिक रजा आंदोलन सुरू केले. राज्यातील साडेपाचशे सहायक प्राध्यापक यात सहभागी झाले आहेत.

राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये किमान साडेपाचशे सहायक प्राध्यापक तात्पुरत्या नियुक्तीवर कार्यरत आहेत. कोरोनाच्या उद्रेकातही या डॉक्टरांनी दिवस-रात्र रुग्णसेवा केली. या पदावर तात्पुरत्या नियुक्ती केलेल्यांना पूर्णवेळ सेवेत सहभागी करून घेण्याची मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे
 ► क्लिक करा

तात्पुत्या सेवेतील सहायक प्राध्यापकांना कायम स्वरुपी सरकारी सेवेत सहभागी करून घेण्याची सातत्याने मागणी करण्यात आली. त्याचा वारंवार पाठपुरावा करण्यात आला. मात्र, यावर कोणताही ठोस निर्णय सरकारने घेतला नाही. त्यामुळे हे आंदोलन पुकारण्यात आल्याचे बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील सहायक प्राध्यापक डॉ. नंदकुमार साळुखे यांनी दिली. 

तात्पुरत्या सहायक प्राध्यापक पदावर नियुक्त केलेल्यांची सेवा नियमित करून त्यांना कायमस्वरुपी शासकीय सेवेत सामाविष्ठ करावे. त्यांची सातव्या आयोगाप्रमाणे वेतननिश्चिती करावी, अशा प्रमुख मागण्या यात करण्यात आल्या आहेत. राज्यातील आरोग्याची स्थिती लक्षात घेऊन गेल्या महिन्यात 15 आणि 16 तारखेला काळ्या फिती लावून काम केले. या प्रतीकात्मक आंदोलनाची कोणतीही दखल सरकारी पातळीवर घेतली नाही. सरकारच्या या उदासिनतेमुळे येत्या सोमवारपासून राज्यातील सर्व अस्थायी सहायक प्राध्यापक सामुहिक रजा आंदोलन करत आहेत. हे आंदोलन बेमुदत असल्याचेही त्यांनी सांगितले.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com