criminals
criminals 
पुणे

खेड कोठडीतून दोन अट्टल आरोपींचे गज कापून पलायन

राजेंद्र सांडभोर

राजगुरूनगर - खेड पोलिसांच्या कोठडीत असलेल्या, दरोड्याच्या गुन्ह्यातील दोन अट्टल गुन्हेगारांनी कोठडीच्या खिडकीचे गज कापून पलायन कल्याची घटना आज पहाटे घडली. यावर्षी एप्रिल महिन्यात ट्रकचालकला कुऱ्हाडीचा धाक दाखवून लुटल्याच्या प्रकरणातील हे दोन आरोपी होते. 

विशाल दत्तात्रय तांदळे (वय २२, रा. मंचर, ता. आंबेगाव जि. पुणे) व राहुल देवराम गोयेकर (वय २६, रा. गोयेकरवाडी, ता. कर्जत, जि. अहमदनगर) अशी या दोन आरोपींची नावे आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी २३ एप्रिल रोजी रात्री पुणे नाशिक महामार्गावर शिरोली फाट्याजवळ रात्री एक ट्रक बंद पडला होता. त्या ट्रकचालकला या दोघांनी कुऱ्हाडीचा धाक दाखवून, १९ हजार रुपये व ऐवज लुटून नेला होता. त्यांच्यावर दरोड्याचा गुन्हा दाखल झाला होता. 

दरम्यान आळेफाटा येथील एका गुन्ह्यात त्यांना अटक झाली. त्यावेळी त्यांनी राजगुरूनगर येथे केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. त्यावरून त्यांना १६ ऑक्टोबर रोजी खेड पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आल्यावर १७ ऑक्टोबर रोजी खेड न्यायालयापुढे हजर करण्यात आले होते. न्यायालयाने प्रथम त्यांना तीन दिवस पोलीस कोठडी दिली. त्यानंतर २० ऑक्टोबर रोजी न्यायालयाने पुन्हा ३ दिवसांची पोलीस कोठडी दिली. ती आज (२२ ऑक्टोबर) संपणार होती. त्यांना खेड तहसील कार्यालयाजवळ असलेल्या दगडी कोठडीतील एका खोलीत अन्य चार आरोपींसोबत ठेवण्यात आले होते. आज पहाटे चार वाजण्याच्या पूर्वी खोलीच्या शौचालयाच्याजवळ असलेल्या खिडकीचे गज हेक्झा ब्लेडने कापून आणि खिडकीला लावलेल्या जाळ्या उचकटून त्यांनी कोठडीच्या मागच्या बाजूने पलायन केले. कोठडीच्या पहाऱ्यावरील पोलीसांना याचा  थांगपत्ताही लागला नाही. पहाटे चार वाजता पहाऱ्यावरील पोलीस बदलताना संबंधित त्याठिकाणी पाहण्यास गेला तेव्हा सोबतच्या एका आरोपीने दोन आरोपी पळून गेल्याचे सांगितले. पोलिसांनी कोठडीच्या मागच्या बाजूला जाऊन पहिले असता त्याठिकाणी विटा रचलेल्या दिसल्याने आरोपीच्या बाहेरच्या साथीदारांनी त्यांना पळून जाण्यास मदत केली असावी असा पोलिसांचा कयास आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SIT Raids : अश्‍लील व्हिडिओंच्या पेन ड्राईव्हप्रकरणी रेवण्णा पिता-पुत्रांच्या घरावर छापे; प्रज्वलच्या अटकेची तयारी, दहा वर्षे कारावास?

Latest Marathi News Live Update : साताऱ्यात आज दिग्गजांच्या तोफा धडाडणार; शरद पवार, मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात प्रचार सभा

Paneer Stuffed Chilla: विकेंडला बनवा पनीर स्टफ चिला, नोट करा रेसिपी

Sakal Podcast : काँग्रेसचा बालेकिल्ला असलेलं नंदुरबार यंदा कोण जिंकणार? ते देशासमोर पाण्याचे संकट

Daily Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष - 04 मे 2024

SCROLL FOR NEXT