Crime
Crime 
पुणे

'त्या' दोघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या; विविध ५५ गुन्हे केले कबूल!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : रात्रीच्यावेळी पायी जाणाऱ्या नागरिकांना अडवून चाकूचा धाक दाखवित लुबाडणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या युनिट चारच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून सात मोबाईलसह एक लाख रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला. 

वेंकटेश दत्ता तगारे (वय ३५, रा. मानाची बाग, रेल्वे स्थानकाजवळ, खडकी) आणि सनी सतीश गायकवाड (वय २७, रा. कामगार मैदान, मुंढवा) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील एका खासगी रुग्णालयात वॉर्डबॉय म्हणून काम करणारी एक व्यक्ती रुग्णालयातील काम संपवून एक ऑगस्टला रात्री वडगाव शेरी येथील त्यांच्या घरी पायी जात होते. ते गुंजन चित्रपटगृहाजवळ आले, त्यावेळी दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी त्यांना कुठे जायचे आहे, अशी विचारणा केली. त्यावेळी त्यांनी वडगाव शेरी येथे जायचे असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी नागरिकाला दुचाकीवर बसवून कल्याणीनगर येथे नेले. तेथे नेल्यानंतर त्यांच्या गळ्याला चाकू लावून त्यांच्याकडील रोख रक्कम आणि मोबाईल घेऊने ते निघून गेले. या प्रकारामुळे घाबरल्याने वॉर्डबॉयने नऊ ऑगस्ट रोजी येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. 

दरम्यान, या प्रकरणाचा तपास करणाऱ्या गुन्हे शाखेच्या युनीट चारचे पोलिस निरीक्षक अंजुम बागवान आणि पोलिस उपनिरीक्षक विजय झंझाड यांना पादचाऱ्यांना लुटणारे दोघेजण खडकी येथे असल्याची खबर मिळाली. तर पोलिस कर्मचारी सचिन ढवळे यांनी तांत्रिक विश्‍लेषणाद्वारे आरोपीचा माग काढला. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने खडकी परिसरात सापळा रचून आरोपीस अटक केली. त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर तगारे याने पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथे घरफोडी, जबरी चोरी आणि वाहनचोरीचे तब्बल ५५ गुन्हे केल्याचे स्पष्ट झाले. तर गायकवाड याच्याविरुद्ध मुंबई पोलिसांकडे विविध गुन्हे दाखल आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

IPL 2024 MI vs SRH Live Score: मुंबईला दुसऱ्याच षटकात मोठा धक्का! इशान किशन झाला आऊट

Hires Women to Seduce Men: पबमध्ये पुरुषांना भुरळ घालण्यासाठी महिलांची नियुक्ती; पोलिसांच्या छाप्यात धक्कादायक प्रकार उघड

Sunita Williams News : अभिमानास्पद! सुनीता विल्यम्स पुन्हा घेणार अंतराळात झेप; सोबत नेणार भगवद्‍गीता अन् 'ही' खास मूर्ती

SCROLL FOR NEXT