स्वयंघोषित विद्यार्थी प्रतिनिधी खरंच विद्यार्थ्यांचे प्रतिनिधित्व करतात का?

महेश जगताप 
Monday, 10 August 2020

कोरोनामुळे विद्यार्थी  अडचणीत आला असताना अनेक स्वयंघोषित विद्यार्थी प्रतिनिधींनी आगामी काळात होणाऱ्या आयोगाच्या परीक्षांबाबत मनमानी पद्धतीने  घेतलेल्या वेगवेगळ्या भूमिकेने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारा विद्यार्थी वर्ग बुचकाळ्यात पडला आहे.

पुणे : कोरोनामुळे विद्यार्थी  अडचणीत आला असताना अनेक स्वयंघोषित विद्यार्थी प्रतिनिधींनी आगामी काळात होणाऱ्या आयोगाच्या परीक्षांबाबत मनमानी पद्धतीने  घेतलेल्या वेगवेगळ्या भूमिकेने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारा विद्यार्थी वर्ग बुचकाळ्यात पडला आहे. त्यामुळे जे विद्यार्थी प्रतिनिधी परीक्षांबाबत भूमिका घेतात ते विद्यार्थी खरंच  प्रतिनिधित्व करतात का असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे.

खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठ्यात एवढ्या टक्क्यांनी वाढ

मार्चमध्ये भारतात आलेल्या कोरोनामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या नियोजित परीक्षेचे वेळापत्रक बदलावे लागले व या परीक्षा ऑक्‍टोबर व नोव्हेंबर महिन्यात घेण्याचे नियोजित करण्यात आले. पण अनेक स्वयंघोषित विद्यार्थी प्रतिनिधींनी या परीक्षा आणखी पुढे ढकलण्याची मागणी केली आहे.

त्याचबरोबर काही प्रतिनिधींनी या परीक्षा आहे त्या  नियोजित ठरलेल्या वेळेनुसारच घेण्यात याव्या अशी मागणी केली आहे. तर काहींची या परीक्षा ऑनलाइन घेण्यात याव्या अशी मागणी आहे. त्याचबरोबर काहींच्या मतानुसार ऑफलाईन परिक्षा घेतली तरी चालेल.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

त्यामुळे अनेक विद्यार्थी यांच्या मागणीवर नाराज झालेले आहेत. आज महाराष्ट्रात जवळ जवळ तीन लाख विद्यार्थी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा अभ्यास करीत आहेत. इतकी मोठी संख्या विद्यार्थी वर्गाची असताना, तुम्ही स्वतःला विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून घेता मग तुम्ही किती जणांना विचारून तुमची भूमिका मांडता असा प्रश्न विद्यार्थी वर्गाने उपस्थित केला आहे. या स्वयंघोषित विद्यार्थी प्रतिनिधींनी घेतलेल्या वेगवेगळ्या भूमिकेने विद्यार्थी मात्र संभ्रमावस्थेत पडलेला आहे.

महाराष्ट्रामध्ये जवळजवळ तीन लाख विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात. मग हे  स्वतःला विद्यार्थी प्रतिनिधी समजत असताना किती विद्यार्थ्यांना हे विचारून आपली भूमिका ठरवतात. यांना कोणी अधिकार दिला मनमानी पद्धतीने भूमिका ठरवण्याचा व विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळण्याचा. आमचा महाराष्ट्र लोकसेवा आयोगावर पूर्ण विश्वास आहे. आयोग योग्य तो निर्णय घेईल. विद्यार्थी वर्गापैकीच काही जणांनी वैयक्तिक गट स्थापन करून स्वतःच्या फायद्यासाठी अशा भूमिका घेत आहेत. त्याचा आम्ही तीव्रपणे विरोध करतो. अशी भूमिका सकाळ'शी बोलताना योगेश बाबर या विद्यार्थ्यांने व्यक्त केली.

हे विद्यार्थी प्रतिनिधी आपल्या सोयीनुसार भूमिका घेत असल्याने विद्यार्थी वर्गात अडचणी निर्माण झाल्या आहेत. नेमकी आपली पुढची दिशा काय असेल असा त्यांना प्रश्न पडला आहे. तुम्ही जरूर भूमिका घ्या पण विद्यार्थी वर्गाशी चर्चा करून तुम्ही निर्णय घेतला पाहिजे जेणेकरून विद्यार्थ्यांची दिशाभूल होता कामा नये व यामध्ये कोणतेही राजकारण झाले नाही पाहिजे अशी भूमिका नागेश मदनावे या विद्यार्थ्याने घेतली आहे.

हुश्श, पुण्यातील हे धरण भरणार

पुण्यातील क्लास चालक व या विद्यार्थी प्रतिनिधींच्या भूमिकेशी आमचा काडीमात्र संबध नाही. जे विद्यार्थ्यांना योग्य वाटते त्याच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे उभा राहू अशी भूमिका एका क्लासचालकाने व्यक्त केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Complaint of students studying for competitive examination regarding student representatives