Pune University
Pune University sakal
पुणे

Pune University : विद्यापीठात घुमतोय कबड्डीचा आवाज ; अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित स्पर्धेत ३२ संघ सहभागी

सकाळ वृत्तसेवा

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या खाशाबा जाधव क्रीडा संकुल ‘कबड्डी..कबड्डी..’ हा जोशपूर्ण आवाज घुमतोय. विद्यापीठाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित स्पर्धेत पुण्यासह नगर आणि नाशिक जिल्ह्यातील ३२ संघ एक एकमेकांसमोर उभे ठाकले असून, जेतेपदावर नाव कोरण्यासाठी सज्ज झाले आहेत.

मंगळवारी स्पर्धेचे उद््घाटन अर्जुन पुरस्कार विजेते कबड्डीपटू शांताराम जाधव यांच्या हस्ते झाले. या वेळी कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू प्रा. डॉ. पराग काळकर, प्रभारी कुलसचिव प्रा. डॉ. विजय खरे उपस्थित होते. ‘कबड्डी खेळासाठी शारीरिक क्षमता असणे गरजेचे आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या शारीरिक बळकटीसाठी नेहमी प्रयत्न करावेत. मेहनत करावी,’ असा सल्ला जाधव यांनी दिला. ते म्हणाले, ‘‘आधुनिक काळात कबड्डीचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाला आहे. नोकरी, पैसा मिळतो म्हणून नव्हे तर खेळाचा आनंद लुटण्यासाठी खेळा. यश आपोआप मिळेल.’’

प्रा. डॉ. गोसावी म्हणाले, ‘‘कबड्डी खेळात समयसूचकता खूप महत्त्वाची आहे. बुद्धीच्या आणि ताकदीच्या बळावर अतिशय चपळतेने खेळल्या जाणाऱ्या या खेळासाठी विद्यार्थ्यांनी अधिक मेहनत घ्यावी. कारण नवीन शैक्षणिक धोरणामध्ये खेळनिवडीचे स्वातंत्र्य असल्यामुळे विविध खेळांमध्ये विद्यार्थ्याचे करिअर घडविण्यासाठी निश्चितच मदत होणार आहे.’’

अमृत महोत्सव समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र विखे पाटील, प्रा. संदीप पालवे, प्रा. डॉ. धोंडिराम पवार, अशोक सावंत यांच्या संकल्पनेतून स्पर्धेचे आयोजन केले आहे. क्रीडा समिती अंतर्गत आंतरमहाविद्यालयीन कबड्डी स्पर्धेतून प्रथम चार आलेल्या उत्कृष्ट मुलांचे व मुलींचे असे एकूण १६ मुलांचे व १६ मुलींचे संघ स्पर्धेत सहभागी झाले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार विजेत्या डॉ. शोभा शिंदे उपस्थित होत्या. डॉ. शांताराम ढमाले व डॉ. विद्या पठारे यांनी सूत्रसंचालन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ebrahim Raisi Death: इराणच्या राष्ट्राध्यक्षांच्या हेलिकॉप्टर अपघातामागे षडयंत्र आहे का, नेमकं काय घडलं? इस्रायलच्या भूमिकेबाबत मोठा दावा!

Rohit Sharma : क्रिकेटपटूंची गोपनीयता जपा! ; मुंबई इंडियन्सचा खेळाडू रोहित शर्मा आयपीएल ब्रॉडकास्टरवर भडकला

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील १३ मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.३३ टक्के मतदान

Kalyan News: देशाच्या विकासासाठी मतदार महायुतीच्याच बाजूने, विश्वनाथ भोईरांचे वक्तव्य

Akshay Kumar : अक्षयचा दिलदारपणा; जॉली एलएलबीचं शूटिंग पूर्ण होताच केली 500 मुलींना मदत

SCROLL FOR NEXT