पुणे

बाजारपेठांना चढला व्हॅलेंटाइनचा रंग

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - प्रेमीयुगुलांचा आवडता असलेला ‘व्हॅलेंटाइन डे’ काही दिवसांवर येऊन ठेपला असल्याने बाजारपेठांना गुलाबी रंग चढू लागला आहे. शहरातील भेटवस्तूंची दुकाने गुलाबी रंगात न्हाऊन निघाली आहेत. बाजारपेठा हार्टशेप, मून कपल, टेडीकपल बिअर, लायटिंग टेडी, लॅक पिलो, कलर चेंजिंग हार्ट आदी विविध भेटवस्तूंनी फुलल्या आहेत. 

यासाठी चॉकलेटचे नवीन प्रकार, शुभेच्छा पत्रे, टेडीबिअर, विविध आकर्षक भेटवस्तू आदी दुकानांमध्ये पाहावयास मिळत आहेत. अगदी १० रुपयांपासून एक हजार रुपयांपर्यंत मराठी व इंग्रजी शुभेच्छा पत्रे, २० ते ५०० रुपयांपर्यंतची विविध प्रकारचे चॉकलेट दुकानांमध्ये मिळत आहेत. या वस्तूही लाल रंगाच्या आकर्षक वेष्टणात मिळत आहेत. लाल रंगातून सिल्व्हर रंगात बदलणारे कलर चेजिंग हार्ट, झोक्‍यात चंद्रावर बसलेले कपल या भेटवस्तूंना अधिक मागणी असल्याचे भावना व्हरायटीचे मालक विकी सचवानी यांनी सांगितले.

भेटवस्तू  किमती (रुपयांत)
मून कपल स्टॅच्यू    ४०० ते ९००
लायटिंग टेडी    १०० ते ५००
कलर चेंजिग हार्ट    ४००
लॅक पिलो    ४०० ते ६००
कपल टेडीबिअर    ५०० ते ११००
हार्टशेप गिफ्ट बॉक्‍स    १५० ते ३५०
पेअर लव्ह पीस कप    २०० ते ६००
युनिक फोटो फ्रेम    ५०० रुपयांपर्यंत
ग्रीटिंग    ४० ते ६५०
पेपर बॅग    ३० ते २५०
टेडी विविध आकार    १०० ते २२००

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: ट्रम्प बॉक्सर अन् टी-शर्टवर आले, निरोध देखील वापरला नाही; पॉर्न स्टारने केले अनेक खुलासे

Air India Express: एअर इंडिया एक्स्प्रेसची 70 उड्डाणे रद्द; 300 कर्मचारी सुट्टीवर, काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Live Update : एअर इंडियाची ७० हून अधिक उड्डाणे रद्द

Sharad Pawar: प्रादेशिक पक्ष भविष्यात काँग्रेसमध्ये विलिन होणार? शरद पवारांचे मोठे भाकित, राष्ट्रवादी बद्दल देखील दिले संकेत 

Met Gala 2024 : अरबपती सुधा रेड्डीच्या ड्रेसपेक्षा नेकलेसचीच जास्त हवा, 180 कॅरेटच्या डायमंड नेकलेसने सर्वांचंच वेधलं लक्ष

SCROLL FOR NEXT