NCP
NCP 
पुणे

कोलते, टेकवडे यांची राष्ट्रवादीत ‘घरवापसी’

सकाळवृत्तसेवा

सासवड - पुरंदर तालुक्‍यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीपासून पक्षापासून दुरावलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विजय कोलते आणि माजी आमदार अशोक टेकवडे यांची दीड वर्षांनंतर ‘घरवापसी’ झाली आहे.  

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत बेलसर-माळशिरस गटातून सुदाम इंगळे यांना राष्ट्रवादीची उमेदवारी देण्याच्या नाराजीतून कोलते यांनी थेट थोरले व धाकट्यासाहेबांना लेखी पत्र दिले होते. मुलगा गौरव कोलते किंवा अन्य नव्याला उमेदवारी द्या. पण, बदल करा, असे त्यांनी म्हटले होते. मात्र, इंगळे हेच उमेदवार असल्याने त्या वेळी कोलते त्या गटात फिरकलेच नाही. टेकवडे यांनीही पक्षनेतृत्वाकडे त्या वेळी नव्यांना उमेदवारीची मागणी केली होती. ते नेतृत्वाने ऐकले नाही व संबंधित उमेदवारांचा पराभव झाला.

तालुक्‍यात राष्ट्रवादीचा भोपळाही फुटला नाही. त्यामुळे पक्षातील वजनदारांनी टेकवडे व कोलते यांना पक्षाच्या कार्यक्रमांना बोलविणे बंद केले. जणू अघोषित हकालपट्टी झाल्याचे चित्र होते. वर्षभरानंतर कोलते हे पक्षाच्या कार्यक्रमांना हळूहळू डोकावू लागले.

मात्र, पक्षातील नेते त्यांच्यापासून चार हात दूरच राहत होते. रयत संस्थेतूनही कोलते यांना वगळूनही रागच व्यक्त झाला. त्यांच्या सूनबाई रश्‍मी बागल-कोलते यांच्या करमाळ्यातील बस्तानासाठी ते दुसऱ्या पक्षाकडे गेले नाहीत. टेकवडे हे राष्ट्रवादीच्या वर्तुळात फिरकतही नव्हते. ते भाजपच्या संपर्कात गेल्याची मात्र वावटळ उठली होती.

कार्यक्रमांना हजेरी
लोकसभा निवडणुका जवळ आल्याने आणि पक्ष वाढवा, असा संदेश थोरल्यासाहेबांनी मध्यंतरी दिल्याची चर्चा आहे. त्याचाच परिणाम म्हणून की काय, तीन आठवड्यांपूर्वी कोलते यांना पक्षाच्या प्रवक्तेपदी नेमले. तसेच, या आठवड्यात पुण्यात पक्षाच्या कार्यकारिणीच्या बैठकीला कोलते व नव्याने टेकवडे यांना पक्षनेतृत्वाने बोलविले. तसेच, भाषणात त्यांच्या उपस्थितीची नोंद घेत योग्य स्थान दिले. त्यातून दीड वर्षांनंतर दोघांची पुरंदरच्या पक्ष संघटनेत ‘घरवापसी‘ झाली. आता दोघेही खुशीत अधिकृतपणे पक्षाच्या कार्यक्रमात नुकतेच येऊ लागले आहेत.

मला प्रवक्तेपदाची संधी दिली. तिथेच माझा पक्षापासूनच दुरावा अधिकृतपणे संपला. पक्ष बैठकीत अजितदादा पवार जाहीरपणे म्हणाले, ‘‘कोलते कुठेही जाणार नाहीत, ते पवारसाहेबांच्या जवळचे आहेत. रश्‍मीदीदींच्या शपथेवर ते पक्षासाठीच झटतील.’’  माझेही हेच म्हणणे आहे, मी पवारसाहेबांचाच आहे. 
 - विजय कोलते

सूचनेची दखल न घेतल्याने मी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीपासून पक्षापासून दूरच होतो. त्याला हकालपट्टी किंवा कोणी काहीही नाव ठेवेल. वेळ मिळाल्यामुळे माझा व्यवसाय, पतसंस्था, दूधधंदा मी वाढविला. आता पक्षनेतृत्वाने दखल घेऊन नुकतेच पक्ष बैठकीत बोलविले व मीही मग अधिकृतपणे गेलो. त्यामुळे पुन्हा जोमाने काम करू. टेकवडे कुटुंबीय हे पवार कुटुंबीयांपासून दूर जाऊच शकत नाही. 
 - अशोक टेकवडे

काम करताना चुका होतात. मात्र, कोलते व टेकवडे यांच्याबाबतीत वरिष्ठ नेत्यांनीच चुका पोटात घातल्या. त्यामुळे आम्हालाही झालेला निर्णय मान्य आहे. आता राष्ट्रवादीचा आमदार करण्यासाठी दोन्ही नेत्यांनी सर्वांबरोबर आवाहन स्वीकारावे. 
 - माणिक झेंडे, अध्यक्ष, पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदेंचा दणका; अंबरनाथचे काँग्रेस शहराध्यक्ष प्रदीप पाटील यांचा 7 माजी नगरसेवकांसह शिवसेनेत प्रवेश!

Share Market Today: जागतिक बाजारातून सकारात्मक संकेत; आज कोणते 10 शेअर्स असतील ॲक्शनमध्ये?

Irrfan Khan: जेव्हा राजेश खन्ना यांच्या घरी AC दुरुस्त करायला गेला होता इरफान खान; हा किस्सा माहितीये का?

Besan Pohe Cutlet : सकाळच्या नाश्त्यामध्ये बनवा चवदार बेसन पोहे कटलेट, वाचा सोपी रेसिपी

Amit Shah Fake Video: अमित शाहांच्या Edited व्हिडिओबाबत दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, गृहमंत्रालयाच्या तक्रारीवरून FIR दाखल

SCROLL FOR NEXT