violations of rules by 260 PMPML drivers in single week pune marathi news
violations of rules by 260 PMPML drivers in single week pune marathi news Sakal
पुणे

Pune PMPML : एकाच आठवड्यात २६० पीएमपी चालकांकडून नियमांचे उल्लंघन

सकाळ वृत्तसेवा

पुणे : वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बेशिस्त पीएमपी आणि एसटी बसचालकांवर वाहतूक शाखेने विशेष मोहीम राबवून कारवाई केली. केवळ एकाच आठवड्यात २६० पीएमपी बसचालकांनी नियमांचे उल्लंघन केल्याचे समोर आले आहे.

पीएमपी आणि एसटी बसचालकांकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन केले जात आहे. अशा बसचालकांमुळे नागरिकांचा जीव धोक्यात येत आहे. शहर वाहतूक शाखेकडून दोन ते आठ ऑक्टोबर या कालावधीत विशेष मोहीम राबविण्यात आली.

त्यात २६० पीएमपी बसचालक आणि ५१ एसटी बसचालकांवर कारवाई करण्यात आली. रहदारीस अडथळा निर्माण करणे, बस थांब्यावर न थांबता रस्त्याच्या मध्यभागी बस थांबवणे, झेब्रा क्रॉसिंगवर थांबणे आणि सिग्नलचे उल्लंघन करून धोकादायक पद्धतीने बस चालविल्याप्रकरणी त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

काही पीएमपी बसचालकांकडून बेदरकारपणे बस चालवत असल्याच्या घटना घडत आहेत. याबाबत बसचालकांचे समुपदेशन करण्यात आले.

तसेच, पीएमपीच्या वरिष्ठांना लेखी कळविण्यात आले आहे. नागरिकांचा जीव धोक्यात घालणाऱ्या बसचालकांबाबत मुलाहिजा बाळगला जाणार नाही. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बसचालकांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

- विजयकुमार मगर, पोलिस उपायुक्त, शहर वाहतूक शाखा

बसचालकांवरील कारवाई

(२ ऑक्टोबर ते २१ ऑक्टोबर २०२३)

  • पीएमपी बसचालक ३२५

  • एसटी बसचालक ११०

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Accident: कोल्हापुरातील रस्त्यावर घडला 'कॅरम बोर्ड'सारखा थरार! भरधाव कारनं दुचाकींना उडवलं, तिघांचा मृत्यू; व्हिडिओ व्हायरल

Market Cap: सेन्सेक्स ऐतिहासिक उच्चांकावर; बीएसई कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये 14 लाख कोटींची भर

Wayanad Lok Sabha Election Results: काँग्रेससाठी सुरक्षित मानल्या जाणाऱ्या वायनाडमध्ये राहुल गांधींना धक्का?

"BJP ने आपल्याच समर्थकांना हिंसक बनवले," माजी मुख्यमंत्र्याच्या धक्कादायक आरोपांमुळे देशभरात खळबळ

पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याबद्दल नागपूरच्या निशांत अग्रवालला जन्मठेपेची शिक्षा

SCROLL FOR NEXT