Volunteers play important role reducing corona in country Anurag Thakur pune
Volunteers play important role reducing corona in country Anurag Thakur pune ESAKAL
पुणे

देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यात स्वयंसेवकांनी बजावली महत्त्वपूर्ण भूमिका - अनुराग ठाकूर

सकाळ वृत्तसेवा

पुणे : ‘‘देशातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे. मास्क निर्मिती, आणि त्यांचे मोफत वितरण, सॅनिटायझरची निर्मिती, रक्तदान आणि प्लाझ्मादान मोहिम अशा राष्ट्रीय सेवा योजनेच्या विविध समाजपयोगी उपक्रमांमुळे देश कोरोनाचा संसर्ग रोखण्यास मदत झाली,’’ असे कौतुकोद्गार केंद्रीय युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी काढले.

देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना (रासेयो) विभागाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ठाकूर बोलत होते. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. कारभारी काळे, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, विविध योजना उपक्रम समन्वय समितीचे अध्यक्ष राजेश पांडे, व्यवस्थापन परिषदेच्या सदस्या सुनेत्रा पवार, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. प्रभाकर देसाई आणि स्वयंसेवक आणि कार्यक्रम अधिकारी उपस्थित होते. ठाकूर म्हणाले,‘‘देशाचे सेवक म्हणून काम करण्याचा आनंद हा सर्वश्रेष्ठ आहे. हा आनंद प्रत्येक स्वयंसेवकाला मिळत असतो. देशाला विश्वगुरु करण्यासाठी युवकांची भूमिका महत्वपूर्ण राहणार आहे.’’

यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी आपली मते मांडली. शासनाच्या विविध योजनांचा थेट फायदा या योजनेतील स्वयंसेवकांना व्हावा, यासाठी काही उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्वयंसेवकांनी यावेळी केली. विभागाने केलेल्या कामाचा अहवाल चित्रफितीद्वारे यावेळी दाखविण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विभागाचे संचालक डॉ. प्रभाकर देसाई यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पूंछमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचे फोटो समोर, पाकिस्तानशी थेट कनेक्शनची शक्यता

High Court : ''मुस्लिमांना लिव्ह-इन-रिलेशनशीपमध्ये राहण्याचा अधिकार नाही'', हायकोर्टाने नेमकं काय म्हटलं?

Pankaja Munde Audio: "पंकजा मुंडेंच्या ऑडिओ क्लीपची चौकशी करा"; बजरंग सोनावणेंची निवडणूक आयोगाकडं मागणी

T20 World Cup 2024: भारतात वर्ल्ड कप सामने पाहाता येणार फ्री! पण कोणाला आणि कसे घ्या जाणून

Latest Marathi News Live Update : गोल्डी ब्रार अन् लॉरेन्स बिस्नोई सिंडिकेटच्या गुन्हेगारी मॉड्यूलच्या विरोधात मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT