WDL26B02671
वडाळा (ता. मोहोळ) : शाळा सुटल्यानंतर शिरापूरहून मोरवंचीकडेकडे चालत जाणाऱ्या विद्यार्थिनी.
वडाळा-मोहोळ मार्गावर प्रवाशांचे हाल, विद्यार्थ्यांची पायपीट
.........
खासगी वाहनातून जीवघेणा प्रवास करण्याची वेळ; एसटी महामंडळाकडून टाळाटाळ
.........
वडाळा, ता. १ : मोहोळ येथे शाळेला जाणारे विद्यार्थी गेल्या आठ महिन्यांपासून एसटी बस सुरू होईल या आशेवर आहेत. शैक्षणिक वर्ष संपत आले तरी एसटी महामंडळाने बस उपलब्ध नसल्याचे कारण सांगून टाळाटाळ केली आहे. यामुळे मोहोळ येथे शिक्षणासाठी जाणारे रानमसले, मोरवंची, शिरापूर येथील विद्यार्थी खासगी वाहनातून जीवघेणा प्रवास करीत आहेत. मोरवंची येथील मुले-मुली तर शिरापूर येथे दररोज चालत पायपीट करत आहेत. यामुळे किशोरवयीन मुलींना च्या बाबतीत काही घातपात, दुर्दैवी घटना घडल्यास यास कोण जबाबदार असा सवाल विचारला जात आहे. रानमसले येथील वीस ते पंचवीस व मोरवंची, शिरापूर येथील ३५ ते ४० विद्यार्थी दररोज मोहोळ येथे शिक्षणासाठी जातात. तसेच या मार्गावर प्रवासी संख्या ही आहे. मात्र जादा प्रवास भाडे देऊन खासगी वाहनातून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. याबाबत रानमसले ग्रामपंचायतच्या वतीने विभाग नियंत्रक त्यांच्याकडे रीतसर एसटी बस सुरू करण्याची मागणी केली आहे. याची दखल घेऊन विभाग नियंत्रक यांनी ११ नोव्हेंबर २०२५ रोजी सोलापूर व्यवस्थापक यांना एसटी बस सुरू करण्याचे पत्रही दिले. मात्र आगार व्यवस्थापक कडून एसटी बस कमी असल्याचे कारण सांगत टाळाटाळ केली जात आहेत.
चौकट
खासदारांच्या पत्राला केराची टोपली
खासदार प्रणिती शिंदे यांनी मोहोळ-गोटेवाडी या मार्गावरही एसटी बस सुरु करण्यासाठी विभाग नियंत्रक पत्र दिले होते. विभाग नियंत्रकांनी संबंधित आगार व्यवस्थापकाला एसटी बस सुरू करण्यासाठी आदेश दिले आहेत. याबाबत खासदारांना कार्यवाही केल्याचे पत्रही पाठविले. मात्र प्रत्यक्षात मोहोळ-गोटेवाडी एसटी सुरूच नाही. खासदार शिंदे यांच्या पत्रालाही एसटी महामंडळाकडून केराची टोपली दाखविली आहे. तसेच रानमसले ग्रामपंचायत ने मागणी केलेली वडाळा-मोहोळ एसटी बस सुरूच केली नाही. यामुळे एसटी महामंडळाच्या कारभार कागदी घोडे नाचविण्यात चालला आहे. यावरून स्पष्ट होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.