Cyber Crime
Cyber Crime esakal
पुणे

Cyber Crime : वाघोलीकरांना २५ दिवसात सायबर चोरट्यांनी घातला ८८ लाखांना गंडा

सकाळ वृत्तसेवा

वाघोली - वाघोलीतील ३२ वर्षीय तरुणाला मेसेज करून ऑनलाईन टास्क द्वारे पैसे कमाविण्याचे आमिष दाखवत १५ लाख रुपायांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अनोळखी इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 25 दिवसात सायबर चोरट्यांनी वाघोलीतील आठ नागरिकांना ८८ लाख २९ हजार रुपयांचा गंडा घातला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, तरुणाला ऑनलाईन टास्क जॉबवर मोठ्या प्रमाणात फायदा होईल असे आमिष दाखविण्यात आले. टेलिग्राम अॅपवर ऑनलाईन टास्क द्वारे पैसे विविध बँक खात्यात भरण्यास सांगितले. तरुणाने १४ लाख ९९ हजार रुपये भरल्यानंतरही परतावा मिळाला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पोलिसात धाव घेतली व लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सायबर चोरीचे दररोज अनेक गुन्हे घडत आहेत. तरी नागरिक सायबर चोरट्यांच्या अमिषाला बळी पडतात. झटक्यात पैसे कमविण्याचे प्रलोभन नागरिकाना महागात पडत आहे. मागील २५ दिवसात वाघोलीतील नागरिकाना सुमारे ८८ लाख रुपायांचा गंडा सायबर चोरट्यानी घातला. काही जणांची तर लाखो रुपायांची फसवणुक झाली आहे.

असा आहे घटनाक्रम व फसवणूक

  • २१ मार्च -- महिलेची अडीच लाख रुपयांची फसवणूक

  • २२ मार्च -- एका व्यवस्थापकाची दीड लाख रुपयांची फसवणूक

  • २२ मार्च -- महिलेची एक लाख ३५ हजारांची फसवणूक

  • २४ मार्च -- तरुणाला ९४ हजारांचा गंडा

  • २६ मार्च -- ४३ वर्षीय व्यक्तीला ४५ लाख रुपयांचा गंडा.

  • ३० मार्च -- ३२ वर्षीय व्यक्तीला १२ लाखांचा गंडा

  • १० एप्रिल -- तरुणाला १० लाखांचा गंडा.

  • १२ एप्रिल -- तरुणाला १५ लाख रुपयांचा गंडा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ebrahim Raisi: हेलिकॉप्टर अपघातात इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्यासह परराष्ट्र मंत्र्याचा मृत्यू- रिपोर्ट

Shivam Dube : शिवम दुबेला लागले ग्रहण... T20 World Cupसाठी संघात निवड झाल्यानंतर 5 सामन्यात केल्या फक्त इतक्या धावा

Masala Omelette Recipe : नाश्त्यामध्ये झटपट बनवा मसाला ऑम्लेट, चवदारही लागणार अन् पोटही भरणार.!

Stock Market: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शेअर बाजार कसा असेल? पंतप्रधान मोदींनी वर्तवले भाकित

Maharashtra Lok Sabha Phase 5 Election : पाचव्या टप्प्यात 49 जागांवर मतदान! राजनाथ सिंह, राहुल गांधींसह अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

SCROLL FOR NEXT