पुणे

कास - नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने 31 टन कचरा हद्दपार...

CD

जिल्ह्यात श्री सदस्यांकडून ३१ टन कचरा गोळा

डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचा पुढाकार, बाजारपेठा, रस्ता परिसरासह विविध शासकीय कार्यालयांची स्वच्छता

कास, ता. ३ ः डॉ. नानासाहेब  धर्माधिकारी  प्रतिष्ठान (रेवदंडा, ता. अलिबाग) यांच्या वतीने ज्येष्ठ निरूपणकार महाराष्ट्र भूषण  डॉ. नानासाहेब  धर्माधिकारी  यांच्या जयंतीनिमित्त रविवारी संपूर्ण जिल्ह्यात सातारा, मेढा, औंध, वाई, चाफळ या पाच ठिकाणी २३४७ श्रीसदस्य व लोकसहभागातून ३१ टन ४०० किलोग्रॅम कचरा हद्दपार करत ५९ हजार ९४४ स्क्वेअर मीटर परिसर स्वच्छता, तसेच ३१.१ किलोमीटर लांबीचा दुतर्फा रस्ता परिसरात महास्वच्छता अभियान राबविण्यात आले.
मोळाचा ओढा ते नुने (ता. सातारा) स्वच्छता अभियानप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य सर्जेराव सावंत, पंचायत समिती सदस्य महेश गाडे, नगरसेविका शारदा वाघमोडे, ग्रामसेविका ए. व्ही. दीक्षित, नारायण चव्हाण, सचिव राजाराम कोरडे, सदस्य रमेश वरबडे, सुनील भिसे, कपिल ढोले, सर्जेराव शेलार, सूर्यकांत बोराटे, रूपेश धुमाळ, संताजी घागरे, नागरीक सहभागी होते. श्रीराम मंदिर चाफळ (ता. पाटण) येथे प्रांताधिकारी सोपान टोंपे, पंचायत समिती सदस्य राधिका पाटील, मंडलाधिकारी रंगनाथ असवले, श्रीराम देवस्थान ट्रस्ट व्यवस्थापक अरुण गायकवाड, सदस्य लक्ष्मण बाबर, अनिल साळुंखे, चाफळचे तंटामुक्ती अध्यक्ष विनोद साळुंखे, माजी सरपंच आशिष पवार, तलाठी संजय दुधगावकर, सातारा जिल्हा एअर फोर्स असोसिएशनचे अध्यक्ष दत्तात्रय सुतार उपस्थित होते. औंध येथे विश्वस्त शिक्षण मंडळ औंधचे हणमंत शिंदे, अंकुश गोरे, आश्रम शाळा औंध चेअरमन राजाराम देशमुख, पंचायत समिती सदस्य शुभम शिंदे, माजी ग्रामपंचायत सदस्य तानाजी इंगळे, वसंत पवार, माजी उपसरपंच दीपक नलावडे, विकास सोसायटी औंधचे अध्यक्ष उद्धव माने, संतोष शिंदे, आजी-माजी सैनिक संघटना औंधचे अध्यक्ष जयसिंग घार्गे, उद्योजक दीपक मांडवे, उमेश शिंदे, रामचंद्र भोकरे, ग्रामविकास अधिकारी चांदशॉ काझी, कारकून औंध देवस्थान उमेश थोरात उपस्थित होते. वाई येथे तहसीलदार सोनाली मेटकरी, नगराध्यक्ष अनिल सावंत, नगरसेवक भारत खामकर, केतकी पाटणे, जागृती पोरे, अपर्णा जमदाडे, सरपंच मेघा सावंत, गटविकास अधिकारी नारायण घोलप उपस्थित होते. मेढा (ता. जावळी) येथे जिल्हा परिषद सदस्य जयश्री गिरी, महाराष्ट्र राज्य व्यसन मुक्त संघटनेचे अध्यक्ष विलासबाबा जवळ, नगराध्यक्ष रूपाली वारागडे, उपनगराध्यक्ष विकास देशपांडे, महिला आरोग्य सभापती आनंदी करंजेकर, बांधकाम सभापती शिवाजीराव देशमुख, आरोग्य सभापती नितीन मगरे, विरोधी पक्षनेते श्रीकांत जवळ, नगरसेवक धनंजय पवार, सोनाली पवार, छकुली करंजेकर, मोनिका जवळ, शर्वरी गायकवाड, आरती इगावे, सुरेश पार्टे उपस्थित होते.


04671
मेढा ः स्वच्छता अभियानाची सुरुवात करताना पदाधिकारी व श्रीसदस्य.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran War: इराण-इस्रायलच्या लढाईत भारताला फटका! चार दिवसांत मोठं आर्थिक नुकसान, धक्कादायक आकडेवारी समोर

IND vs ENG: चंद्रग्रहणात सराव... नको रे बाबा! भारतीय संघाने वानखेडेवरील सरावाची वेळ बदलली, सूर्याच्या संघाने 'ती' वेळ टाळली

Drunk and Drive Crime : ‘ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्ह’ विरोधात मोहीम! तीन दिवसांत ३०१ मद्यपी चालकांवर कारवाई

Latest Marathi News Live Update: खार स्टेशनजवळ दोन इसम चालत्या ट्रेनमधून पडले

Baba Venga Prediction : इराण–इस्रायल–अमेरिका तणावाच्या पार्श्वभूमीवर बाबा वेंगा यांची भविष्यवाणी चर्चेत

SCROLL FOR NEXT