Sakal-Relief-Fund
Sakal-Relief-Fund 
पुणे

जोगवडी येथील ओढ्यात पाणीसाठा

सकाळवृत्तसेवा

मोरगाव - जोगवडी (ता. बारामती) येथे सकाळ रिलीफ फंडातून २०१६-१७ मध्ये दोन किलोमीटरवर ओढा खोलीकरणाचे काम झाले. पावसाअभावी येथे नैसर्गिक पाणीसाठा झाला नसला तरी यंदा पुरंदर योजनेचे पाणी साठविण्यासाठी या कामाचा शेतकऱ्यांना भरीव फायदा झाला. ‘सकाळ’मुळे हे पाणी साठवणुकीचे हक्काचे माध्यम मिळाले असल्याची प्रतिक्रिया येथील सरपंच राजश्री भोसले, ग्रामपंचायत सदस्य अमर भोसले व शेतकऱ्यांनी व्यक्त केली. 

‘सकाळ’ने येथील पाणी साठवणूक तलावाच्या खोलीकरणाचेही काम केले आहे. त्यामुळे तलावाच्या शेजारील पाणीपुरवठा विहिरीस चांगले पाणी असून, गावाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सुटण्यास मदत झाली आहे.

दुसरीकडे येथील गावात गेल्या अनेक वर्षांपासून ओढे पूर्णपणे मातीने बुजलेले असून, त्यावर शेतकऱ्यांनी अतिक्रमण केले होते. २०१४ पासून काही शेतकरी व सरकारी विभाग यांनी विविध योजनांच्या व लोकसहभागाच्या माध्यमातून ओढा खोलीकरणाचे काम करण्यास पुढाकार घेतला. मात्र, ओढ्यावर अतिक्रमण केलेल्या शेतकऱ्यांच्या तीव्र विरोधामुळे येथे एक टक्काही खोलीकरण करता आले नाही. २०१६-१७ या वर्षात ग्रामपंचायत व शेतकरी यांच्या मागणीनुसार ‘सकाळ’मधून येथे २ लाखांचा निधी उपलब्ध  झाला. सरपंच राजश्री भोसले, ग्रामपंचायत सदस्य अमर भोसले यांनी ओढ्यालगतच्या शेतकऱ्यांची समन्वय बैठक घेऊन या कामाचा शेतकऱ्यांना कसा फायदा होणार आहे हे पटवून दिले. पाण्याची बारमाही टंचाई असलेल्या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांनीही ओढा खोलीकरण करण्यास प्रतिसाद दिला.

ओढा खोलीकरण झाल्यापासून या परिसरात फारसा पाऊस न झाल्यामुळे ओढ्यात जास्त पाणीसाठा शेतकऱ्यांनी कधी पाहिल नव्हता. मात्र, गेल्या आठ दिवसांत शेतकऱ्यांनी पुरंदर योजनेचे पाणी घेतल्यामुळे हे पाणी साठविण्यासाठी शेतकऱ्यांना ओढा खोलीकरणाचा चांगला उपयोग होत आहे. शिवाय त्यामुळे विकतच्या घेतलेल्या पाण्याचा अपव्यय न होता, त्याचा योग्य विनियोग होत आहे.

सकाळच्या कायम ऋणात राहू.....
सकाळ माध्यम समूहामुळे गावच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न व शेतीसिंचनासाठी पाणी साठवणुकीचा प्रश्न सुटण्यास भरीव मदत झाली आहे. त्यामुळे आम्ही जोगवडीकर सकाळच्या कायम ऋणात राहू, अशी प्रतिक्रिया येथील सरपंच राजश्री भोसले, ग्रामपंचायत सदस्य अमर भोसले व शेतकऱ्यांनी व्यक्त केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covid 19 : कोविडची पहिली लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञावर चीनची मोठी कारवाई; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे केलं बरखास्त

Nashik Crime News : बेद टोळीचा शुटर बारक्याला पुण्यातून अटक! 3 महिन्यांपासून होता फरार; गुंडाविरोधी पथकाची कामगिरी

Nashik Traffic Problem: नियोजनाअभावी वाहतुकीचा बट्ट्याबोळ! उमेदवारी अर्जामुळे गर्दी; वाहतूक पोलिसांची तारांबळ

Modi Rally Pune: "एका अतृप्त आत्म्यानं महाराष्ट्रासह देशाला अस्थिरतेत लोटलं"; PM मोदींकडून नाव न घेता शरद पवारांवर घणाघाती टीका

Latest Marathi News Live Update : महायुती महाराष्ट्रातल्या विकासाचा अनुशेष भरुन काढेल- मोदी

SCROLL FOR NEXT