पुणे

Vidhan Sabha 2019 : रामटेकडीसाठी प्रधानमंत्री आवास योजना राबवणार : टिळेकर

सकाळ वृत्तसेवा

मांजरी : हडपसर मतदारसंघात झालेली विकासकामे हा माझा प्रचार असून सर्वसामान्य जनता ही माझी ताकद आहे. रामटेकडी भागाच्या विकासासाठी माझा नेहमीच प्रयत्न राहिला आहे. पुढील काळात रामटेकडी परिसरातील झोपडपट्टीसाठी प्रधानमंत्री आवास योजना (शहरी ) राबवण्यासाठी माझा प्रयत्न राहणार आहे, असे सांगत येथील मतदार माझ्या पाठी खंबीर राहून मलाच मताधिक्य देतील, असा विश्वास महायुतीचे उमेदवार आमदार योगेश टिळेकर यांनी व्यक्त केला. 

भाजप, शिवसेना, आरपीआय, राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसंग्राम व रयत क्रांती महायुतीचे उमेदवार आमदार योगेश टिळेकर यांच्या प्रचारासाठी आज रामटेकडी येथे पदयात्रा व सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मतदारांशी हितगुज करताना टिळेकर बोलत होते.

यावेळी क्रांती सामाजिक संस्थेचे अध्यक्ष खन्नासिंग कल्याणी, उपाध्यक्ष भगतसिंग कल्याणी, चाँदसिंग कल्याणी, शक्तीसिंग कल्याणी, वैशाली शिंदे, नाशरजंग हक्कानी, डॉ ज्ञानोबा मुंडे आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. 

टिळेकर म्हणाले," या अगोदरच्या सत्ताधाऱ्यांनी राबविलेल्या चुकीच्या धोरणांमुळे हडपसर मतदार संघातील सर्वसामान्य जनतेला न्याय मिळालाच नाही. या खाच-खळग्यातुन मार्ग काढीत गेल्या पाच वर्षात रस्ते विकास, पाणी, वीज, आरोग्य आदी क्षेत्रात विकासाला गती देण्याचे काम मी केले आहे. सय्यदनगर, रामटेकडीचा वाहतूक कोंडीचा विळखा सोडविण्यासाठी माझा प्रामाणिक प्रयत्न झाला आहे. अधिकाधिक गरिबांना घरांसह विविध योजना देण्यात माझी आघाडी राहिली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा हा सर्वसामान्य माणूस मला प्रतिनिधीत्व करण्याची संधी देईल, यावर माझा विश्वास आहे.'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shrikant Shinde: एक ठाकरे धनुष्य बाणाला तर दुसरे ठाकरे हाताच्या पंजाला करणार मतदान, श्रीकांत शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

PM Modi Rally Solapur: एससी, एसटी आणि ओबीसींचे आरक्षण अल्पसंख्याकांना देण्याचा काँग्रेसचा डाव, पंतप्रधान मोदींचा घणाघात

Latest Marathi News Live Update: मोदींच्या कितीही सभा घेतल्या तरी उपयोग होणार नाही - पृथ्वीराज चव्हाण

Wagholi Accident: नवीन कारचा आनंद काही काळच टिकला! पुण्यात भीषण अपघातात तीन तरुणांचा मृत्यू

Aamir Khan: इम्रान खान करणार कमबॅक,भाच्यासाठी अमिर करणार असे काही की...!

SCROLL FOR NEXT