Woman injured in leopard attack in Kalwadi
Woman injured in leopard attack in Kalwadi sakal
पुणे

Leopard Attack : काळवाडी येथील महिला बिबट्याच्या हल्ल्यात जखमी

सिद्धार्थ कसबे

पिंपळवंडी : काळवाडी(ता.जुन्नर) येथील बेल्हेकर वस्ती शिवारातील मंगल नवनाथ बेल्हेकर या महिलेवर बिबट्याने हल्ला करून त्यांना जखमी केले. सदर घटना रविवारी(ता.३१) संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली. मंगल बेल्हेकर यांनी सांगितले की त्या व त्यांचे पती नवनाथ बेल्हेकर हे शेतात काम करत असताना केळीच्या शेतातून येत बिबट्याने अचानक माझ्यावर हल्ला केला.

केळीच्या पानांचा आवाज आल्याने मी त्या दिशेने पाहिले असता एक मोठा बिबट्या माझ्याकडे येताना मला दिसला.या बिबट्याने अचानक माझ्यावर हल्ला केला.मी आरडाओरडा केल्याने बाजुलाच असलेले माझे पती नवनाथ बेल्हेकर हे देखील बिबट्याच्या दिशेने पळत आले.मोठ्याने ओरडल्यामुळे बिबट्याने मला सोडले व तो बाजुच्या शेतात पळुन गेला.या हल्ल्यात मंगल बेल्हेकर यांच्या खुब्याला जखम झाली असुन त्यांना पिंपळवंडी येथे उपचारासाठी नेण्यात आले आहे.

सदर घटनेची माहिती वनविभागाला कळवली असता वनविभागाचे वनपाल एस.के.साळुंखे यांनी सदर घटनेची माहिती घेतली. आज रविवारी सकाळी देखील काळवाडी येथील एका वृद्धावर बिबट्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती काळवाडीचे अजय बेल्हेकर यांनी दिली.भविष्यात कोणतीही जीवित हानी होऊ नये म्हणुन वनविभागाने लवकरात लवकर बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ebrahim Raisi: हेलिकॉप्टर अपघातात इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्यासह परराष्ट्र मंत्र्याचा मृत्यू- रिपोर्ट

Shivam Dube : शिवम दुबेला लागले ग्रहण... T20 World Cupसाठी संघात निवड झाल्यानंतर 5 सामन्यात केल्या फक्त इतक्या धावा

Masala Omelette Recipe : नाश्त्यामध्ये झटपट बनवा मसाला ऑम्लेट, चवदारही लागणार अन् पोटही भरणार.!

Stock Market: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शेअर बाजार कसा असेल? पंतप्रधान मोदींनी वर्तवले भाकित

Maharashtra Lok Sabha Phase 5 Election : पाचव्या टप्प्यात 49 जागांवर मतदान! राजनाथ सिंह, राहुल गांधींसह अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

SCROLL FOR NEXT