दम मारो दम चे झीनत अमान यांनी सांगितले रहस्य sakal
पुणे

‘दम मारो दम’ चे झीनत अमान यांनी सांगितले रहस्य

‘सा रे ग म प 2021’ची नवी आवृत्ती प्रसारित

अरुण सुर्वे

पुणे : ‘झी टीव्ही’ वाहिनीने गेल्या महिन्यात आपल्या सर्वाधिक काळ सुरू असलेला संगीतविषयक रिअॅलिटी कार्यक्रम ‘सा रे ग म प 2021’ची नवी आवृत्ती प्रसारित केली. या कार्यक्रमाने आपल्या 25 वर्षांच्या गौरवशाली काळात संगीत क्षेत्राला काही उत्कृष्ट पार्श्वगायक मिळवून दिले आहेत. या कार्यक्रमाच्या ताज्या आवृत्तीस धडाक्यात प्रारंभ झाला असून या आवृत्तीतील गुणी स्पर्धकांनी प्रेक्षकांवर आपला प्रभाव टाकला आहे. आता येत्या शनिवारच्या भागात नामवंत अभिनेत्री झीनत अमान एक विशेष अतिथी म्हणून सहभागी होणार असल्याने ती प्रेक्षकांसाठी एक पर्वणी असेल.

या कार्यक्रमात सर्वच स्पर्धकांनी उत्कृष्ट प्रकारे गाणी सादर केली असली, तरी अनन्या, लाज आणि युम्ना या स्पर्धकांनी सादर केलेल्या ‘हरे रामा हरे कृष्णा’ चित्रपटाच्या या शीर्षकगीताने अभिनेत्री झीनत अमान मंत्रमुग्ध झाली. हे गाणे ऐकून झीनत अमान भूतकाळाच्या स्मृतींमध्ये हरवून गेली आणि तिने या गाण्याबद्दलचे काही किस्से यावेळी कथन केले. दम मारो दम या गाण्यातील झीनतजींच्या हिप्पींसारख्या वेशभूषेबद्दल अनन्या या स्पर्धकाने विचारणा केल्यावर झीनत अमानने या गाण्याशी संबंधित एक किस्सा सांगितला. या गाण्यातील आपला वेश हिप्पींसारखा असावा, अशी सूचना तेव्हा स्वत: आनंद यांनीच केली होती, असे झीनत अमानने यावेळी सांगितले.

या गाण्याशी संबंधित किस्सा कथन करताना झीनत अमान म्हणाली, “या गाण्याचं चित्रीकरण करताना देवसाब यांची द्विधा मन:स्थिती झाली होती. या गाण्याचा वापर चित्रपटात करावा की नाही, याबद्दल त्यांचा निर्णय होत नव्हता. अखेरीस त्यांनी हे गाणं वापरण्याचा निर्णय घेतला. गाणं वापरण्याचा निर्णय घेतल्यावर त्यात माझा लूक कसा असावा, यावर चर्चा सुरू झाली. हे गाणं माझं स्वत:चं असल्याने त्याला मी माझा स्पर्श देण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी माझ्या लांब सरळ केसांचा मधोमध भांग पाडावा, असं मी ठरवलं. पण देवसाब म्हणाले की हे गाणं हिप्पी मंडळींच्या कोंडाळ्यात चित्रीत होत असल्याने मी त्यात डोळ्यांवर काळा चष्मा वापरावा आणि माझा वेश हिप्पींसारखाच असावा. या गाण्यात माझा अगदी बिनधास्त वावर असावा आणि मला कशाचीही काळजी किंवा फिकिर नसल्याचं दिसून यावं, असंही ते म्हणाले. त्यामुळे या जबरदस्त लोकप्रिय गाण्याच्या चित्रीकरणात त्यांचाही सहभाग होता.”

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Central Railway: मध्य रेल्वेवर १५ दिवस पॉवरब्लॉक, अनेक लोकलवर परिणाम; वेळापत्रकात मोठे बदल

Nepal Flood Update : नेपाळच्या पुरात महाराष्ट्रातील पर्यटक अडकले, राज्य सरकारचे प्रयत्न सुरू, 4 जण सुरक्षित; मंत्री शंभूराज देसाईंनी दिली महत्त्वाची अपडेट

Sunetra Pawar: चिमुकलीवरील अत्याचार-हत्या प्रकरणी उपमुख्यमंत्री सुनित्रा पवार आक्रमक; आरोपीला फाशीची शिक्षा मिळवून देण्याची ग्वाही

Marathi News Live Updates : ठाण्यात क्लस्टर योजनेविरोधात पवारांच्या राष्ट्रवादीचा मोर्चा

Tukaram Mundhe: तुम्ही जे खाताय ते खरंच सुरक्षित आहे का?, खरेदी करण्याआधी हे तपासा... तुकाराम मुंढेंनी सांगितली महत्त्वाची गोष्ट

SCROLL FOR NEXT