पुण्याई सभागृह (कोथरूड) - ‘सकाळ’ने प्रकाशित केलेल्या आणि कमांडर (निवृत्त) विनायक अभ्यंकर यांनी लिहिलेल्या ‘झेप रणभूमीवर’ या पुस्तकाचे मंगळवारी प्रकाशन झाले. या वेळी (डावीकडून) आशुतोष रामगीर, ऐश्वर्या कुमठेकर, विशाखा अभ्यंकर, डॉ. रामचंद्र देखणे, एअर मार्शल

पुणे

भारताचे वैर केवळ दहशतवादाशी - भूषण गोखले

सकाळवृत्तसेवा

पुणे - ‘भारताकडून दहशतवादी पोसले जात नाहीत. त्यामुळे प्रतिहल्ला होईल ही, भीती बाळगण्याचे कारण नाही. आपले वैर पाकिस्तानातील जनतेशी नसून तिथे पोसल्या जाणाऱ्या दहशतवादाशी आहे. आतातरी पाकिस्तानने दहशतवादाला खतपाणी घालू नये. भारतीय सेना ही संरक्षण सेना नसून सशस्त्र सेना आहे,’’ असे मत एअर मार्शल (निवृत्त) भूषण गोखले यांनी व्यक्त केले.

‘सकाळ’ने प्रकाशित केलेल्या आणि निवृत्त नौदल अधिकारी विनायक अभ्यंकर यांनी लिहिलेल्या ‘झेप रणभूमीवर’ या पुस्तकाचे मंगळवारी प्रकाशन झाले. या वेळी डॉ. रामचंद्र देखणे उपस्थित होते. १९४७ नंतर हुतात्मा झालेल्या प्रत्येकाला हवाई दलाच्या हल्ल्यांमुळे आदरांजली मिळाली आहे. पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय दबाव प्रचंड आहे. किमान आतातरी त्यांनी दहशतवाद त्यागावा.

आपल्या देशात प्रचंड देशभक्ती आहे. कारगिल युद्धावेळी रस्त्यावरील भिकाऱ्यांनीही काही पैसे गोळा करून जवानांना मदत केली होती, असे सांगताना गोखले देशप्रेमाने भावनिक झाले. भारत-पाकिस्तानबरोबर झालेल्या युद्धाचे रोमांचकारी अनुभव, पराक्रमांचा इतिहास या पुस्तकात आहे, असे देखणे यांनी सांगितले. विशाखा अभ्यंकर यांनी आभार मानले.

नाव राखले, शान राखली
‘नाव राखले, शान राखली, भारतीयांच्या परंपरेची मान उंचावली’ ही ‘सकाळ’चे वाचक विनायक ताठे यांनी तयार केलेली कविता कार्यक्रमाच्या सुरवातीला सादर करण्यात आली. 

नाव राखले, शान राखली
‘नाव राखले, शान राखली, भारतीयांच्या परंपरेची मान उंचावली’ ही ‘सकाळ’चे वाचक विनायक ताठे यांनी तयार केलेली कविता कार्यक्रमाच्या सुरवातीला सादर करण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News: इन्स्टाग्रामवर यौवना अन् प्रत्यक्षात समोर आली दुसरीच बाई.. अपेक्षाभंगामुळे तरुणाने केली बेदम मारहाण

Parineeti Chopra : पहिल्याच भेटीत परिणीती चोप्रा पडली होती राघवच्या प्रेमात

Salary Hike: आनंदाची बातमी! यावर्षी कर्मचाऱ्यांची होणार 12 टक्क्यांपर्यंत पगारवाढ; अहवालात माहिती उघड

Revoting: दोन गटांतील हाणामारीत 'ईव्हीएम'ची तोडफोड, 'या' राज्यात फेरमतदानाला सुरूवात

Latest Marathi News Live Update: ठाकरे गटाचे उमेदवार आज दाखल करणार अर्ज

SCROLL FOR NEXT