Mutual funds
Mutual funds sakal
Personal Finance

Mutual funds : लार्ज अँड मिड कॅप फंड

सकाळ वृत्तसेवा

-समीर सुमंत

भारत ही जगातील सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. उत्पादनाशी निगडित प्रोत्साहन योजना (पीएलआय), नादारी व दिवाळखोरी संहिता (आयबीसी), सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे एकत्रीकरण, ‘जीएसटी’ची अंमलबजावणी, ‘मेक इन इंडिया’ मोहिमांसारख्या अनुकूल सरकारी धोरणांमुळे खासगी भांडवली खर्चाच्या चक्राचे पुनरुज्जीवन झाल्यामुळे अर्थव्यवस्थेच्या वाढीला चालना मिळाली आहे.

सध्या जागतिक परिस्थिती अस्थिर आहे, अशा वेळी भारतीय शेअर बाजाराचा, अर्थव्यवस्थेचा मागोवा घेणे आणि गुंतवणुकीचा निर्णय घेणे हे सर्वसामान्य गुंतवणूकदारांसाठी कठीण असते. म्युच्युअल फंडाची भूमिका येथेच सुरू होते.

म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीच्या माध्यमातून सर्वसामान्य गुंतवणूकदार शेअर बाजारातील लाभ मिळवू शकतात. त्यासाठी अभ्यासपूर्ण निर्णय घेणे, जोखीम ओळखणे ही सर्व जबाबदारी व्यावसायिक फंड व्यवस्थापक घेतात.त्यामुळे म्युच्युअल फंड एक सुरक्षित आणि उत्तम परतावा देणारा गुंतवणूक पर्याय आहे. सध्याची स्थिती लार्ज आणि मिड कॅप फंडात गुंतवणूक करण्यायोग्य आहे. लार्ज आणि मिड कॅप फंडांची अर्थव्यवस्थेच्या वाढीतही महत्त्वाची भूमिका आहे.  

 लार्ज व मिड कॅप फंडांचे महत्त्व

‘सेबी’ने लार्ज आणि मिड कॅप फंडांची सुरुवात ऑक्टोबर २०१७ मध्ये झाली. निव्वळ लार्ज कॅप फंड किंवा मिड कॅप फंडाच्या तुलनेत, या फंडाद्वारे त्याच्या नावाप्रमाणेच एकाच फंडात लार्ज आणि मिड कॅप अशा दोन्ही प्रकारच्या फंडांमध्ये गुंतवणूक करण्याची सोय असते. यात फंडाच्या निधीपैकी किमान ३५ टक्के रक्कम लार्ज कॅपमध्ये आणि ३५ टक्के रक्कम मिड कॅपमध्ये गुंतवली जाते.

हे गुंतवणुकीचे किमान प्रमाण आवश्‍यक आहे. बाजाराच्या परिस्थितीनुसार, फंड मॅनेजर यात बदल करू शकतात.  लार्ज कॅप कंपन्या या पूर्ण बाजार भांडवलाच्या बाबतीत १ ते १०० पर्यंत आणि मिड कॅप कंपन्या १०१ ते २५० या स्थानी असतात. लार्ज कॅपच्या अस्तित्वामुळे स्थिरतेची हमी मिळते, तर मिड कॅपमुळे वाढीची उच्च क्षमता लाभते. लार्ज आणि मिड कॅप फंडातील हे मिश्रण बाजारपेठेतील विविध चक्रांमध्ये गुंतवणुकीचा चांगला अनुभव देते.

‘आयसीआयसीआय प्रुडेन्शियल’ लार्ज अँड मिड कॅप फंड

या गटात अनेक फंड हाउसेसकडून विविध योजनांचे पर्याय उपलब्ध असले, तरी आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लार्ज अँड मिड कॅप फंड हा सातत्यपूर्ण कामगिरी करणारा फंड आहे. योग्य प्रमाणात उत्तम शेअरची निवड ही याची खासीयत आहे. उत्तम परतावा देणारे शेअर आणि क्षेत्रांची निवड करून गुंतवणूक केली जाते. त्यांचे योग्य प्रमाण आणि योग्य वेळ यामुळे या फंडाची कामगिरी सातत्याने उत्कृष्ट राहिली आहे. गुंतवणूकदारांना त्याने चांगला परतावा दिला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ebrahim Raisi: हेलिकॉप्टर अपघातात इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्यासह परराष्ट्र मंत्र्याचा मृत्यू- रिपोर्ट

Shivam Dube : शिवम दुबेला लागले ग्रहण... T20 World Cupसाठी संघात निवड झाल्यानंतर 5 सामन्यात केल्या फक्त इतक्या धावा

Masala Omelette Recipe : नाश्त्यामध्ये झटपट बनवा मसाला ऑम्लेट, चवदारही लागणार अन् पोटही भरणार.!

Stock Market: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शेअर बाजार कसा असेल? पंतप्रधान मोदींनी वर्तवले भाकित

Maharashtra Lok Sabha Phase 5 Election : पाचव्या टप्प्यात 49 जागांवर मतदान! राजनाथ सिंह, राहुल गांधींसह अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

SCROLL FOR NEXT