EPFO  Sakal
Personal Finance

Rule Change: लाखो EPFO ​​सदस्यांसाठी मोठी बातमी! पेन्शनबाबत सरकारने बदलला नियम

Rule Change EPFO: केंद्र सरकारने शुक्रवारी कर्मचारी पेन्शन योजना (EPS), 1995 मध्ये बदल केला आहे. आता 6 महिन्यांपेक्षा कमी कालावधीसाठी ज्या कर्मचाऱ्यांनी पेन्शन योजनेत पैसे भरले आहेत. त्या कर्मचाऱ्यांना आता पैसे काढता येणार आहेत.

राहुल शेळके

Rule Change EPFO: केंद्र सरकारने शुक्रवारी कर्मचारी पेन्शन योजना (EPS), 1995 मध्ये बदल केला आहे. आता 6 महिन्यांपेक्षा कमी कालावधीसाठी ज्या कर्मचाऱ्यांनी पेन्शन योजनेत पैसे भरले आहेत. त्या कर्मचाऱ्यांना आता पैसे काढता येणार आहेत. या बदलामुळे लाखो ईपीएस कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. खरं तर, दरवर्षी लाखो EPS सदस्य पेन्शनसाठी आवश्यक 10 वर्षांची सेवा पूर्ण करण्यापूर्वी योजना सोडतात. यामध्ये 6 महिन्यांत ही योजना सोडणाऱ्यांची संख्या जास्त आहे.

EPS अंतर्गत, ज्यांनी 10 वर्ष पूर्ण न करता योजना सोडली त्यांना पैसे काढण्याची सुविधा देण्यात आली होती. परंतु 6 महिन्या अगोदर योजना सोडलेल्यांना पैसे काढण्याची सुविधा दिली जात नव्हती. मात्र, आता हा नियम बदलून सरकारने मोठा दिलासा दिला आहे. नवीन दुरुस्तीमुळे दरवर्षी 7 लाखांहून अधिक ईपीएस सदस्यांना फायदा होईल.

जुन्या नियमामुळे अनेक सदस्य 6 महिन्यांपेक्षा कमी कालावधीत बाहेर पडत असल्याने अनेक दावे फेटाळण्यात आले होते. यात 7 लाख दावे नाकारण्यात आले होते. आता हे EPS सदस्य ज्यांचे वय 14.06.2024 पर्यंत 58 वर्षे पूर्ण झाले नाही त्यांना पैसे काढण्याचे फायदे मिळतील.

EPS म्हणजे काय?

बऱ्याचदा लोक ईपीएसबद्दल गोंधळात पडतात. ही एक पेन्शन योजना आहे, जी EPFO ​​द्वारे चालवली जाते. या योजनेंतर्गत 10 वर्षांसाठी पैसे गुंतवावे लागतात. त्यानंतर तुम्ही निवृत्तीनंतर निवृत्तीवेतनासाठी पात्र ठरता. विद्यमान आणि नवीन EPF सदस्यांचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे.

नियोक्ता/कंपनी आणि कर्मचारी दोघेही EPF निधीमध्ये कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या 12% समान योगदान देतात. संपूर्ण कर्मचाऱ्यांचे योगदान EPF मध्ये जाते आणि नियोक्ता/कंपनीचा 8.33% हिस्सा कर्मचारी पेन्शन योजना (EPS) मध्ये जातो आणि 3.67% दरमहा EPF मध्ये जातो. किमान 10 वर्षे सेवा पूर्ण केल्यानंतर आणि निवृत्तीनंतर पेन्शनचा लाभ मिळतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akhad Mahotsav : इच्छुक उमेदवारांकडून यावर्षी प्रथमच गाव पातळीपासुन तालुकापातळीपर्यंत आखाड महोत्सवाचे आयोजन

Diabetes Management During Pregnancy: गर्भधारणेदरम्यान मधुमेह कसा हाताळावा? जाणून घ्या महत्त्वाची माहिती

Latest Maharashtra News Updates : अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त कोल्हापुरात सेवा सप्ताह; अंबाबाई चरणी मुख्यमंत्रिपदाची प्रार्थना

Shanukripa Heartcare: हृदयविकारावर शस्त्रक्रियेविना उपचार! शनिकृपा हार्टकेअर सेंटरचा २५ वर्षांचा यशस्वी प्रवास

Junnar News : अंबोलीतील दाऱ्याघाटात पर्यटकांची झुंबड; निसर्गसौंदर्य अनुभवण्यासाठी सहलींच्या संख्येत होतेय वाढ

SCROLL FOR NEXT