Shaktikant Das Sakal
Personal Finance

RBI MPC June 2023: कर्जाचा EMI कमी होणार? RBI ने केली मोठी घोषणा

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियायाने (RBI) सध्याच्या महागाईचा विचार करता रेपो दरात कोणताही बदल केलेला नाही.

राहुल शेळके

RBI MPC June 2023: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियायाने (RBI) सध्याच्या महागाईचा विचार करता रेपो दरात कोणताही बदल केलेला नाही. रेपो दर आहे तसेच ठेवले आहेत.

RBI गव्हर्नर शक्तीकांत दास आज 2023-24 या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या द्वि-मासिक चलनविषयक धोरणासाठी पॅनल चर्चा झाली. त्यावर आज 8 जून रोजी निष्कर्ष काढण्यात आला आहे.

शेवटची पतधोरण बैठक एप्रिल 2023 मध्ये झाली होती, रेपो रेटमध्ये वाढ झाल्यामुळे गृहकर्जाचा व्याजदर वाढतो, म्हणजे एखाद्या व्यक्तीला त्यासाठी अधिक EMI भरावा लागेल. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियायाने रेपो दरात कोणताही बदल केलेला नसल्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

महागाई 5 टक्क्यांच्या खाली:

सध्या महागाईचा दर 5 टक्क्यांच्या खाली आहे. एप्रिलचे आकडे याची साक्ष देतात. एप्रिल महिन्यात किरकोळ महागाई दर 4.70 टक्के होता. तर मार्च महिन्यात हाच दर 5.6 टक्के होता.

याचा अर्थ स्पष्ट आहे की दोन महिन्यांत महागाईचे आकडे सुसह्य पातळीपासून खाली आले आहेत. ज्याची शक्यता मे महिन्यातही दिसू शकते. तज्ज्ञांच्या मते, यामुळेच आरबीआय यावेळी महागाईच्या आकडेवारीचा अंदाज कमी करू शकते.

आरबीआयची नजर मान्सून आणि एल निनोवरही असेल. कारण या दोन्ही कारणांमुळे आगामी काळात महागाई वाढण्याची शक्यता आहे.

रेपो दर काय आहे:

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया व्यावसायिक बँकांना ज्या दराने कर्ज देते तो दर म्हणजे RBI रेपो दर. जेव्हा आरबीआयचा रेपो दर वाढतो, तेव्हा बँकांना आरबीआयकडून महाग कर्ज मिळते.

जर बँकेला महागडे कर्ज मिळाले, तर बँक आपल्या ग्राहकांना महागडे कर्ज वितरित करेल. म्हणजेच रेपो दर वाढवण्याचा बोजा बँकेच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत पोहोचतो. बँकेचा व्याजदर वाढतो आणि तुम्ही घेतलेल्या गृहकर्ज, कार लोन आणि पर्सनल लोनचे व्याजदर वाढतात.

तुम्ही विचार करत असाल की जेव्हा लोकांवर परिणाम होतो तेव्हा RBI रेपो दर का वाढवते? वास्तविक, महागाई नियंत्रित करण्यासाठी, बाजारातील तरलता कमी करण्यासाठी रेपो दर वाढवते.

रेपो रेट वाढल्याने अर्थव्यवस्थेतील पैशाचा ओघ कमी होतो. पैशाचा प्रवाह कमी होताच मागणी कमी होऊ लागते आणि महागाई कमी होऊ लागते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: हैदराबादचा राजस्थानवर दणदणीत विजय! ईशान-अभिषेकच्या खेळीनं वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ; Points Table मध्ये उलथापालथ

Vaibhav Sooryavanshi: राजस्थान रॉयल्सला धक्का! वैभव शतकानंतर फिल्डिंग करताना लंगडत गेला मैदानातून बाहेर; नेमकं काय घडलं?

Vaibhav Sooryavanshi चे दुसरे शतक! तब्बल १२ षटकारांचा पाऊस पाडत IPL मध्ये ऐतिहासिक कारनामा; १९ वर्षात पहिल्यांदाच असं घडलं

Launch Service : मुळशी ते वाघवाडी प्रवासी लाँचसेवेचे लोकार्पण; १६ गावांतील ग्रामस्थांना होणार फायदा

SMT Heritage Scare: सीएसएमटी हेरिटेज स्थानकात ‘पॅरानॉर्मल’ कोड, गूढ चिन्हांनी खळबळ; काळी जादू, सुरक्षा आणि वारसा संरक्षणावर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT