RBI Penalty: तुमचेही 'या' बँकेत खाते आहे, RBIने ठोठावला 2.2 कोटींचा दंड, काय आहे प्रकरण? |RBI imposes Rs 2.2-crore penalty on Indian Overseas Bank | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

RBI

RBI Penalty: तुमचेही 'या' बँकेत खाते आहे, RBIने ठोठावला 2.2 कोटींचा दंड, काय आहे प्रकरण?

Indian Overseas Bank Rs 2 Crore Penalty: रिझर्व्ह बँकेने सार्वजनिक क्षेत्रातील इंडियन ओव्हरसीज बँकेवर 2.2 कोटी रुपयांचा मोठा दंड ठोठावला आहे. रिझव्‍‌र्ह बँकेला त्यांच्या तपासात असे आढळून आले की, इंडियन ओव्हरसीज बँकेने नियमनाशी संबंधित अनेक नियमांकडे दुर्लक्ष केले आहे.

आरबीआयच्या म्हणण्यानुसार, बँकेने बुडीत कर्जे ओळखण्यात निष्काळजीपणा दाखवला होता. याशिवाय बँकेने राखीव निधी कडेही दुर्लक्ष करण्यात आले आहे. तपासादरम्यान, सेंट्रल बँकेने मार्च 2021 च्या अकाउंट बुकमध्ये या त्रुटी आढळून आल्या आहेत.

29 मे रोजी आरबीआयने बँकेवर दंड आकारण्याची घोषणा केली. आरबीआयने सांगितले की ही कारवाई नियमांचे पालन केले नसल्यामुळे झाली आहे. ही कारवाई बँकेने तिच्या ग्राहकांसोबत केलेल्या कोणत्याही व्यवहाराच्या किंवा कराराशी संबंधित नाही.

केंद्रीय बँकेने म्हटले आहे की बँकेची तपासणी 31 मार्च 2021 रोजी तिच्या आर्थिक स्थितीच्या संदर्भात केली होती. चेन्नईस्थित बँकेने 2020-21 या वर्षामध्ये घोषित नफ्याच्या 25 टक्के रक्कम राखीव निधीमध्ये ठेवली नाही.

सार्वजनिक क्षेत्रातील 'या' दोन बँकांनाही दंड ठोठावण्यात आला:

यापूर्वी रिझर्व्ह बँकेने सेंट्रल बँक ऑफ इंडियाला 84.50 लाख रुपयांचा दंड ठोठावला होता. आर्थिक अनियमिततेमुळे कॅनरा बँकेला तीन कोटींचा दंड ठोठावण्यात आला होता. कॅनरा बँकेवर अपात्र खाती उघडल्याचा आरोप होता.

इंडियन ओव्हरसीज आरबीआयच्या कारवाईवर बँकेने उत्तर दिले की, वैयक्तिक सुनावणी दरम्यान ठेवलेल्या कागदपत्रांच्या आधारे, आरबीआय या निष्कर्षापर्यंत पोहोचली की बँकेच्या उल्लंघनाचे आरोप सिद्ध झाले आहेत.

त्यामुळे बँकेवर आर्थिक दंड ठोठावण्यात यावा. भारतीय रिझर्व्ह बँकेने इंडियन ओव्हरसीज बँकेला 2.2 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.

टॅग्स :BankrbiRBI governor