Sale of Cars
Sale of Cars sakal
Personal Finance

Sale of Cars : प्रवासी वाहनांची विक्रमी विक्री ; जानेवारीत विक्रीत १३ टक्क्यांनी वाढ

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : नववर्षाच्या पहिल्याच महिन्यात, जानेवारीमध्ये प्रवासी वाहनांच्या विक्रीने नवा विक्रम नोंदवला आहे. या महिन्यात तीन लाख ९३ हजार २५० मोटारींची विक्री झाली असून, ही आतापर्यंतची सर्वाधिक विक्री आहे. नोव्हेंबर २०२३ मधील विक्रम यावेळी मोडला आहे. जानेवारी २०२३ मधील तीन लाख ४७ हजार ८६ मोटारींच्या तुलनेत त्यात १३ टक्के वाढ झाली आहे. सर्व प्रकारच्या वाहनांच्या एकूण विक्रीतही १५ टक्के वाढ झाली असून, ती २१ लाखांहून अधिक असल्याचे वाहन वितरकांची शिखर संघटना फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशनने (फाडा) म्हटले आहे.

‘फाडा’ने दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी महिन्यात एकूण २१ लाख ३० हजार वाहनांची विक्री झाली असून, जानेवारी २०२३ मध्ये ही संख्या १८ लाख ५० हजार होती. दुचाकी, तीनचाकी, प्रवासी वाहने, ट्रॅक्टर आणि व्यावसायिक वाहनांसह सर्व वाहन श्रेणींमध्ये विक्रीत वाढ दिसून आली आहे. दुचाकी वाहनांमध्ये १५ टक्के, तीनचाकी श्रेणीत ३७ टक्के, प्रवासी वाहनांमध्ये १३ टक्के, ट्रॅक्टरमध्ये २१ टक्के आणि व्यावसायिक वाहनांमध्ये ०.१ टक्के वाढ नोंदवली गेली. प्रवासी वाहनांची वितरकांकडील उपलब्धता ५० ते ५५ दिवसांइतकी आहे, ही बाब चिंताजनक असल्याचे फाडाने म्हटले आहे.

बाजारातील मागणीनुरुप साठा उपलब्ध करून देण्यासाठी आणि भविष्यातील अति पुरवठ्याच्या समस्या रोखण्यासाठी वाहन उत्पादकांनी उत्पादनाचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे, असे मत ‘फाडा’चे अध्यक्ष मनीष राज सिंघानिया यांनी व्यक्त केले आहे. दुचाकी क्षेत्रासाठीही जानेवारी महिना अनुकूल ठरला. या महिन्यात दुचाकी विक्री १४ लाख ६० हजारांवर पोहोचली. मागील वर्षीच्या याच महिन्यात ती १२ लाख ७० हजारांपेक्षा अधिक होती.

ऑनबोर्ड डायग्नोस्टिक दोन नियमांची अंमलबजावणी, नव्या मॉडेलची ओळख आणि ग्राहकांचा प्रीमियम पर्यायांकडे वाढता कल यामुळे मागणी वाढण्यास हातभार लागला तसेच सकारात्मक शेती उत्पादन, लग्नसराई आणि चांगल्या सवलती यामुळे दुचाकींची मागणी वाढली, असेही ‘फाडा’ने नमूद केले आहे. तीनचाकी वाहनांच्या क्षेत्रात मात्र, संमिश्र चित्र दिसून आले. तीनचाकी व्यावसायिक वाहनांच्या विक्रीत वाढ झाली असून, ९७,६७५ वाहनांची विक्री झाली आहे.

जानेवारी २०२३ मधील ७१,३२५ वाहनांच्या तुलनेत त्यात ३७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. व्यावसायिक वाहनांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढत आहे. त्यामुळे तीव्र स्पर्धा दिसून येत असल्याचे ‘फाडा’ने म्हटले आहे. व्यावसायिक वाहन विभागात जानेवारी महिन्यात अगदीच अल्प वाढ झाली. या महिन्यात ८९,२०८ वाहनांची विक्री झाली, जानेवारी २०२३ मधील ८९,१०६ वाहनांच्या तुलनेत त्यात अगदी किरकोळ वाढ झाली.

‘एसयूव्हीं’ची वाढती मागणी, नवनवी मॉडेल दाखल होण्यासह, सहज उपलब्धता, प्रभावी मार्केटिंग, ग्राहकांसाठी लाभदायी योजना आणि लग्नसराईचा हंगाम यामुळे प्रवासी वाहनांच्या विक्रीला चालना मिळाली आणि उच्चांक नोंदवला गेला.

- मनीष राज सिंघानिया, अध्यक्ष, ‘फाडा’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Lok Sabha Election : बाबाजी‘ फॅक्टरमुळे नाशिकमध्ये ‘काटे की टक्कर', शेवटच्या दोन दिवसात आले महत्व

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: धुळ्यात एल एम सरदार हायस्कूल येथील ईव्हीएम बंद पडल्याने गोंधळ

Mobile Hacks: 'या' सोप्या ट्रिक्स वापरा, मोबाईलमधील फोटो डिलिट करण्याची येणार नाही वेळ

Lok Sabha Election: विरोधकांनीही मुस्लिम उमेदवारांना ठेवले दूर! 2019 च्या तुलनेत 2024 ची स्थिती काय?

RCB vs CSK: धोनीच्या षटकारामुळे रिंकूची आठवण... CSK विरूद्ध शेवटच्या ओव्हरला काय होत्या भावना, यश दयालच्या वडिलांकडून खुलासा

SCROLL FOR NEXT