Titan
Titan sakal
Personal Finance

टायटन (शुक्रवारचा बंद भाव : रु. ३६३३)

भूषण गोडबोले

टायटन ही देशातील सर्वांत मोठी ज्वेलरी रिटेलर कंपनी आहे. टाटा समूहातील या कंपनीने घड्याळे, ज्वेलरी आणि आयवेअर श्रेणींमध्ये प्रसिद्ध ब्रँड आणि ग्राहक अनुभवाच्या जोरावर नेतृत्वाची स्थिती स्थापित केली आहे. ही कंपनी तनिष्क, मिया, झोया, कॅरेटलेन या ब्रँडद्वारे दागिन्यांची विक्री करते. सी. के. वेंकटरामन हे टायटन कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आहेत.

गेल्या तिमाहीत भारतात कंपनीने ‘तनिष्क’ची १८ स्टोअर उघडली आहेत, तर ‘मिया’ ब्रँडची १६ नवी स्टोअर सुरू केली आहेत. देशांतर्गत नेटवर्कमध्ये ‘तनिष्क’ची सुमारे ४५३ स्टोअर, ‘मिया’ची १६१ स्टोअर आणि ‘झोया’ची ८ स्टोअर समाविष्ट आहेत. कंपनी व्यवसायवृद्धीसाठी आंतरराष्ट्रीय उपस्थितीमध्ये देखील वाढ करताना दिसत आहे.

कंपनीने अलीकडेच ‘तनेरा’ या ब्रँड स्टोअरची झपाट्याने वाढणारी साखळी तयार करत प्रीमियम साड्या विकणाऱ्या बाजारपेठेत देखील प्रवेश केला आहे. गेल्या तिमाहीत कंपनीने ‘तनेरा’ या ब्रँडची ११ नवी स्टोअर उघडली आहेत. सध्या २९ शहरांमध्ये ‘तनेरा’ ब्रँडची ६२ स्टोअर कार्यरत आहेत.

‘टायटन’साठी सकारात्मक

या कंपनीची ४१५ शहरांमध्ये सुमारे २८५९ स्टोअरची साखळी आहे. व्यवसायवृद्धी करताना ‘टाटा’ या ब्रँडने निर्माण केलेल्या गुणवत्ताकेंद्रित विश्वासाचा कंपनीला फायदा होत आहे. असंघटित ते संघटित ज्वेलरकडे बाजारातील चालू असलेला बदल ‘टायटन’साठी सकारात्मक आहे. गेल्या तिमाही निकालानुसार, कंपनीने रु. १०५३ कोटी नफा कमविला आहे.

तिसऱ्या तिमाहीत कंपनीने निव्वळ नफ्यात वार्षिक आधारावर सुमारे १५ टक्के वाढ नोंदवली आहे. गेल्या आर्थिक वर्षातील याच कालावधीतील रु. ११,६०९ कोटींच्या तुलनेत कंपनीचा महसूल सुमारे २२ टक्के वाढून रु. १४,१६४ कोटी झाला आहे. मागील तीन तिमाही निकालांनुसार, एकूण निव्वळ नफा सुमारे २७२५ कोटी रुपयांवर पोहचला आहे.

या कंपनीने व्यवसायात गुंतविलेल्या भांडवलावर वार्षिक आधारावर सरासरी २० टक्क्यांपेक्षा जास्त परतावा मिळवत उत्तमरीत्या व्यवसायवृद्धी केली आहे. भांडवलावर उत्तम परतावा मिळवत व्यवसायवृद्धी करीत असलेल्या या कंपनीच्या शेअरचा दीर्घावधीसाठी गुंतवणूकदारांनी जरूर विचार करावा.

(डिस्क्लेमर : या लेखातील माहिती अभ्यासाच्या दृष्टिकोनातून दिली गेली आहे. प्रत्यक्ष व्यवहार करताना जोखीम ओळखून वैयक्तिक गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Update : दक्षिण कर्नाटक, आंध्रपर्यंत मजल, मॉन्सूनची वेगवान प्रगती; तमिळनाडूही व्यापला

Lok Sabha Exit Poll 2024 : बहुमतापासून भाजप दूर राहील; एक्झिट पोलच्या आकडेवारीनंतरही काँग्रेसला विश्वास

Lok Sabha election 2024 : टपालाद्वारे आलेली मते सर्वप्रथम मोजा; ‘इंडिया’ आघाडी नेत्यांची निवडणूक आयोगाकडे मागणी

Lok Sabha Election 2024 : निकालानंतर भाजपमध्ये फेरबदल; अध्यक्षपद कोणाकडे दिले जाणार याकडे सर्वांचे लक्ष

चौरीचौरामधील स्मारक दुर्लक्षितच; शतकानंतरही देदीप्यमान इतिहासाच्या उपेक्षेमुळे नागरिकांत नाराजी

SCROLL FOR NEXT