asian paints share market stock analysis investment risk reward money management
asian paints share market stock analysis investment risk reward money management Sakal
Share Market

Asian Paints Ltd : एशियन पेंट्स (शनिवारचा बंद भावः रु. ३१३८)

भूषण गोडबोले

- भूषण गोडबोले

एशियन पेंट्स ही देशातील सर्वांत मोठी पेंट उत्पादक कंपनी आहे. कंपनीचा सुमारे ८८ टक्के महसूल सजावटीच्या (डेकोरेटिव्ह) पेंट उद्योगामधून येतो, तर उर्वरित महसूल औद्योगिक पेंट्स आणि परदेशातील व्यवसायातून येतो.

ही कंपनी १५ देशांमध्ये कार्यरत आहे; तसेच कंपनीकडे जगभरात २६ उत्पादन सुविधा आहेत. कंपनी ६५ पेक्षा जास्त देशांमध्ये ग्राहकांना सेवा देत आहे. कंपनीची उत्पादनक्षमता प्रतिवर्षी १८ लाख किलो लिटरपेक्षा अधिक आहे. कंपनीचे संपूर्ण देशात सजावटीच्या पेंटच्या उत्पादनाचे आठ प्रकल्प आहेत, तर सुमारे ३५ हजार कलर टिंटिंग मशीनसह ७० हजारांहून अधिक वितरकांचे सुस्थापित जाळे आहे.

देशांतर्गत संघटित पेंट मार्केटमध्ये कंपनीचा बाजारहिस्सा सुमारे ५५ टक्यांपेक्षा जास्त आहे. सजावटीच्या पेंट विभागाचा देशातील एकूण पेंट उद्योगामध्ये सुमारे ८० ते ८५ टक्के हिस्सा आहे. यामध्ये कंपनीचा बाजारहिस्सा सुमारे ६० टक्के आहे.

ऑटोमोटिव्ह इंडस्ट्रियल कोटिंगमध्येदेखील कंपनीकडे सुमारे २० टक्के हिस्सा आहे. बाजारनेतृत्वाचा फायदा घेत कंपनीला २०२३ पर्यंतच्या पाच आर्थिक वर्षांमध्ये १५ टक्के चक्रवाढ वार्षिक वाढीचा दर गाठण्यात यश आले आहे.

सध्या जाहीर झालेल्या तिमाही निकालानुसार, कंपनीने १४७५ कोटी रुपयांचा नफा कमाविला आहे. कंपनीकडे एकूण एक लाख साठ हजारांपेक्षा जास्त ‘रिटेल टच पॉइंट’ असून, गेल्या तिमाहीत व्यवसायवृद्धीसाठी नवे दोन हजार ‘टच पॉइंट’ जोडले आहेत.

वॉटरप्रूफिंग; तसेच बांधकाम, रसायन क्षेत्र व्यवसायात कंपनीचे व्यवसायविस्ताराचे धोरण आगामी काळातही सुरू राहणे अपेक्षित आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, रासायनिक वॉटरप्रूफिंग सिस्टीमच्या तुलनेत वापरण्यास सोपे ‘एशियन पेंट्स स्मार्टकेअर डॅम्प प्रूफ’ असे नवे उत्पादन बाजारात आणले आहे.

वूड फिनिश मार्केटमध्येदेखील कंपनी ‘वूडटेक इन्स्टंट पॉलिश’सारख्या उत्पादनांमार्फत व्यवसायवृद्धीसाठी प्रयत्नशील आहे. विस्तृत वितरण नेटवर्क; तसेच विस्तृत उत्पादन पोर्टफोलिओ, नवे उत्पादने, उत्पादन क्षमतेचा विस्तार, बॅकवर्ड इंटिग्रेशन यामुळे कंपनीला बाजारनेतृत्वाचा फायदा घेत दीर्घावधीमध्ये वाढीचा पुढचा टप्पा गाठणे शक्य होऊ शकेल.

कर्जाचे प्रमाण कमी ठेवून धंद्यात गुंतविलेल्या भांडवलावर प्रतिवर्ष सुमारे २५ टक्क्यांपेक्षा जास्त परतावा मिळवत, ही कंपनी कार्यरत क्षेत्रात प्रगती करत आहे. शेअर बाजारातील चढ-उतार आणि कंपनीच्या कार्यक्षेत्रातील जोखीम लक्षात घेऊन या कंपनीच्या शेअरमध्ये दीर्घावधीच्यादृष्टीने गुंतवणूक करण्याचा विचार करावा.

(डिस्क्लेमर : या लेखातील माहिती अभ्यासाच्या दृष्टिकोनातून दिली गेली आहे. प्रत्यक्ष व्यवहार करताना जोखीम ओळखून वैयक्तिक गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Politics: विधानसभेपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप होणार? बंडखोर ठाकरे-पवारांकडे परतणार?

केदार जाधवने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून केली निवृत्तीची घोषणा

Election Commission : ''सिस्टीममध्ये कुठलीही चूक होऊ शकत नाही'', मतमोजणीच्या तयारीबद्दल मुख्य आयुक्त राजीव कुमार म्हणाले...

Priyanka Chopra Beauty Tips: चमकदार त्वचेसाठी देसी गर्लने शेअर केली बॉडी स्क्रब बनवण्याची सोपी पद्धत

Bengluru Viral Video : बंगळुरूमध्ये कोकोनट अटॅकरची दहशत ; भरदिवसा गाडी फोडली, व्हायरल होतोय व्हिडीओ

SCROLL FOR NEXT