Share Market Opening Skala
Share Market

Share Market Opening: मार्च महिन्याची धमाकेदार सुरुवात; सेन्सेक्स 400 अंकांनी वर, कोणते शेअर्स तेजीत?

Share Market Today: शेअर बाजारात मार्चची मालिका सकारात्मकतेने सुरू झाली. शुक्रवारी बाजारातील प्रमुख निर्देशांक वाढीसह उघडले. सेन्सेक्स 72900 आणि निफ्टी 22100 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. ऑटो, मेटल आणि सरकारी बँकिंग क्षेत्रात बाजारात सर्वाधिक खरेदी होत आहे.

राहुल शेळके

Share Market Opening Latest Update 1 March 2024: शेअर बाजारात मार्चची सुरुवात सकारात्मक झाली आहे. शुक्रवारी बाजारातील प्रमुख निर्देशांक वाढीसह उघडले. सेन्सेक्स 72900 आणि निफ्टी 22100 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. ऑटो, मेटल आणि सरकारी बँकिंग क्षेत्रात बाजारात सर्वाधिक खरेदी होत आहे. निफ्टीमध्ये हिंदाल्को आणि टाटा स्टील 2-2 टक्क्यांच्या वाढीसह अव्वल आहेत. तर अपोलो हॉस्पिटल सर्वाधिक घसरला आहे.

शेअर बाजारात तेजी

क्षेत्रीय निर्देशांकाची स्थिती

चौथ्या तिमाहीत भारताच्या 8.4 टक्क्यांच्या GDP वाढीमुळे शेअर बाजार सकारात्मक राहण्याची अपेक्षा आहे. यासोबतच अमेरिकेतील महागाईचे आकडे नियंत्रणात आहेत, त्यामुळे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढला आहे.

शुक्रवारी शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात, निफ्टी मिड कॅप 100, बीएसई स्मॉल कॅप, निफ्टी आयटी, निफ्टी बँक, निफ्टी ऑटो, निफ्टी एफएमसीजी आणि निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस निर्देशांकात वाढ झाली तर निफ्टी फार्मा निर्देशांकात घसरण झाली.

कोणते शेअर्स तेजीत?

शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात वाढ झालेल्या शेअर्समध्ये बीपीसीएल, टाटा स्टील, हिंदाल्को, बजाज ऑटो, महिंद्रा अँड महिंद्रा, ओएनजीसी आणि टाटा मोटर्सचे शेअर्स वधारत होते. महिंद्रा अँड महिंद्रा, टाटा कंझ्युमर, सिप्ला आणि एसबीआय लाईफचे शेअर्स 52 आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचले आहेत.

S&P BSE SENSEX

अदानी समूहाच्या शेअर्समध्ये तेजी

अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्सवर आज गुंतवणूकदारांची नजर राहणार आहे. सातत्याने सुधारत असलेल्या आर्थिक कामगिरीमुळे अदानी समूहाच्या कंपन्यांचे कर्ज डिसेंबर तिमाहीत कमी झाले आहे.

अदानी समुहाच्या सर्व शेअर्समध्ये तेजी दिसून येत आहे. या तेजीमध्ये अदानी समूहाचे मार्केट कॅप 16.5 लाख कोटींच्या पुढे गेले आहे. अदानी समूहाचे मार्केट कॅप 16,61,592.04 कोटी रुपयांच्या उच्चांकावर पोहोचले.

बँक निफ्टीमध्ये जबरदस्त वाढ

बँक निफ्टी आज 388.45 अंकांच्या किंवा 0.84 टक्क्यांच्या वाढीसह 46,509 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. बँक निफ्टीमधील सर्व 12 शेअर्स वाढीसह व्यवहार करत आहेत आणि बँकांमध्ये सर्वाधिक तेजीत बँक ऑफ बडोदा आहे, ज्यात 1.36 टक्के वाढ झाली आहे.

PNB देखील 1.35 टक्क्यांनी वाढला आहे आणि बंधन बँक 1.30 टक्क्यांनी वधारला आहे. SBI 1.11 टक्के आणि फेडरल बँक 1.03 टक्के वाढीसह व्यवहार करत आहे.

मीडिया-फार्मा-हेल्थकेअरमध्ये घसरण

निफ्टीच्या क्षेत्रीय निर्देशांकामध्ये मीडिया-फार्मा-हेल्थकेअर वगळता इतर सर्व निर्देशांक वाढीसह व्यवहार करत आहेत. वाहन क्षेत्र सर्वाधिक 1.23 टक्क्यांनी वाढले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Election Voting Percentage : गोकुळसाठी ९९.९६ % मतदान; सतेज पाटील, हसन मुश्रीफांची प्रतिष्ठा पणाला, उद्या मतमोजणी, कोण मारणार बाजी?, तालुका निहाय आकडेवारी

Gokul Milk Union Election 2026 : गोकुळच्या मतदान केंद्रावर सुरक्षा व्यवस्थेचे तीनतेरा; मतपत्रीकेचे फोटो व्हायरल, नजर चुकवून मोबाईलवर काढले फोटो

Tukaram Munde Viral Video : तुकाराम मुंढेंचा VIDEO व्हायरल; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याच्या मागणीशी संबंध काय?

मुंबईत नोकरी मिळाली, जॉइनिंग करण्याआधीच आक्रीत घडलं, २३ वर्षीय तरुणीला नराधमाने संपवलं, पुलावरून ओढत नेत...; कुडाळमध्ये काय घडलं?

Latest Marathi News Live Update : रत्नागिरीत मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस; उकाड्याने हैराण नागरिकांना दिलासा

SCROLL FOR NEXT