
Share Market Investment Tips In Marathi: गुरुवारी फेब्रुवारीच्या एक्स्पायरी दिवशी बाजारात प्रचंड अस्थिरता दिसून आली. ट्रेडिंग सत्राच्या शेवटी, भारतीय बेंचमार्क निर्देशांक सेन्सेक्स-निफ्टी थोड्या वाढीसह बंद झाले. निफ्टी 22,000 च्या आसपास बंद झाला.
सेन्सेक्स 195.42 अंकांच्या अर्थात 0.27 टक्क्यांच्या वाढीसह 72,500.30 वर बंद झाला आणि निफ्टी 31.65 अंकांच्या म्हणजेच 0.14 टक्क्यांच्या वाढीसह 21,982.80 वर बंद झाला.
मंथली एक्स्पायरीच्या दिवशी बाजारात अस्थिरता होती, पण ती थोड्या वाढीसह बंद होण्यात यशस्वी झाल्याचे रेलिगेअर ब्रोकिंगचे अजित मिश्रा यांनी सांगितले. निफ्टीमध्ये 21,900 वर संघर्ष दिसत आहे जो शॉर्ट टर्म मूव्हिंग ॲव्हरेज म्हणजेच 20 डीईएमए जवळ आहे. अशा परिस्थितीत, असे दिसते की कोणत्याही रिकव्हरीमध्ये, निफ्टीला 22,100-22,250 च्या क्षेत्राभोवती रझिस्टंसचा सामना करावा लागेल.
याशिवाय अस्थिरता आणि ब्रेकआउटचे अयशस्वी प्रयत्न यामुळे व्यापाऱ्यांची चिंता वाढत आहे. अशा परिस्थितीत, आक्रमक व्यवहार टाळा आणि कोणतीही चढ-उतार झाल्यास पोझिशन हलकी करा असा सल्ला त्यांनी दिला.
वीकली मुदत संपण्याच्या दिवशी, चढ-उतारांमध्ये निफ्टी फ्लॅट बंद झाल्याचे एलकेपी सिक्युरिटीजचे रुपक डे म्हणाले. डेली चार्टवर, निफ्टी 21-दिवसांच्या एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेजच्या (21EMA) अगदी वर बंद झाला.
शॉर्ट टर्ममध्ये निफ्टीत कमजोरी येण्याची शक्यता आहे. खाली 21950 वर सपोर्ट आहे. जोपर्यंत निफ्टी 21950 च्या वर राहील तोपर्यंत रिकव्हरी होण्याची शक्यता आहे. त्याच वेळी, जर निफ्टी 21950 च्या खाली गेला तर ही घसरण 21800 पर्यंत वाढू शकते.
अदानी एन्टरप्रायझेस (ADANIENT)
अदानी पोर्ट्स (ADANIPORTS)
इंडसइंड बँक (INDUSINDBK)
टाटा कंझ्युमर्स (TATACONSUM)
ब्रिटानिया (BRITANNIA)
भारतीय कंटेनर निगम (CONCOR)
पीएफसी (PFC)
इंडियन हॉटेल (INDHOTEL)
पर्सिस्टंट (PERSISTENT)
गोदरेज प्रॉपर्टीज (GODREJPROP)
नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.