Share Market Updates Sensex, Nifty  Sakal
Share Market

Share Market Opening: शेअर बाजारात मोठी वाढ; सेन्सेक्स-निफ्टी तेजीत, कोणत्या क्षेत्रात खरेदी?

Share Market Today: आज मंगळवारी (14 मे) देशांतर्गत शेअर बाजार तेजीसह उघडले. सेन्सेक्स सुमारे 200 अंकांच्या वाढीसह 72,900 च्या वर व्यवहार करत होता, तर निफ्टी देखील 22,174 च्या आसपास व्यवहार करत होता.

राहुल शेळके

Share Market Opening Latest Update 14 May 2024: आज मंगळवारी (14 मे) देशांतर्गत शेअर बाजार तेजीसह उघडले. सेन्सेक्स सुमारे 200 अंकांच्या वाढीसह 72,900 च्या वर व्यवहार करत होता, तर निफ्टी देखील 22,174 च्या आसपास व्यवहार करत होता.

व्यवहाराच्या सुरुवातीस, सेन्सेक्स 200 अंकांनी वाढून 72,994 वर, निफ्टी 76 अंकांनी वाढून 22,180 वर आणि निफ्टी बँक 47,748 वर उघडला. यानंतर निफ्टी 100 हून अधिक अंकांनी घसरत होता. श्रीराम फायनान्समध्ये सर्वाधिक 5% वाढ झाली.

Share Market Today

कोणते शेअर्स तेजीत?

सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 21 शेअर्समध्ये वाढ होत असून 9 शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत. आज बाजारात सर्वात मोठी वाढ JSW स्टीलमध्ये झाली आहे आणि शेअर 1.79 टक्क्यांनी वाढला आहे. पॉवरग्रिड, एनटीपीसी, एमअँडएम, टाटा स्टील आणि मारुती सुझुकीचे शेअर्सही जोरदार तेजीसह व्यवहार करत आहेत.

Share Market Today

जागतिक बाजारपेठेत कशी आहे स्थिती?

हँग सेंग 0.9 टक्क्यांनी, शांघाय कंपोझिट 0.24 टक्क्यांनी आणि निक्केई 0.01 टक्क्यांनी वाढल्याने आज सकाळी आशियाई बाजार संमिश्र होते. दुसरीकडे, कोस्पी आणि ASX200 0.2 टक्क्यांपर्यंत घसरताना दिसत आहेत.

अमेरिकन बाजारात घसरण दिसून आली. डाऊ जोन्स 0.21 टक्क्यांनी घसरला, तर S&P 500 0.02 टक्क्यांनी घसरला. नॅस्डॅक कंपोझिट 0.29 टक्क्यांनी वधारला.

S&P BSE SENSEX

महागाईच्या आकडेवारीतून दिलासा

भारतातील ग्राहक किंमत निर्देशांक महागाई 11 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आली आहे, ज्यामुळे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया व्याजदरात कपात करेल अशी आशा निर्माण झाली आहे.

शेअर बाजारातील गुंतवणूकदार अमेरिकेच्या केंद्रीय बँक फेडरल रिझर्व्हकडून महागाईच्या आकडेवारीची वाट पाहत आहेत. शेअर बाजारातील तज्ञांनी झोमॅटोचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला असून, झोमॅटोच्या शेअर्सचे लक्ष्य 230 रुपयांपर्यंत वाढवण्यात आले आहे.

बीएसईचे बाजार भांडवल 400 लाख कोटी रुपयांवर

बीएसईचे बाजार भांडवल 399.16 लाख कोटी रुपये झाले आहे. सध्या बीएसईवर 3036 शेअर्सचे व्यवहार होत आहेत, त्यापैकी 2175 शेअर्सची वाढ आणि 738 शेअर्समध्ये घसरण सुरू आहे. 123 शेअर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही. 117 शेअर्सवर अप्पर सर्किट तर 52 शेअर्सवर लोअर सर्किट लागू करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वर्ल्डकपआधीच फूटबॉलविश्व हादरलं! मुंबईत नामांकित प्रशिक्षकाकडून महिला खेळाडूवर लैंगिक अत्याचार; व्हिडिओ बनवून ३ वर्षे ब्लॅकमेल

नवऱ्याचा शोध की स्वतःच अडकणार नव्या सापळ्यात? 'सन मराठी'च्या 'सौभाग्यवती वृंदा मोहन'च्या प्रोमोची सोशल मीडियावर चर्चा

Latest Marathi News Live Update : तुळजाभवानी मंदिरात भाविकांकडून दर्शनाच्या नावाखाली पैसे घेणाऱ्या त्या दोन पुजाऱ्यांना 5 वर्षे मंदिर प्रवेशबंदी

AUS vs BAN ODI: 0,0,0... ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांची बांगलादेशने उडवली दाणादाण! इतिहासात पहिल्यांदाच ओढावली अशी नामुष्की

होर्मुझमध्ये अमेरिकेचा जहाजावर हल्ला, २४ पैकी ३ भारतीयांचा मृत्यू; २१ जणांना काढलं बाहेर

SCROLL FOR NEXT