Share Market Today: शेअर बाजार सुरु झाल्यानंतर आज 'या' शेअर्सवर ठेवा लक्ष; काय आहे तज्ज्ञांचा अंदाज?

Share Market Investment Tips: शेअर बाजारासाठी सोमवारचा म्हणजेच 13 मेचा दिवस मोठ्या चढ-उताराचा होता. जवळपास 180 अंकांच्या इंट्राडे घसरणीतून सावरत निफ्टी 0.22 टक्क्यांच्या वाढीसह 22104 अंकांवर बंद झाला.
Share Market Investment Tips
Share Market Investment TipsSakal

Share Market Investment Tips (Marathi News): शेअर बाजारासाठी सोमवारचा म्हणजेच 13 मेचा दिवस मोठ्या चढ-उताराचा होता. जवळपास 180 अंकांच्या इंट्राडे घसरणीतून सावरत निफ्टी 0.22 टक्क्यांच्या वाढीसह 22104 अंकांवर बंद झाला. तर सेंसेक्स सुमारे 700 अंकांच्या इंट्राडे घसरणीतून सावरत 0.15 टक्क्यांच्या वाढीसह 72,776 अंकांवर बंद झाला. निफ्टी फार्मा 1.8 टक्क्यांनी वधारला. निफ्टी मेटल आणि रियल्टी 1.3 टक्क्यांनी वधारले. दुसरीकडे निफ्टी ऑटो 1.68 टक्क्यांनी घसरलेला पाहायला मिळाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

निफ्टीने डेली चार्टवर हॅमर पॅटर्न तयार केल्याचे रुपक डे म्हणाले. डेली चार्टवर तयार झालेली ही कँडल बाजारातील करेक्शननंतर तेजीचे संकेत देणारी ठरू शकते. दरम्यान, निफ्टीला 22,150 ते 22,200 झोनमध्ये रेझिस्टन्सचा सामना करावा लागू शकतो, तर खाली 21,950 वर सपोर्ट पाहायला मिळतोय.

रेलिगेअर ब्रोकिंगच्या अजित मिश्रा यांच्या मते वोलॅटिलिटी इंडेक्स म्हणजेच VIX मध्ये सातत्याने वाढ होत असतानाही निफ्टीला महत्त्वाच्या 21,800 च्या स्तरावर आधार मिळाला. बँकिंग क्षेत्रातील प्रमुख कंपन्यांमधील स्थिरता आणि आयटी तसेच ऊर्जा यांसारख्या क्षेत्रातील निवडक स्टॉक्स बाजाराला पुढे घेऊन जाऊ शकते.

Share Market Investment Tips
China-India Trade: हिंदी-चीनी भाई भाई! बहिष्कारानंतरही चीनमधून आयात वाढली, 100 अब्ज डॉलर्सची उलाढाल

आज 'या' शेअर्सवर ठेवा लक्ष

  • सिप्ला (CIPLA)

  • एशियन पेंट्स (ASIANPAINT)

  • एचडीएफसी लाईफ (HDFCLIFE)

  • आदाणी एंटरप्राइज (ADANIENT)

  • अदाणीपोर्ट (ADANIPORTS)

  • युपीएल (UPL)

  • औरोबिंदो फार्मा (AUROPHARMA)

  • लुपिन (LUPIN)

  • पॉलिकॅब (POLYCAB)

  • कमिन्स इंडिया (CUMMINSIND)

Share Market Investment Tips
Amit Shah: अमित शहांचा दावा! 4 जूनला बाजार नवीन उच्चांक गाठेल; गुंतवणूकदारांना दिला मोलाचा सल्ला

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com