mrunalini chitale
mrunalini chitale 
संपादकीय

अवचित भेट

मृणालिनी चितळे

पिं डारी-काफ्नीचा ट्रेक सुरू होण्यापूर्वीचा नैनिताल ते बागेश्वरपर्यंतचा प्रवास. वळणावळणाची घाटातील वाट अरुंद होत चाललेली. दुतर्फा अदबीनं उभे असलेले सूचिपर्णी वृक्ष. त्यांचे हिरव्या गर्द पानांचे झुबके आणि मध्यभागी असलेले पिवळसर ठिपके. हवेत छानसा गारवा. चार घरांच्या चिमुकल्या गावापाशी बस थांबली. समोर हिरवीगार दरी. दरीत पायऱ्यापायऱ्यांवर पद्धतशीरपणे केलेली भातशेती. निळंभोर आकाश. अचानक आकाशात सॅटिनच्या रिबिनीसारखा पांढरा शुभ्र पट्टा लहरत चालल्यासारखं वाटलं. ही तर पतंगाची शेपूट. डोळे ताणून सभोवार पाहिलं. पण भोवतालच्या परिसरात पतंग उडविणारं कुणी दिसेना नि आकाशात कुठे पतंगही. आपल्याला भास तर झाला नाही, असं म्हणेपर्यंत परत एकदा
तो पट्टा वाऱ्याबरोबर वरखाली होतहोत आमच्या समोरच्या झाडावर विसावला. ‘अरे, हा तर पॅरडाइज फ्लाय कॅचर. मराठीत या पक्ष्याला ‘स्वर्गीय नर्तक’ म्हणतात.’ कुणीतरी माहिती पुरवली. जेमतेम बुलबुलएवढ्या आकाराचा पक्षी. सफेद पांढरा रंग. चकाकत्या काळ्या रंगाचं डोकं. डोक्‍यावर इवलासा तुरा आणि शेपटीला रिबिनीसारखी असलेली दोन लांबलचक पिसं. एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर बसताना त्याची शेपूट हवेत गिरक्‍या घेत होती. काही क्षणांत तो उडून गेला. तो हिमालयात दिसला त्या अर्थी त्याचं वसतिस्थान तेच असणार असं मी गृहीत धरलं. त्यानंतर पुण्यात आल्यावर एकदा आम्ही दांडेलीला जायला निघालो, तेव्हा आमच्या एका पक्षितज्ज्ञ मित्रानं सांगितलं, की दांडेलीच्या जंगलात तुम्हाला हा ‘स्वर्गीय नर्तक’ नक्की दिसेल. आम्ही हरखून गेलो. तिथल्या जंगलात हिंडताना आमची सावध नजर बांबूच्या बेटांमध्ये आणि झाडाझुडपांतून डोकावणाऱ्या आकाशामध्ये त्याचा वेध घेत होती. पण खूपखूप शोधूनही तो नाहीच दिसला. आमच्या गाइडनं आम्हाला ‘स्वर्गीय नर्तकी’ दाखवली. पण तिला लांबलचक शेपूट नव्हती, की तिच्या नाचण्यात नर्तकाची शान.
तिच्यासाठी तरी ‘तो’ येईल म्हणून डोळे ताणूनताणून त्याला शोधलं, पण त्यानं काही दर्शन दिलं नाही. याही गोष्टीला बरेच दिवस उलटले. एकदा सकाळीसकाळी फर्गसन महाविद्यालयातून जात असताना अचानक हा ‘स्वर्गीय नर्तक’ नाचतनाचत समोर आला. आपली पल्लेदार शेपूट हलवत या झाडावरून त्या झाडावर बागडत राहिला. जणू त्याचा आजचा रंगमंचीय आविष्कार फक्त माझ्यासाठी होता. ‘स्वर्गीय नर्तका’ला शोधत नसताना त्याची झालेली अवचित भेट... या भेटीतील निरामय आनंद... आणि आपली आवडती वस्तू अचानक हातात पडणं... वा आपल्या गतकाळाशी बांधलेल्या, हव्याहव्याशा माणसांची अकस्मात गळाभेट होणं... तेव्हा वाटणाऱ्या अप्रुपाची जातकुळी अशीच तर असते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covid 19 : कोविडची पहिली लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञावर चीनची मोठी कारवाई; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे केलं बरखास्त

Nashik Crime News : बेद टोळीचा शुटर बारक्याला पुण्यातून अटक! 3 महिन्यांपासून होता फरार; गुंडाविरोधी पथकाची कामगिरी

Nashik Traffic Problem: नियोजनाअभावी वाहतुकीचा बट्ट्याबोळ! उमेदवारी अर्जामुळे गर्दी; वाहतूक पोलिसांची तारांबळ

Modi Rally Pune: "एका अतृप्त आत्म्यानं महाराष्ट्रासह देशाला अस्थिरतेत लोटलं"; PM मोदींकडून नाव न घेता शरद पवारांवर घणाघाती टीका

Latest Marathi News Live Update : महायुती महाराष्ट्रातल्या विकासाचा अनुशेष भरुन काढेल- मोदी

SCROLL FOR NEXT