Pune Edition Editorial On Aashadi at Dhing Tang Column
Pune Edition Editorial On Aashadi at Dhing Tang Column  
संपादकीय

आषाढी! (ढिंग टांग!)

सकाळवृत्तसेवा

घाट वलांडुनी। आलो तुझ्या दारी। 
वाहिली गा वारी। पायी तुझ्या।। 

मारिली मजल। नच घेता श्‍वास। 
गाठिली गा वेस । पंढरीची।। 

आता विठुराया। देई गा आसरा। 
लाविला धोसरा। केव्हाचा म्यां।। 

औत नि अस्तुरी । ठेविली माघारी। 
आलो तुझ्या दारी। टाकोटाक।। 

नको झाला मज । येर भवताप। 
लागली गा धाप। धाई धाई।। 

नको तो वेव्हार। कर्जाचा कहार। 
वोसाड शिवार। पडो तैसे।। 

पुरता पुरेना। सौंसाराचा सोस। 
किती नासधूस। पाहावी म्यां?।। 

अस्मान फाटते। जिमिन गाडते। 
ऋण ते नाडते। दुष्टचक्री।। 

पोट दीडवीत। काढे पिदवणी। 
आता विनवणी। काय करु?।। 

निघो झाला जीव। ऐशा व्यूहातुनी। 
बाहेरआतुनी। भंगलो म्यां।। 

पुरे झाले आता । ऐसेनि म्हणालो। 
आणि म्या निघालो। सत्वरचि।। 

एकाचेनि दोन। दोनाचे गा चार। 
चारांचे हजार। ऐसे झाले।। 

रस्त्यात चालती। सारे पादचारी। 
आम्ही वारकरी। वेगळाले।। 

पोटार्थाशी आम्हा। नलगे गा काही। 
आम्हालागी पाही। श्रीहरी रे।। 

प्रवाहो चालिला। भजनाची झड। 
ृमृदंगाची पूड। गर्जे नभीं।। 

किती दिस केली। ऐसी वाटचाल। 
ऊरी उलाघाल। होत आहे।। 

कीर्तनाचे रंगी। घुळघुळे टाळ। 
वैष्णवांची माळ। डोलते गा।। 

उचला ना पाय। अक्षी भराभरा। 
पंढरीचा गोजिरा। वाट पाहे।। 

तुळशी वृंदावन। शोभते मस्तकी। 
ताई आणि आक्‍की। चालतेल्या।। 

काय सांगू आता। तुझ्या शिरावर। 
आहे सर्वभार। वाहिलेला।। 

आली रे पंढरी। धरा रे रिंगण। 
करा रे धिंगण। हरिनामाचे।। 

येता पंढरीसी। दिसला कळस। 
मनात तुळस। फुलारली।। 

आणि येकायेक। कडाडे आभाळ। 
विजेचा कल्लोळ। एक झाला।। 

कळो आला मज। सारा अर्थभार। 
अवघा येरझार। विठ्‌ठलु रे।। 

-ब्रिटिश नंदी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : शरद पवार अन् उद्धव ठाकरेंना बघण्यासाठी इचलकरंजीत चेंगराचेंगरी

IPL 2024: चेन्नईकडून 36 वर्षीय गोलंदाजाचं पदार्पण! पहिल्याच सामन्यात झाला अनोखा विक्रम

Raigad News : महाविकास आघाडीची कितीही नाचत असतील भुते, तरी रायगड मध्ये हरणार आहेत अनंत गीते - रामदास आठवले

IPL 2024, CSK vs PBKS Live Score: पंजाबला पहिला धक्का, चेन्नईकडून पदार्पण करणाऱ्या ग्लिसनला मिळाली पहिली विकेट

Eknath Shinde : मुख्यमंत्री झाले गुरुजी, कामियाची घेतली शाळा.. ''पुरणपोली नहीं पुरणपोळी, ठाना नव्हे ठाणे..'' Video Viral

SCROLL FOR NEXT