Dhing_Tang_Womens_Day
Dhing_Tang_Womens_Day 
satirical-news

ढिंग टांग : बाईचे अभंग!

ब्रिटिश नंदी

Women's day 2021 : 

आम्ही पुरुष पुरुष ।
उच्च ज्ञातीचे सदृश्य।
आम्हा काळजी विशेष।
बाईकांची।।

काय वानू आता देवा ।
पूज्य बाईचा महिमा ।
तिच्याविण काय आम्हा।
अर्थ आहे?।।

एका बाईसाठी किती ।
संगर नि महायुद्धे।
पराक्रमी थोर गद्धे ।
धारातीर्थी ।।

कुण्या बिराण्या गं देशी ।
कुणी राणी क्लिओपात्रा।
तिच्यासाठी युध्दे सत्रा। ।।

झडली गा।।

बाई गाजविते तेग।
बाई घडविते जग।
बाई जिरवते रग।
इतिहासी ।।

मज वाचीव गे बाई।
तूचि देवी, तूचि माता।
गातो आम्ही येताजाता ।
तुझे स्तोत्र।।

कधी म्हणो नये कोणी।
बाई पायीचीच व्हाण।
गावे तिचे यशोगान।
आज तरी ।।

बाई यंव आणि त्यंव।
बाई नित्य अभिनव।
नर आणिक पुंगव।
शरणार्थी।।

बरे केले देवा देवा ।
नाही केलो मज बाई।
बापयाची हीच ध्याई।
धन्य झाली।।

आम्हा बापयांचे जगी।
सारे आम्ही शहाजोग।
शक्य तसा बाईभोग।
घेतो रोज ।।

बाईपण थोर होय।
तीच अंतराची कोय।
तशी शेजेची गा सोय।
एरवी हो ।।

म्हणू मोठ्या मोठ्या तोंडी।
बाई नव्हे, तूचि माता।
आणि घालू घरी लाथा।
बेलाशक ।।

ढोल असो वा गंवार।
असो पशु किंवा नार।

ताडनाचा अधिकार।
तिन्ही लोकीं।।

ऐसा सारा दंभ दंभ ।
भरलासे माझ्या अंगी।
कसा करु सांगोपांगी।
उपचार ।।

विश्वंभरा , तुझ्या गावी।
उभी एकली विठाई।
का रे दूर रखुमाई।
उभी केली?।।

बाई आणिक पुरुष।
दोन्ही अद्वैताचे अंग।
एक एकाचे अर्धांग।
आहे ना रे?।।

विठो जेथ आहे उभा।
तेथ रखुमाईचे ठाण।
साजिरे गा समचरण।
विटेवरी।।

- संपादकीय लेख वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 DC vs RR Live Score: संजू सॅमसनचे दमदार अर्धशतक, राजस्थानच्या १०० धावाही पार

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

Rohit Pawar: रोहित पवारांनी शेअर केलेल्या 'त्या' व्हिडिओनंतर PDCC बँकेच्या मॅनेजरसह बँकेवर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT