Dhing Tang
Dhing Tang sakal
satirical-news

ढिंग टांग : गोलगप्पा परिषदेची फलश्रुती...!

ब्रिटिश नंदी

जप्पानचे प्रधानसेवक फुमिओ किशिदा यांचे भारतात आगमन झाले. पहिल्याच दिवशी त्यांना इडली आणि गोलगप्प्यांचा आस्वाद घ्यावा लागल्याने दुसऱ्या दिवशी, मंगळवारी द्विपक्षीय चर्चेत बराच खंड पडला.

जप्पानचे प्रधानसेवक फुमिओ किशिदा यांचे भारतात आगमन झाले. पहिल्याच दिवशी त्यांना इडली आणि गोलगप्प्यांचा आस्वाद घ्यावा लागल्याने दुसऱ्या दिवशी, मंगळवारी द्विपक्षीय चर्चेत बराच खंड पडला. आपापले उत्तम तंत्रज्ञान परस्परांना देण्याबाबत उभयपक्षी करारावर स्वाक्षऱ्या झाल्या, हे सांगताना आम्हाला विलक्षण आनंद होत आहे. गोलगप्प्यांचा आस्वाद जरा जास्तच घेतल्याने फुमिओसान यांनी बुलेट ट्रेनच्या वाढीव तंत्रसाह्य पुरवण्याच्या करारपत्रावर घाईघाईने सह्या केल्याचे समजते. एकंदरित ही गोलगप्पा परिषद सुफळ संप्रुण जाहली असेल म्हटले पाहिजे.

जपानी तंत्रज्ञान सुविख्यात आहे, परंतु, त्याहीपेक्षा सुविख्यात भारतीय तंत्रज्ञान आहे, याचा आम्हांस सार्थ अभिमान वाटतो. जपानी पुष्परचनेची कला सुप्रसिध्द आहे, परंतु, गोलगप्पा रचण्याचे कौशल्य अधिक कलापूर्ण आहे, असे आम्हाला वाटते. लस्सीत दही आणि साखरेचे प्रमाण अचूक राखताना त्याच्यावर मलईचा लपका रचण्यासाठी विशेष प्रतिभा लागते. किंवा दाक्षिणात्य इडलीवर सांबार कधी ओतावे, आणि चटणी कधी माखावी, याचेही तंत्रज्ञान विशेष प्रावीण्य असल्याशिवाय अवगत करता येणे कठीण! इडली हा तसा दिसावयास निरुपद्रवी पदार्थ असला तरी प्रत्यक्षात घातकी आहे. उडप्याकडील इडली मऊसूत आणि घरी केलेली इडली ही फारतर विटेपेक्षा मऊ का होते, हे कोडे उलगडण्यासाठी प्रशिक्षणाची गरज असते. असो.

तत्पूर्वी, सोमवारी राष्ट्रपती भवनाच्या मागील बाजूस गर्द वनराईत सजवलेल्या बुद्धजयंती पार्कमध्ये स्टॉल लावण्यात आले होते. तेथे फुमिओसान यांची सरबराई करण्यात आली. तसेच भारतीय तंत्रज्ञानाचे प्रत्यक्ष प्रेझेंटेशन आणि डेमोदेखील त्यांना देण्यात आला. त्यामुळे ते इतके प्रभावित झाले की, विचारता सोय नाही. तरीही आम्ही त्यांस विचारले, तेव्हा त्यांनी उत्तर दिले नाही. कां की तेव्हा त्यांच्या मुखात गोलगप्पा सारण्यात आला होता. थोड्या वेळाने ते म्हणाले की, ‘‘पुरियामी खातो!’’ जपानमध्ये गोलगप्प्यास ‘पुरियामी खातो’ असे म्हणत असावे, असा गैरसमज त्यामुळे पसरला. परंतु, ते ‘ मी पुऱ्या खातो’ असे म्हणत असल्याचे मागाहून लक्षात आले! असो, असो!!

गोलगप्पा हा पदार्थ विविध नावांनी ओळखला जातो. कुणी सत्यदेव म्हणते, कुणी सत्यनारायण! नावात काय आहे? दिल्लीतला गोलगप्पा मुंबईत पाणीपुरी म्हणून मुखात सोडला जातो. कोलकात्यात त्याचा पुचका होतो. तथापि, गोलगप्पा खाण्याचे तंत्रज्ञान अद्यापि जपानमध्ये विकसित झालेले नाही, हे सूक्ष्म आंतरराष्ट्रीय निरीक्षण आम्ही येथे नमूद करु. टमटमीत पुरी (उजव्या हाताच्या) अंगठ्याने हलकेच फोडावी. त्यात चवीप्रमाणे रगडा, हरभरा, किंवा मूग आदी लज्जतदार पदार्थ भरावेत. वर चिंचपुदिन्याचे पाणी काठोकाठ भरुन तो मुखाशी न्यावे. हे सारे भय्याच्या शुभहस्ते झाले, तरच त्याचे रुपांतर साग्रसंगीत गोलगप्प्यात होते. दर्दी मंडळींना याची सवय असते. परदेशी मंडळींचा मात्र ऊर्ध्व लागण्याची शक्यता असते. म्हणूनच फुमिओसान यांना नमोजीसान यांनी गोलगप्पा खाण्याचे आव्हान दिले.

अणुबॉम्ब पचवलेल्या देशाच्या प्रधानसेवकाला गोलगप्प्याची काय पत्रास? पण त्यांनी पहिल्याच गोलगप्प्याला लोहा मानला, आणि गोलगप्पा तंत्रज्ञान हे श्रेष्ठ असल्याचे प्रशस्तिपत्र, तीन लस्सीचे गिलास आणि दोन कैरी पन्ह्याचे पेले रिचवत दिले. ‘जप्पान आपडा बॅस्ट फ्रेंड छे, एने लस्सीनिर्मितीनां टेक्नोलोजी हुं एमज आपीश’ असे आश्वासन नंतर नमोजीसान यांनी दिले. कैरीच्या पन्ह्याचे ट्रेड सिक्रेट मात्र जपानला देण्यात आलेले नाही.

गोलगप्पा आणि लस्सीशास्त्राच्या बदल्यात बुलेट ट्रेनसह जवळपास ७० अब्ज डॉलरचे करार भारताशी करण्यात येतील, असे फुमिओसान यांनी कबूल केले, आणि वर एक सुक्की पुरी मागून घेतली. असोच.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajwal Revanna: प्रज्वल्ल रेवण्णाविरोधातील फास आणखी आवळला! निघालं अटक वॉरंट

IPL 2024 RCB vs CSK Live Score: बेंगळुरूला दुसरा धक्का! अर्धशतकानंतर डू प्लेसिस आऊट, पण विकेटमुळे झाला ड्रामा

CAA Beneficiary: आधी सीएएची प्रमाणपत्रं वाटली आता तेच लाभार्थी थेट मोदींसोबत स्टेजवर!

Video: 'सिग्मा मेल' म्हणून केलं रोस्ट, धमकी मिळाल्यावर कॅरी मिनाटीने टेकले गुडघे, काय होतं व्हिडिओमध्ये? पाहाच

MI vs LSG: मुंबईच्या पराभवानंतर रोहितबरोबर नीता अंबानींची आधी गहन चर्चा अन् मग ड्रेसिंग रुममध्ये दिलं स्पेशल मेडल, Video व्हायरल

SCROLL FOR NEXT