hous of bamboo
hous of bamboo sakal
संपादकीय

हौस ऑफ बांबू : मराठी साहित्याचं स्ट्रक्चरल ऑडिट...!

कु. सरोज चंदनवाले

नअस्कार! कोथरुडहून टिळक रोडला जाणं हे वाटतं तितकं सोपं उरलेलं नाही. रस्ता फ्रॅक्चर्ड आहे! त्यात पुण्यात बघावं तिथं मेट्रोची कामं चाललेली. त्यामुळे रस्तोरस्ती कंपाऊण्ड फ्रॅक्चर! मध्यंतरी चांदणी चौकातली अवस्था तर खुब्याचं हाड मोडल्यागत झाली होती. आता तशीच स्थिती विद्यापीठ चौकाच्या सिग्नलपाशी झाली आहे. मी म्हणत्ये, माणसानं जगावं तरी कसं?

रस्ता फ्रॅक्चर्ड असला तरी कोणाला काही फरक पडत नाही. कुणीही एक्स रे काढून घेत नाही नि लागलीच प्लास्टर वगैरे करत नाही. रस्ता फ्रॅक्चर्ड असल्यानं कुणाच्या भावना दुखावत नाहीत. कुणाच्या अस्मितेला धक्का लागत नाही. धर्मनिंदा होत नाही. राष्ट्रद्रोह होत नाही. रिझर्वेशन लागत नाही नि सरकारही बदलत नाही.

रस्ता फ्रॅक्चर्ड आहे, पण त्यांचं करायचं काय? आमचे लाडके लेखक श्यामराव मनोहर यांच्या आगामी कादंब्रीची वाट पाहून पाहून माझ्या मनातल्या रस्त्यांना तडे गेले आहेत, हे वाचकांच्या लक्षात आलंच असेल.

कोथरुडच्या हाडमोड्या रस्त्यावरुन मी गेल्या आठवड्यात महाराष्ट्र साहित्य परिषदेत गेले होते.

‘मसाप’ आणि ‘पुण्यभूषण फौंडेशन’तर्फे उत्कृष्ट दिवाळी अंकांना पुरस्कार देण्यात आले. कार्यक्रमाला गेले. पाहाते तो काय, पुण्यातले सगळे फ्रॅक्चर्ड रस्ते ओलांडून आमचे डॉ. मोहननाना आगाशे (टोपीसकट) मधोमध हजर!! त्यांच्या बाजूला हुबेहूब श्याम मनोहर बसलेले!! आपल्याला इथं का बोलावलंय, हे न कळल्याचे भाव धारण करुन श्याम मनोहरांनी सभागृहाकडे नजर टाकली. मग डॉ. नाना आगाशेंच्या कानात म्हणाले, ‘खूप लोक आहेत’

नाना आगाशे गार! पलिकडल्या बाजूला आमचे संजय भास्कर जोशी ‘हल्लीच्या लेखकांना कष्ट घ्यायला नको, भंपक लिहितात’ असं कुणाला तरी कुजबुजल्यागत सांगत होते. पण ते संजय भास्करांचं कुजबुजणं!! पार बादशाहीच्या चौकापर्यंत ऐकू जाणारं!!

एका बाजूला (कोटधारी) प्रा. मिलिंद जोशी आणि ‘पुण्यभूषण’चे सतीश देसाईजी एकमेकांनाच वेळ विचारत होते. अखेर कार्यक्रम सुरु झाला. मजल दरमजल करीत श्याम मनोहरांनी ध्वनिक्षेपकापर्यंतचा रस्ता कापला. ‘‘रस्ते फ्रॅक्चर्ड आहेत...’’ त्यांनी घोषणा केली. उपस्थित प्रेक्षकांनी चुकून आपण महापालिकेच्या सभागृहात येऊन बसलो की काय, हे बघून घेतले.

रस्त्यांची बिकट अवस्था मांडून झाल्यावर श्याम मनोहरांनी यू टर्न घेतला, खुर्ची गाठली. मग संजय भास्करांचा गडगडाट सुरु झाल्यानं ‘मसाप’समोरच्या रस्त्याला तडे गेले. मंचावर बसलेल्या नाना आगाशेंनी शांतपणे खिशातून कापसाचे बोळे काढले. (ते मानसशास्त्राचे का असेना, पण खरेखुरे डॉक्टर असल्याने कापसाचे बोळे नेहमी खिशात ठेवतात.) इकडे जोशींसरांना घाम फुटलेला. (घाला अजून कोट... उकडणार नाही तर काय?) जोशीसर ‘प्रा.’ आहेत, पण ते सिविल इंजिनीअरिंगवाले.

रस्तेबांधणीतलंही त्यांना बेसिक तरी कळत असणार! त्यामुळे ‘रस्ते फ्रॅक्चर्ड आहेत’ या श्याम मनोहरांच्या उतारेवजा अनाऊन्समेंटमुळे स्ट्रक्चरल ऑडिटची जबाबदारीही आपल्यावर येणार, या कल्पनेने त्यांना घाम फुटला असावा. पण त्यांनी शेवटी ‘‘श्याम आणि मोहन यांच्या उपस्थितीमुळे हा सोहळा मनोहर झाल्याचे’’ सांगून कार्यक्रम साहित्यविषयक आहे, याची जाणीव करुन दिली. संपूर्ण कार्यक्रमातला हा एकमेव ‘ललित’ भाग!! बाकी सगळं सिविल इंजिनीअरिंग, स्ट्रक्चरल ऑडिट, रस्तेबांधणी, डांबर वगैरे!!

एकाही वक्त्यानं दिवाळी अंकांचे पुरस्कार मिळवणाऱ्या मानकऱ्यांबद्दल चकार शब्द काढला नाही. ‘फ्रॅक्चर्ड तर फ्रॅक्चर्ड, रस्ता पकडून घरी गेलेलं बरं’ असं प्रत्येक मानकऱ्याला वाटलं असणार! मीसुद्धा निमूटपणे रिक्षावाल्याला थांबवून ‘कोथरुडला येणार का?’ विचारलं. तो म्हणाला, ‘रस्ता फ्रॅक्चर हुआ है!’ मग उत्सुकतेने मी चालत निघाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Accindet: कोणालाही पाठीशी घालणार नाही; अजित पवारांनी केले स्पष्ट

Latest Marathi News Live Update: बंगालमध्ये वाद पेटला, TMC-ISF समर्थकांमध्ये हाणामारी, भाजपचा आरोप- पराभवाच्या भीतीने हिंसाचार

Amhi Jarange: 'आम्ही जरांगे -गरजवंत मराठ्यांचा लढा' चित्रपटात 'हा' अभिनेता साकारणार अण्णासाहेब पाटलांची भूमिका; टीझर रिलीज

Cristiano Ronaldo: शेवटच्या क्षणी पराभव, नेमारनंही डिवचलं अन् रोनाल्डोला अखेर अश्रु अनावर, पाहा Video

Chennai-Mumbai Flight: 172 प्रवाशांच्या जीवाशी खेळ, चेन्नई-मुंबई फ्लाईटमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी, विमान अज्ञात स्थळी हलवले

SCROLL FOR NEXT