Career
Career 
सप्तरंग

अभियांत्रिकी, फार्मसीचे प्रवेश

सकाळ वृत्तसेवा

वाटा करिअरच्या
अभियांत्रिकी, फार्मसीत पहिल्या फेरीची प्रवेश प्रक्रिया अभियांत्रिकी, फार्मसी, आर्किटेक्‍चर, हॉटेल मॅनेजमेंट या शाखांच्या प्रवेशासाठी पात्र विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर त्यांना मेरिट क्रमांकाचे वाटप केले जाते.

त्यानंतर ऑनलाइन पसंतीक्रम म्हणजेच विकल्प नोंदविल्यानंतर पहिल्या फेरीसाठीचे वाटप संकेतस्थळावर जाहीर केले जाते. त्यानंतर www.mahacet.org या संकेतस्थळावरील वेळापत्रकाप्रमाणे व सूचनेनुसार योग्य त्या ठिकाणी सुविधा केंद्रामध्ये जाऊन रिपोर्टिंग करणे 
गरजेचे असते.

पहिल्या क्रमांकाच्या विकल्पाचे वाटप : पहिल्या फेरीमध्ये पहिल्याच, म्हणजेच एक नंबरच्या पसंतीक्रमाचे वाटप झाल्यास त्याला त्याच्या आवडीचा टॉप प्रवेश मिळाल्यामुळे वाटप आपोआप फ्रिज म्हणजे गोठविले जाते. संबंधित प्रवेश विद्यार्थ्यास घ्यावाच लागणार असून, तो न स्वीकारल्यास विद्यार्थी केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या (कॅप) पुढील फेऱ्यांमध्ये सहभागी होण्यास पात्र नसेल. पुढील प्रवेश प्रक्रियेतून तो बाद होईल. संबंधित विद्यार्थ्याने प्रवेश उपस्थिती केंद्रावर जागा स्वीकृतीसाठी उपस्थित राहून सूचनेप्रमाणे योग्य ती कार्यवाही करणे आवश्‍यक आहे. त्यानंतर संस्थेत हजर राहून प्रवेशासाठीची योग्य ती कार्यवाही करणे गरजेचे आहे. विद्यार्थी प्रवेश उपस्थिती केंद्रावर जागा स्वीकृतीसाठी हजर राहिला नाही, तर त्याला वाटप करण्यात आलेल्या जागेवरील त्याचा हक्क आपोआप गमावतो. ही जागा पुढील फेरीतील वाटपासाठी उपलब्ध होईल.

दुसऱ्या किंवा त्यापुढील विकल्पाचे वाटप -
   विद्यार्थ्याला पहिल्या पसंतीक्रमाखेरीज इतर कोणत्याही पसंतीक्रमावरील जागेचे वाटप झाल्यास आणि विद्यार्थी त्या वाटपाने समाधानी असल्यास, कॅपच्या पुढील फेरीत सहभागी होण्याची त्याची इच्छा नसल्यास विद्यार्थी स्वतः निर्णय घेऊन त्यास देऊ केलेली जागा गोठवू शकतो. अशा प्रकारे अशा जागा गोठवल्यानंतर विद्यार्थी प्रवेश उपस्थिती केंद्रावर जागा स्वीकृतीसाठी उपस्थित राहून सूचनेप्रमाणे योग्य ती कार्यवाही करेल व संस्थेत हजर राहून प्रवेशासाठीची योग्य ती कार्यवाही करेल. परंतु जागा गोठवूनही प्रवेश उपस्थिती केंद्रावर हजर राहिला नाही, तर या जागेवरील आपला हक्क गमावतील.

   विद्यार्थ्याला पहिला विकल्प सोडून इतर कोणत्याही विकल्पाचे वाटप झाले, तसेच हे जागावाटप विद्यार्थ्याने स्वीकारले आणि प्रवेश उपस्थिती केंद्रावर हजर राहून जागा स्वीकृती केली, असे विद्यार्थी कॅपच्या पुढील फेरीमध्ये भाग घेऊन बेटरमेंट म्हणजेच वरच्या पसंतीक्रमामधील जागा मिळविण्याकरिता पुढील फेरीत सहभागी होण्यास पात्र असतील.

दुसऱ्या फेरीसाठी पात्र कोण? 
ज्यांना पहिल्या फेरीमध्ये दुसऱ्या किंवा त्यापुढील कोणत्याही विकल्पाचे वाटप झालेले होते व त्यांनी केंद्रावर उपस्थित राहून जागा स्वीकृत केली होती, असे सर्व विद्यार्थी यासाठी पात्र आहेत. 

थोडक्‍यात, पहिल्या फेरीत मिळालेला प्रवेश स्वीकारणे, प्रवेश उपस्थिती केंद्रावरील प्रक्रिया पूर्ण करणे, पुढील फेरीत भाग घेऊन चांगल्या पसंतीक्रमाची अपेक्षा ठेवणे हा उत्तम मार्ग आहे. प्रवेश नाकारल्यास पुढील फेरीत तो मिळेलच याची खात्री नसते. याच प्रमाणे फार्मसी, आर्किटेक्‍चरसह  उर्वरित अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया वरीलप्रमाणेच असेल. अर्थातच वेळापत्रक व बदलणाऱ्या नियमांसाठी सतत संकेतस्थळाच्या संपर्कात राहावे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Loksabha: नाशिक मोठा ट्विस्ट; स्वामी शांतिगीरी महाराजांनी शिवसेनेकडून दाखल केली उमेदवारी, पण...

Lok Sabha Election 2024: "PM मोदींची उमेदवारी रद्द करा"; निवडणूक आयोगाला निर्देश देण्यास हायकोर्टाचा नकार

Latest Marathi News Live Update: अमित शहांच्या एडिटेड व्हिडिओ प्रकरणी तेलंगानाच्या मुख्यंत्र्यांना समन्स

Google layoffs: सुंदर पिचाई यांचा मोठा निर्णय; संपूर्ण 'पायथन' टीमला दाखवला बाहेरचा रस्ता, काय आहे कारण?

Team India squad T20 WC24 : विकेटकीपर म्हणून संजू सॅमसन बनला निवडकर्त्यांची पहिली पसंती; कोणाचा पत्ता झाला कट?

SCROLL FOR NEXT