Madhurani-Prabhulkar
Madhurani-Prabhulkar 
सप्तरंग

देवा तुझे किती..!

सकाळ वृत्तसेवा

सेलिब्रिटी व्ह्यू - मधुराणी प्रभूलकर, अभिनेत्री
झुले बाई झुला, माझा झुले बाई झुला
पडू आजारी मौज हीच वाटे भारी
पिवळे तांबूस ऊन कोवळे पसरे चौफेर
लहान माझी बाहुली मोठी तिची सावली

‘कवितेचं पान’ या माझ्या वेबसीरिजसाठी बालकवितांचा एपिसोड करायचा मी ठरवला होता. तुमच्या माझ्या स्मरणातल्या काही जुन्या परिचित आणि काही नवीन बालकविता निवडून त्या बालगोपाळांकडून म्हणून घ्यायच्या आणि त्या एखाद्या छानशा ठिकाणी शूट करून अपलोड करायच्या...! लहान मुलं आणि कविता या दोन्ही माझ्या जिव्हाळ्याच्याच गोष्टी. सुरवात झाली एका मखमली प्रवासाला...

आठवणीतल्या कविता भाग १-४ घेऊन बसले. त्यातून काही साध्या सोप्प्या कविता निवडल्या. मंगेश पाडगावकर, विंदा करंदीकर, शांता शेळके, ग. ह. पाटील, संगीता बर्वे यांचे दिेखील काही संग्रह माझ्याकडे होते. त्यातूनही कविता शोधल्या. अशा ५० कविता बाजूला काढल्या आणि मग एक दिवस लहान मुलांच्या ऑडिशन्स घ्यायच्या ठरवल्या. सोशल मीडिया, काही ग्रुप्स आणि मित्रमैत्रिणींना कळवलं. अमुक ठिकाणी तमुक वाजता वगैरे... कुठलीही एक कविता पाठ करून यायची इत्यादी, इत्यादी. 

खरंतर या कोवळ्या फुलांची अशी परीक्षा घ्यायची, काहीतरी निकष लावून कुणाला निवडायचं, कुणाला ‘नाही’ म्हणायचे हे माझ्या तत्त्वात बसणारंच नव्हतं. ‘येतील त्या सगळ्यांना घ्यायचंच’, असं मी ठरवलं होतं. निकष एकच होता, त्यांना खरी इच्छा आहे, की पालकांनी दटावून आणलंय. स्वतःहून आलेल्या प्रत्येकासाठीच माझ्याकडे जागा होती. खरंतर लहान मुलांसाठीच्या अशा कुठल्याही प्रोजेक्‍टसाठी मुलांपेक्षा पालकांचीच परीक्षा घेणे आवश्‍यक असते. कारण मुलांना घेऊन येणे-नेणे, थांबणे, तयारी करून घेणे, बोलवू तेव्हा तालमीला, शूटिंगला घेऊन येणे या सगळ्यांसाठी पालकांचा उत्साह आणि संयम याचा कस लागतो. पण ‘मराठी कवितांसाठी’ आलेले पालक तितके सुजाण असणार हा माझा अंदाज होता आणि तो खरा ठरलाच. 
वय वर्षे ४ ते १४ मधली ही धमाल मुलं, मुलं कसली हसरी फुलंच, मला मिळाली. त्यांच्या वयोगटानुसार कविता वाटल्या. आमच्या तालमी सुरू झाल्या. शूटिंग करायचं ठरवलं. तो होता गेला हिवाळा! हिवाळा हा ऋतू शूटिंगला एकदम सुंदर असतो. झालं सगळं सेट. पण अचानक काही अडचणी आल्या आणि शूट झालं रद्द! मग मुलांच्या परीक्षा... त्यामागून आलेला रखरखीत उन्हाळा... असं करत ३-४ महिने गेलेच. मग मी ठरवलं पावसाळा आणि शाळा सुरू होण्याआधी करायचंच. सगळ्यांना मेसेज केले. मला वाटलं मध्ये ३-४ महिन्यांची गॅप गेल्याने, या सगळ्यांचा मूड तर गेला नसेल? पण छे! सगळे त्याच उत्साहाने हजर! जोरदार तालमी सुरू झाल्या. कॉस्च्युम घालून, कॅमेरासमोर तालमी, माझ्या लोकेशन व्हिजिट, शॉर्ट डिव्हिजन इतर तांत्रिक गोष्टी, सगळी जुळवाजुळव सुरू झाली. आमचा मित्र चिन्मय लेलेने त्याचे वृंदावन ॲग्रो रिसॉर्ट आम्हाला शूटिंगला दिलं. जूनच्या पहिल्या शनिवार-रविवारी शूटिंग ठरलं. 

प्रमोदसारख्या गेले १५ वर्षे मी एका हरहुन्नरी दिग्दर्शकासोबत संसार करतेय. ‘अक्‍यूट मॅनेजमेंट’साठी त्याचे इंडस्ट्रीमध्ये उदाहरणं दिली जातात. त्याच्या नकळत मी त्याच्याकडून अनेक गोष्टी शिकलेय. त्या सगळ्या वापरून शूटिंगसाठी सज्ज झाले. सिंहगड पायथ्याशी आमचं लोकेशन आणि कॉल टाइम होता सकाळी ६.३० वाजताचा. कारण कोवळ्या उन्हात काही शॉट्‌स घेणं आवश्‍यक होतं.

आम्ही ५.३० वाजता निघालो. पाहते तर आकाशात ढग, भुरभुर पाऊस सुरू. संपूर्ण शूट आउट डोअर करायचं होतं. आता काय करायचं. पोटात गोळा आला. इतक्‍या दिवसांची आमची मेहनत, लागलेले पैसे, मुलांचा उत्साह यावर खऱ्या अर्थाने पाणी फिरणार का काय, असं मनात आलं. सेटवर पोचलो तरी पाऊस थोडा-थोडा होताच. आभाळ भरलेलं होतंच. मला परकर पोलक्‍यातल्या चिमण्या चिवचिवताना दिसल्या आणि मी आभाळाकडे बघत म्हटलं, ‘‘पावसा, तू ये, तू यायलाच हवायंस, पण आमचं एवढं हे कार्य पार पडू दे.’’ आणि गणपती बाप्पा मोरया म्हणत सुरवात केली. काय सांगू, दोन्ही दिवस आमचं शूटिंग सुरळीत पार पडलं. अगदी वेळेवर नव्हेतर वेळेच्या आधीच. दुसऱ्या दिवशी ६ वाजता संपणारं आमचं काम १ वाजताच संपलं. जेवणं झाली, गाडीत बसलो, निघालो आणि गडगडाटासह जोरदार पाऊस पडला. खिडकीच्या काचा उघड्या ठेवून आम्ही चक्क भिजलो. गालांवरून थेंब ओघळत होते. त्यातले पावसाचे कुठले नि आसवांचे कुठले, कुणी सांगावे?
हा एपिसोड पाहा २९ जूनला यूट्यूबवर, ‘कवितेचं पान’ या वेबसीरिज’मध्ये!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs DC Live Score: चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात अडकले दिल्लीचे धुरंधर, पण कुलदीपच्या फिनिशिंग टचमुळे कोलकातासमोर 154 धावांचं लक्ष्य

Covid 19 : कोविडची पहिली लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञावर चीनची मोठी कारवाई; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे केलं बरखास्त

Govinda Dance: गोविंदानं डान्स करुन केला धैर्यशील मानेंचा प्रचार; व्हिडिओ पाहा

Viral Video: गिल लावत होता फिल्डिंग अन् विराटने अचानक येऊन दिला जोरात धक्का, GT vs RCB सामन्यावेळी काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update : देशाला हुकुमशाहा सरकारची गरज नाही; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT