सप्तरंग

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - १८ मार्च २०२१

सकाळवृत्तसेवा

पंचांग -
गुरुवार : फाल्गुन शुद्ध ५, चंद्रनक्षत्र भरणी, चंद्रराशी मेष/वृषभ, चंद्रोदय सकाळी ९.४२, चंद्रास्त रात्री १०.५३, सूर्योदय ६.४१, सूर्यास्त ६.४३, भारतीय सौर फाल्गुन २७ शके १९४२.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
१५९४ : पराक्रमी वीरपुरुष शहाजीराजे भोसले यांचा जन्म. छत्रपती म्हणून त्यांनी राज्याभिषेक करवून घेतला नसला तरी त्यांनी जवळपास स्वतंत्र म्हणावे असे राज्य निर्माण केले होते. तत्कालीन राजकारणात शहाजहान बादशहाच्या बरोबरीने त्यांचा प्रभाव होता.
१९४४ : नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेने ब्रह्मदेशमार्गे प्रवेश करून ईशान्य सीमेवर ब्रिटिशांचा पाडाव करून तिरंगा फडकावला.
१९९६ : ज्येष्ठ गायक पं. जसराज आणि उपशास्त्रीय संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ गायिका गिरिजादेवी यांना ‘उस्ताद हफीज अली खाँ’ पुरस्कार प्रदान.
१९९९ : दूरदर्शनच्या क्रीडा वाहिनीचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते उद्‌घाटन. 
२००१ : ज्येष्ठ सरोदवादक अमजद अली खाँ यांना प्रतिष्ठित मानला जाणारा गंधर्व पुरस्कार, तर बंगाली अभिनेत्री सावित्री चटर्जी यांना अप्सरा पुरस्कार जाहीर.

दिनमान -
मेष :
आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. दैनंदिन कामात सुयश लाभेल.
वृषभ : अनपेक्षितपणे एखादा मोठा खर्च संभवतो. काहींची आध्यात्मिक प्रगती होईल.
मिथुन : महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. प्रियजनांचा सहवास लाभेल.
कर्क : नोकरीचे प्रश्‍न मार्गी लावू शकाल. महत्त्वाचे व्यवहार मार्गी लागतील.
सिंह : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.
कन्या : महत्त्वाची कामे शक्‍यतो पुढे ढकलावीत. प्रकृतीच्या तक्रारी जाणवतील.
तूळ : मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. वैवाहिक सौख्य लाभेल.
वृश्‍चिक : वाहने चालवताना दक्षता घ्यावी. खर्चाचे प्रमाण वाढेल.
धनू : अपेक्षित सहकार्य लाभेल. महत्त्वाच्या गाठीभेटी होतील.
मकर : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. नवीन परिचय होतील.
कुंभ : आरोग्य उत्तम राहील. प्रॉपर्टीचे व्यवहार विचारपूर्वक करावेत.
मीन : आर्थिक सुयश लाभेल. कौटुंबिक जीवनात आनंददायी घटना घडेल.

Edited By - Prashant Patil

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Israel Hamas War : रमजानमध्ये संदेशवाहक पाठवून युद्ध थांबले, इस्राईल-हमास युद्धावर पंतप्रधान मोदींचं मोठं वक्तव्य

Latest Marathi News Live Update : उद्या जर बिभव स्वतः आले नाहीत तर...स्वाती मालीवाल प्रकरणात महिला आयोग आक्रमक!

खासदारांच्या दिलदार मित्रानेच चंद्रहार पाटलांचा बळी दिला; विशाल पाटलांनी कोणावर केला गंभीर आरोप

Dry Day: मायानगरीचा विकेंड कोरडाच! मुंबई आणि परिसरात 3 दिवस ड्राय डे, काय आहे कारण?

नळातून किंवा शॉवरमधून पाणी येत नसेल तर घरच्या घरी 'असे' करा दुरुस्त

SCROLL FOR NEXT