file photo
file photo 
सप्तरंग

गर्भावस्थेतील मधुमेह : गैरसमज

dr. sunil gupta
नारदमुनी : गर्भावस्थेच्या मधुमेहाबद्दल बोलू या. डॉक्‍टर : गर्भावस्थेत राहणारी शुगर किंवा मधुमेह असलेल्या महिलांना होणारी गर्भावस्था या बद्दल लोकांच्या मनात खूप काही गैरसमज आहेत. Myth : 1 मधुमेही महिला व पुरूष लग्न करू शकत नाहीत. Fact : Type 1 किंवा Type 2 मधुमेह झाल्यावर लोकांचा गैरसमज असतो की ते लग्न करू शकत नाहीत. प्रत्येक मधुमेही लग्न करू शकतो व स्त्री-पुरुष संबंधित आपले सामाजिक, व्यक्तिगत व पारिवारिक कर्तव्य निभवू शकतो. Myth 2 : पत्नीला असलेला Type 1 किंवा Type 2 मधुमेह पतीला पण लागू शकतो. Fact : डायबिटीज हा संसर्गजन्य रोग नाही. एकमेकांशी लैंगिक संबंध ठेवल्याने मधुमेह होत नाही. Myth 3 : मधुमेही स्त्रीला Fertility चा Problem असतो. Fact : जर शुगर, रक्तदाब इतर हार्मोन व अवयव नॉर्मल राहिले तर गर्भ राहण्यास त्रास होत नाही. काही मुलींना युवावस्थेत Polycystic Ovarian Syndrome (PCOS) असेल तर Fertility चा प्रॉब्लेम होऊ शकतो आणि उपचार केल्याने गर्भ राहू शकतो. Myth 4 : मधुमेही युवतींना Sex चा प्रॉब्लेम असतो. Fact : जर शुगर नियंत्रित राहिली नाही, तर वारंवार Vaginal Infection व Vaginal Dryness होतो आणि Intercourse Painful होऊ शकतो तसेच Psychological Stress राहिल्याने कधी कधी Orgasm होत नाही. शुगर जर कंट्रोल राहिली तर हे प्रॉब्लेम होण्याची शक्‍यता कमी राहते. Myth 5 : मधुमेही युवती गर्भ ठेवू शकत नाही. Fact : Type 1 व Type 2 मधुमेही असलेल्या प्रत्येक युवतीला Pregnancy Plan करून ठेवायला पाहिजे. म्हणजे उपाशी पोटची शुगर 95 mg% व जेवणानंतरची 2 तासाची शुगर 120 mg% आणि Glycosylated Hemoglobin (HbA1C) 6% पेक्षा कमी ठेवून मग Preganancy ठेवायला पाहिजे. जर शुगर Conception च्या वेळी जास्त राहिली किंवा Preganancy साठी Contraindicated औषधं चालू राहिले तर बाळावर दुष्परिणाम होऊ शकतात. सुरुवातीच्या 8-10 आठवड्यांत बाळ पूर्णपणे तयार झालेले असतो. अशावेळी शुगर जास्त असली तर बाळाला विकृती किंवा अबॉर्शन व्हायची रिस्क राहते. म्हणून पहिले आपली शुगर कंट्रोल करून, Contraindicated औषधं बंद करून तज्ज्ञांकडून परवानगी घेऊनच गर्भ ठेवायला पाहिजे. Myth 6 : मधुमेही युवतीला गर्भ राहत नाही. राहिला तर वारंवार अबॉर्शन होते. Fact : अनियंत्रित मधुमेह असल्यावर Repeated Abortion चा धोका वाढतो. म्हणून Preconception Counselling, Preconception Glucose Control, Planned Pregnancy आणि गर्भावस्थेतील Contraindicated औषध बंद केली तर वारंवार Abortion चा धोका कमी होऊ शकतो. Myth 7 ः गर्भावस्थेत युरिन शुगर किंवा Random Clucose नॉर्मल असली तर पुढे कोणतीही तपासणी जरुरी नाही. Fact : ः Gestational Diabetes Mellitus (GDM) (गर्भावस्थेचा मधुमेह) सामान्यतः 20 आठवड्यांच्या Pregnancy नंतर होत असतो व Delivery नंतर संपतो. GDM चे Diagnosis Gluose Challenge Test नीच करायला हवं. म्हणजे 75 Gm पेक्षा जास्त राहिली, तर GDM चे निदान होते. प्रत्येक गर्भवती महिलेने पहिली तिमाही, दुसरी, तिमाही व तिसऱ्या तिमाहीमध्ये GCT टेस्ट करणे अत्यावश्‍यक आहे. भारत सरकारच्या याबद्दल Guidelines सुद्धा आलेल्या आहेत. Myth 8 : गर्भावस्थेत बाळाच्या तब्येतीसाठी गोड आणि High Calorie Diet जास्त प्रमाणात Dry Fruit, Fruit Juice इत्यादी खाणे जरुरी आहे. नाही तर बाळ कमजोर होते. Fact : गर्भावस्थेत मधुमेहींनी Dietician चा सल्ला घेऊन High Protein Diet घ्यायला पाहिजे. High Carbohydrate Diet नी शुगर वाढते. नॉर्मल संपूर्ण गर्भावस्थेत 8 ते 10 किलो वजन वाढायला पाहिजे. 2nd आणि 3rd Trimester मध्ये जास्तीचे 500 कॅलरीचे Diet घ्यायला हवेच. Myth 9 : गर्भावस्थेत इन्सुलिन घेतल्याने कधीच बंद होत नाही. त्याची सवय लागते. Fact : गर्भावस्थेत व त्याच्यानंतर स्तनपान करताना इन्सुलिन घेणे सर्वश्रेष्ठ मानले जाते. स्तनपान बंद केल्यानंतर पुन्हा मधुमेहाची गोळी सुरू करू शकतात. तसेच (GDM) ध्ये डिलिव्हरीनंतर इन्सुलिन बंद होते. कारण त्यांचा मधुमेह आता संपला असतो. Myth 10 : गर्भावस्थेत कोणतेही इन्सुलिन घेऊ शकतो. Fact : तज्ज्ञ डॉक्‍टरांचा सल्ला घेऊनच Regular Human Insulin NPD Insulin, Lispro, Aspart व Detemir इन्सुलिनचे शोध गर्भावस्थेत झालेले असल्याने ते सुरक्षित मानले जातात व Drug Authority तर्फे इतर इन्सुलिनपेक्षा जास्त सुरक्षित असल्याचे प्रमाणपत्र त्यांना आहे. Myth 11 : गर्भावस्थेतील मधुमेहात गोळ्या घेऊ शकतात. Fact : Metformin नावाची गोळी सोडून भारत सरकारच्या निर्देशाप्रमाणे इतर गोळी घेणं सुरक्षित नाही. अमेरिकेत Glibenclamide व Acarbose नावाची गोळी गर्भावस्थेत 24 आठवड्यांनंतर घेण्याची परवानगी आहे. Myth 12 : मधुमेही महिलांनी स्तनपान केल्याने बाळाला मधुमेह होऊ शकतो. Fact : स्तनपान केल्याने बाळ व आईला लठ्ठपणा, मधुमेह, हृदयरोग इत्यादींचा धोका कमी होतो. म्हणजे स्तनपानाचे फायदेच जास्त असतात. स्तनपान केल्याने बाळाला मधुमेह होत नाही. Myth 13 : आईला गर्भावस्थेत मधुमेह झाला की बाळाला पण मधुमेह होतो. Fact : लहान मुलांना Type 1 मधुमेह आईला GDM असल्याने होत नाही. परंतु युवावस्थेत मात्र त्यांना मधुमेह होऊ शकतो. Pregnancy च्या वेळी चांगली शुगर कंट्रोल व डिलिव्हरीनंतर जास्तीत जास्त दिवस स्तनपान केल्याने बाळांना युवावस्थेत होणारा मधुमेह, लठ्ठपणा इत्यादी टाळू शकतो. Myth 14 : गर्भावस्थेत इन्सुलिन घेतल्याने बाळावर त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात. Fact : गर्भावस्थेत इन्सुलिन घेणे पूर्णपणे सुरक्षित असते. तज्ज्ञांच्या सल्ल्याने उचित इन्सुलिन गोळ्या घेऊन शुगर नियंत्रित करणे गरजेचे आहे. अनियंत्रित शुगरमुळे गर्भावर दुष्परिणाम होऊ शकतात. इन्सुलिनमुळे नाही. नारदमुनी ः नारायण...नारायण... डॉक्‍टर साहेब. गर्भावस्थेतील मधुमेहाबद्दल इतके गैरसमज असू शकतात, अशी मी कधीच कल्पना केली नव्हती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Accident News: मुंबई आग्रा चांदवड मार्गावर भीषण अपघात; ६ ते ७ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी

Covishield बनवणाऱ्या कंपनीने ब्रिटिश कोर्टात मान्य केले लसीचे दुष्परिणाम! कोणते साईड एफेक्ट्स होतात जाणून घ्या

Loksabha Election 2024 : शांतीगिरी महाराजांमुळे तिढा वाढला ; नाशिकमध्ये शिवसेनेकडून अर्ज सादर केल्याचा दावा

Share Market Opening: शेअर बाजाराची वाढीसह सुरुवात; निफ्टी बँक पुन्हा नवीन विक्रमी उच्चांकावर

Latest Marathi News Live Update : बाणेर-पाषाण रोडवर ट्रॅफिक जाम.. वाहनांच्या रांगा

SCROLL FOR NEXT