bhavishya
bhavishya 
सप्तरंग

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 16 जानेवारी

सकाळ वृत्तसेवा

दिनांक : 16 जानेवारी 2020 : वार : गुरुवार 
आजचे दिनमान 

मेष : शुभ कामासाठी दिवस चांगला नाही. आरोग्याकडे लक्ष देण्याची आवश्‍यकता आहे. प्रॉपर्टीचे व्यवहार टाळावेत. नोकरीमध्ये समाधानकारक स्थिती राहील. 

वृषभ : शासकीय कामात यश लाभेल. बांधकाम क्षेत्रातील व्यक्‍तींना विशेष यश लाभेल. आर्थिक क्षेत्रातील निर्णय चांगले ठरतील. 

मिथुन : प्रॉपर्टीची कामे पुढे ढकलावीत. आरोग्य चांगले राहणार आहे. वैचारिक जीवनात अनुकूल परिवर्तन होईल. विद्यार्थ्यांना विशेष यश मिळेल. 

कर्क : प्रवासाचे योग येतील. नातेवाइकांचे विशेष सहकार्य लाभेल. खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. प्रॉपर्टीची कामे रेंगाळणार आहेत. 

सिंह : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. उधारी, उसनवारी वसूल होईल. मात्र व्यवसायात धाडस नको. आरोग्य बिघडण्याची शक्‍यता आहे. 

कन्या : व्यवसायाच्या प्रगतीच्या दृष्टीने चांगल्या गोष्टी घडतील. मुलामुलींच्या संदर्भात भाग्यकारक घटना घडेल. शुभ कामासाठी दिवस चांगला नाही. 

तूळ : व्यवसायात अडचणी जाणवतील. प्रवास शक्‍यतो टाळावेत. वस्तू गहाळ होण्याची शक्‍यता आहे. आर्थिक स्थिती चांगली राहणार आहे. 

वृश्‍चिक : महत्त्वाची कामे उरकून घ्यावीत. तुमची अडलेली कामे मार्गी लागणार आहेत. मित्रांचे सहकार्य लाभेल. एखादी चांगली बातमी समजणार आहे. 

धनू : कामामध्ये अडचणी जाणवतील. प्रवासात दक्षता हवी. वाहने चालवताना काळजी हवी. कर्ज प्रकरणे मंजूर होतील. पत्नीचा सल्ला लाभदायक ठरेल. 

मकर : महत्त्वाची कामे मार्गी लागणार आहेत. कौटुंबिक सौख्य लाभेल. शासकीय कामे पुढे ढकलावीत. वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्‍यता आहे. 

कुंभ : काहींना हितशत्रूंचा त्रास जाणवेल. वस्तू हरविण्याची किंवा गहाळ होण्याची शक्‍यता आहे. मुलामुलींकरिता जादा खर्च करावा लागेल. 

मीन : ग्रहमान आपल्या राशीला चांगले आहे. व्यवसाय वाढेल. नोकरीत चांगली स्थिती राहील. बौद्धिक व शैक्षणिक क्षेत्रात यश लाभेल. 

पंचांग 16 जानेवारी 2020 
गुरुवार : पौष कृष्ण 6, चंद्रनक्षत्र हस्त, चंद्रराशी कन्या, सूर्योदय 7.13, सूर्यास्त 6.18, चंद्रोदय रात्री 11.56, चंद्रास्त सकाळी 11.39, करिदिन, भारतीय सौर पौष 26, शके 1941. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Accident News: मुंबई आग्रा चांदवड मार्गावर भीषण अपघात; ६ ते ७ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी

Covishield बनवणाऱ्या कंपनीने ब्रिटिश कोर्टात मान्य केले लसीचे दुष्परिणाम! कोणते साईड एफेक्ट्स होतात जाणून घ्या

Loksabha Election 2024 : शांतीगिरी महाराजांमुळे तिढा वाढला ; नाशिकमध्ये शिवसेनेकडून अर्ज सादर केल्याचा दावा

Share Market Opening: शेअर बाजाराची वाढीसह सुरुवात; निफ्टी बँक पुन्हा नवीन विक्रमी उच्चांकावर

Latest Marathi News Live Update : बाणेर-पाषाण रोडवर ट्रॅफिक जाम.. वाहनांच्या रांगा

SCROLL FOR NEXT