dr subhash bhamare, Dada Bhuse, Sriram Patil, Karan Pawar, Shobha Bachhav, Gowal Padavi
dr subhash bhamare, Dada Bhuse, Sriram Patil, Karan Pawar, Shobha Bachhav, Gowal Padavi esakal
सप्तरंग

सह्याद्रीचा माथा : पक्षीय सहकार्याचा 'नाशिक-धुळे ट्विस्ट' !

लेखक : डॉ. राहुल रनाळकर

नाशिकमध्ये शिवसेनेचे (ठाकरे) उमेदवार राजाभाऊ वाजे प्रचाराला लागले आहेत. दुसरीकडे महायुतीतील उमेदवारी संदर्भात संदिग्धता अजून कायम आहे. धुळे लोकसभेसाठी महायुतीतील 'पक्षीय सहकार्य' नाशिकच्या उमेदवारीवर अवलंबून आहे.

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसाठी नाशिक न सुटल्यास डॉ. सुभाष भामरे यांना नाशिक जिल्ह्यातील तीन मतदार संघात सहकार्य न करण्यावर दादा भुसे यांचे समर्थक ठाम आहेत, ही धुळे-नाशिकमधील खरी मेख आहे. नाशिकचे पालकत्व दादा भुसे यांच्याकडे असल्यामुळे नाशिकची जागा खेचून आणणे त्यांच्यासाठी प्रतिष्ठेचे बनले आहे. (Lok sabha Election 2024) दिंडोरीत भाजपाच्या डॉ. भारती पवार आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे भास्कर भगरे यांच्यात सामना रंगेल. तर खानदेशातील चारही लोकसभा मतदारसंघांत उमेदवार निश्चित झाले आहेत. (saptarang marathi article on Khandesh ambiguity in Nashik lok sabha election 2024 marathi news)

नाशिकच्या उमेदवारीचा तिढा सुटण्यासाठी अजून किमान दोन दिवस वाट पाहावी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नाशिकमध्ये महायुतीकडून नेमका कोणता पक्ष आणि कोणता उमेदवार लढणार या संदर्भात चर्चांच्या फेऱ्या सुरु आहेत. या चर्चांचा केंद्रबिंदू ठाणे आणि मालेगाव आहे. नाशिकमध्ये उमेदवारीच्या संदर्भात खरा 'ट्विस्ट' अजून यायचा आहे.

महायुतीत तिन्ही पक्षांना चालणारा, सर्वसमावेशक, विकासाची दृष्टी असलेल्या नाशिक शहरातील उमेदवारावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. घोषित उमेदवार राजाभाऊ वाजे यांना सालस प्रतिमेतून आव्हान देणारा उमेदवार असावा, याकडे महायुतीचा कल आहे. लढत स्पष्ट नसल्याने वाजे यांच्या प्रचारात रंग अद्याप चढलेला नाही. महायुतीचा उमेदवार घोषित झाल्यानंतर प्रचाराची चुरस खऱ्या अर्थाने वाढेल. 

धुळ्यात सुभाष भामरे, शोभा बच्छाव यांच्यात लढत होणार असली तरी दोघांना पक्षांतर्गत नाराजीचा त्रास सोसावा लागत आहे. धुळ्यातून समर्थन मिळविणे शोभा बच्छाव यांच्यासाठी तर नाशिक जिल्ह्यातून पाठिंबा मिळविणे सुभाष भामरे यांच्यासाठी आव्हानात्मक आहे. नाशिक जिल्ह्यातील तिन्ही मतदार संघांसाठी राज्यातील हेविवेट मंत्री दादा भुसे भाजपाची पर्यायाने डॉ. सुभाष भामरे यांना कितपत साथ देतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. 

धुळ्यात शिंदेंची शिवसेना भाजपासाठी किती कार्यरत राहील, हे नाशिक कुणाला सुटते? यावर अवलंबून असल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे. डॉ. बच्छाव यांना नाशिक आणि धुळ्यातून काँग्रेसअंतर्गत विरोधाचा सामना करावा लागत आहे. धुळ्यात काँग्रेसने दिलेल्या पहिल्या महिला उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. (Latest Political News)

भाजपाच्या स्मिता वाघ आणि करण पवार ही लढत चांगलीच रंगतदार ठरणार आहे. जळगाव भाजपाचा पारंपरिक मतदार संघ असला तरी करण यांच्या रुपाने शिवसेना (ठाकरे) सध्या जळगावात जोर पकडू पाहतेय. विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांचे बळ करण पवार यांना मिळाले आहे. पाचोऱ्यात नेटवर्क असलेल्या डॉ. अस्मिता पाटील ठाकरे गटात आल्या आहेत.

अस्मिता यांच्यामुळे राजपूत समाजाचा तर धरणगावातील लकी टेलर यांच्यामुळे गुजर समाजाचे पाठबळ करण पवार यांना मिळू शकते. स्मिता वाघ अभाविपमध्ये विद्यार्थी दशेपासून असल्यामुळे संपूर्ण संघ परिवाराचे निर्विवाद पाठबळ त्यांना मिळेल. त्यामुळे जळगावातील लढतीकडे सगळ्यांच्या नजरा असतील. 

करण पवार यांच्या शिवसेना (ठाकरे) प्रवेशावेळी एक नोंद घेण्यासारखी घडामोड घडली. तेव्हा त्याची चर्चाही झाली, पण ती लगेच हवेत विरली. सुत्रांच्या माहितीनुसार पाचोरा भाजपाचे अमोल शिंदे आणि अमळनेर भाजपाचे माजी आमदार शिरीष चौधरीही शिवसेनेत प्रवेश करणार होते.

मात्र, दोघांनाही शिवसेनेकडून लगेचच विधानसभेसाठी शब्द देणे शक्य नसल्याचे सांगण्यात आल्याने ते माघारी परतले. दोघांनी संयुक्तपणे भाजपा सोडण्याचा इरादा नसल्याचेही स्पष्ट केले. पाचोऱ्यात वैशाली सूर्यवंशी यांच्यामुळे तर अमळनेरमध्ये ललिता पाटील यांच्यामुळे दोघांना शब्द देणे शक्य नसल्याचे शिवसेनेकडून (ठाकरे) सांगण्यात आले. वस्तुतः उन्मेष पाटील, करण पवार, अमोल शिंदे आणि शिरीष चौधरी ही जीवाभावाचे मित्र आहेत. या मैत्रीमुळे चौघे चर्चेत आले. 

रावेरमध्ये रक्षा खडसे यांच्यासमोर श्रीराम पाटील यांचे आव्हान असेल. रक्षा यांचे काम आणि नेटवर्क प्रस्थापित आहे. तर श्रीराम पाटील अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करुन भाजपामार्गे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत उमेदवारीसाठी डेरेदाखल झाले. राष्ट्रवादी शरद पवार पक्षातून इच्छुक असलेले भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी श्रीराम पाटील यांच्या उमेदवारीमुळे नाराज आहेत.

दुसरीकडे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामा सत्र सुरु केले आहे. त्यामुळे श्रीराम पाटील यांच्यासमोर आव्हानांचा डोंगर असेल. रक्षा खडसे यांची उमेदवारी दाखल करतेवेळी एकनाथ खडसे यांच्या भाजपा प्रवेशाची शक्यता आहे. गिरीश महाजन यांची उपस्थिती यावेळी असल्यास भाजपासाठी वातावरण निर्मिती होईल, श्रीराम पाटलांचे 'टेन्शन' वाढेल. श्रीराम पाटील यांची पुढची रणनीती कशी असेल, यावर रावेर लोकसभेतील समीकरणे अवलंबून असतील.  (Latest Political News)

नंदुरबारमध्ये डॉ. हिना गावित यांना पक्षांतर्गत विरोधक, महायुतीतील विरोधक आणि प्रत्यक्षातील विरोधक अशा तिघा घटकांचा सामना करावा लागत आहे. ही नाराजी गोवाल पाडवी यांच्यासाठी उपयुक्त आहे. नाराजीची तीव्रता वाढल्यास नंदुरबारमध्ये सत्तापालट शक्य आहे.

डॉ. विजय गावित यांच्या विरोधकांच्या संख्येत नजिकच्या काळात मोठी वाढ झाली आहे. के. सी. पाडवी आणि त्यांचे पुत्र गोवाल हे तुलनेने सौम्य असल्याने आदिवासी जिल्ह्यातील मतदारांचीच आता कसोटी लागेल. दिंडोरीत भारती पवार यांच्यापुढील अडचणीही वाढत आहेत.

माकपाचे जे. पी. गावित यांनी महाविकास आघाडीला पाठिंबा जाहीर केल्यामुळे भास्कर भगरे यांचे बळ वाढले आहे. संघ परिवार दिंडोरीतील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. नाशिकमधील अनिश्चितता अद्याप कायम असून महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे यांच्यासमोर महायुती उमेदवारासाठी अजूनही चाचपडत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election : प्रचाराचे वादळ थंडावले ; सातव्या टप्प्यासाठी उद्या मतदान

Kalyani Nagar Accident :भ्रष्ट चेल्यांनी बदलले तिघांचे रक्तनमुने ; ‘ससून’मधील डॉक्टरांची बनवाबनवी

Pune Accident : पुण्यात पुन्हा रॅश ड्रायव्हिंग ; बीआरटी मार्गात घुसवली मोटार

World No Tobacco Day 2024 : हृदय-फुफ्फुसांपासून ते कर्करोगापर्यंत, धूम्रपानामुळे ‘या’ गंभीर आजारांना मिळतेय आमंत्रण

World No Tobacco Day 2024: ‘तंबाखू’वर मात शक्य! हवा फक्त दृढनिश्चय; ‘आरोग्य’ विभागाकडून 2 वर्षात दीड लाखावर समुपदेशन

SCROLL FOR NEXT