Vijay Shivtare and Sunil Tatkare
Vijay Shivtare and Sunil Tatkare Sakal
सातारा

Karad News : अजितदादांवरील वक्तव्यांवरुन सुनिल तटकरेंनी शिवतारेंबद्दल थेट मुख्यमंत्र्यांकडेच केली तक्रार

हेमंत पवार

कऱ्हाड - विजय शिवतारे यांनी केलेल्या वक्तव्याचा मी निषेध, धिक्कार करतो. त्यासंदर्भात मी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोललो आहे. अशा वाचाळविरांवर कडक कारवाई केली पाहिजे अशी मागणी मी केल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी आज स्पष्ट केले.

जेष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या समाधिस्थळी अभिवादनासाठी खासदार तटकरे आज मंगळवारी कऱ्हाड (जि.सातारा) येथे आले होते. त्यादरम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सासवडच्या पालखी तळावरून ‘विजय शिवतारे, तू निवडून कसा येतो, तेच मी पाहतो,’ असे म्हंटले होते. तो शिवतारेंचा अपमान नव्हता, तर पुरंदरच्या स्वाभिमानी जनतेचा अपमान होता. आता त्याचा बदला घेण्याची वेळ आली आहे, असे थेट इशारा शिवसेना नेते तथा माजी मंत्री विजय शिवतारे यांनी अजितदादांना दिला आहे.

त्याचबरोबर शिवतारे यांनी अजित पवारांनी पालखीतळावर येऊन माफी मागावी, अशीही मागणी केली आहे. त्यांच्या वक्तव्यावर खासदार तटकरे म्हणाले, अजित पवार हे आमच्या पक्षाचे केंद्रीय अध्यक्ष आहेत. आम्ही महायुतीचा घटक पक्ष आहोत.

विजय शिवतारे यांनी केलेल्या वक्तव्याचा मी निषेध करतो, धिक्कार करतो. त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची गरज आहे. त्यासंदर्भात मी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोललो आहे. अशा वाचाळविरांवर कडक कारवाई केली पाहिजे अशी मागणी मी केली आहे.

आम्हाला जादा जागा मिळतील

महायुतीच्या जागा वाटपाबाबत अद्याप संभ्रमावस्था आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला किती जागा येणार हे गुलदस्त्यातच आहे. त्या प्रश्नावर सुनिल तटकरे यांनी जागा वाटपाचा काहीही तिढा नाही. आम्हाला सन्मानपूर्वक जागा मिळणार असून जी आकडेवारी आता माध्यमांसमोर येते त्यापेक्षा जादा जागा आम्हाला मिळतील असा विश्वास व्यक्त केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal : अमेरिका, कॅनडा अन् अरब देशांकडून 'आप'ला फंडिंग; ED कडून गृहमंत्रालयाला अहवाल

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE : मुंबईतील विले पार्ले येथील शाळेत बरोबर ६ वाजता मतदान बंद

Gadchiroli News : कधी वाघ, कधी हत्ती...सोसायचे किती? ग्रामस्थ भयछायेत; जंगलात तेंदूपाने संकलन करताना जीव मुठीत!

Ebrahim Raisi: इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या मृत्यूमुळं भारतात उद्या राष्ट्रीय दुखवटा जाहीर

Helmet Man : दागिने, घर, जमीन विकून हा व्यक्ती लोकांना फुकटात वाटतोय हेल्मेट,राघवेंद्रचे होतंय कौतूक

SCROLL FOR NEXT