Karad Inspection By Forensic Team Dog Squad esakal
सातारा

Karad Crime : कॉलेजच्या पाठीमागं सापडला सडलेला मानवी सांगाडा; राजमाचीत खळबळ, फॉरेन्सिक टिमकडून पाहणी

तो सांगाडा सडलेल्या स्थितीत असल्याने तो महिलेचा का पुरुषाचा हे स्पष्ट झाले नाही.

सकाळ डिजिटल टीम

सदरचा मृत्यू हा नैसर्गिक, आत्महत्या की घातपात आहे याचा उलगडा करण्याचा प्रयत्न व मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम पोलिस करत आहेत.

कऱ्हाड : राजमाची (ता. कऱ्हाड) येथील कॉलेजच्या पाठीमागे एका शिवारात काल सकाळी सडलेल्या स्थितीतील मानवी हाडांचा सांगाडा आढळला. त्याची माहिती पोलिस पाटील सतीश काशीद यांनी पोलिसांना (Karad Police) दिली. फॉरेन्सिक टिम व श्वान पथकाकडून घटनास्थळाची पाहणी करण्यात आली.

दरम्यान, तो सांगाडा सडलेल्या स्थितीत असल्याने तो महिलेचा का पुरुषाचा हे स्पष्ट झाले नाही. याबाबत माहिती अशी ः राजमाची येथे एका कॉलेजच्या पाठीमागे एका शिवारात सूरज पवार यांच्या उसाच्या शेतात काही महिला भांगलण करत होत्या. या वेळी त्यांना दुर्गंधी आल्याने त्यांनी शेताचे मालक सूरज पवार यांना त्याची माहिती दिली.

त्यावर सूरज पवार यांनी तेथे जाऊन पाहिले असता त्यांना कॉलेजच्या पाठीमागील डोंगराकडील बाजूस असलेल्या ओघळीच्या कडेला मानवी हाडांचा सांगाडा पडल्याचे दिसले. त्यांनी त्याची माहिती तत्काळ सरपंच शिवाजीराव डुबल व पोलिस पाटील सतीश काशीद यांना दिली. सतीश काशीद यांनी त्याची माहिती पोलिसांत दिली. माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक अमोल ठाकूर व वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली.

तेथील पाहणी केल्यानंतर पोलिस उपअधीक्षक ठाकूर म्हणाले, ‘‘घटनास्थळी केवळ मानवी हाडांचा सांगाडा आढळून आला आहे. प्राथमिक माहिती व पाहणीनुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. फॉरेन्सिक टिम व श्वान पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले आहे. सदरचा मृत्यू हा नैसर्गिक, आत्महत्या की घातपात आहे याचा उलगडा करण्याचा प्रयत्न व मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम पोलिस करत आहेत.’’ दरम्यान, या प्रकाराने खळबळ उडाली आहे.

...अशीही शक्यता

एक फिरस्ता मनोरुग्ण पंधरा दिवसांपूर्वी संबंधित सांगाडा सापडलेल्या परिसरात फिरत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. त्या वेळी काही शेतकऱ्यांनी संबंधित मनोरुग्णाला त्या परिसरातून हटकले होते. मात्र, तो मनोरुग्ण पुन्हा त्या परिसरात येत होता, असे तिथल्या काही शेतकऱ्यांनी सांगितले. त्यामुळे हा मृतदेह संबंधित मनोरुग्णाचा नाही ना, याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India CPI Inflation: देशात पुन्हा महागाईचा भडका! दुष्काळ अन् वाढत्या महागाईत ग्रामीण भागाची दुहेरी होरपळ

IND vs WI: विंडिजच्या दोन खेळाडूंवर ICC ची कारवाई; भारताविरुद्ध T20I मालिका सुरू असतानाच नेमकं काय घडलं?

Rahul Gandhi: राहुल गांधींचा मोठा दावा! म्हणाले, ''मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचे मला मेसेज येतात..''

Someshwar Sugar Factory Election Result : सोमेश्वर कारखान्याच्या निवडणूकीत सुनेत्रा पवार यांच्या पॅनेलची मुसंडी.... विजयाच्या दिशेने घौडदौड.....; पुरुषोत्तम जगताप यांना दारुण पराभव

Sri Lanka Politics: आधी मुलगा, आता पत्नी अडचणीत; महिंदा राजपक्षे ICU मध्ये, श्रीलंकेत सध्या काय घडतंय?

SCROLL FOR NEXT