सातारा

अवघ्या 20 मिनिटांत शिवारे जलमय; पाटण परिसरात ढगफुटीसदृश पाऊस

राजेश पाटील

ढेबेवाडी (जि. सातारा) : अधून-मधून पडणाऱ्या परतीच्या पावसाने कंबरडे मोडलेल्या महिंद (ता. पाटण) परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या उरल्या-सुरल्या आशेवर गुरुवारी सायंकाळी झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे पुन्हा पाणी फिरले. फक्त 20 मिनिटेच पडलेल्या धो-धो पावसाने हातातोंडाशी आलेले भात पीक भुईसपाट झाले असून, शेत ताली तुटल्याच्याही घटना घडल्या. 

काही दिवसांपूर्वी पावसामुळे नुकसान झालेल्या भात, भुईमूग व अन्य खरीप पिकांच्या पंचनाम्यांचे काम परिसरात सुरू असतानाच काल सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास महिंद परिसरात झालेल्या ढगफुटीसदृश पावसाने भात पीक जमीनदोस्त झाले. अवघी 20 मिनिटे जोराचा पाऊस झाला. मात्र, त्याने ओढे-नाले तुडूंब भरून वाहिले, काही ओढे व नाली पात्र बदलून शेतात घुसल्याने जबर नुकसान झाले. वांग नदीची पाणीपातळी तिपट्टीने वाढली. शेतातील दगडी ताली तुटल्या, रस्त्यांवरून दीड- दोन फुटांपर्यंत पाण्याचे लोट वाहू लागले. 

महिंद धरणाच्या काठावरील बोर्गेवाडीतील संभाजी बोरगे यांच्या घराचे छप्पर मोडून माळ्यावर कोसळले. तेथील रस्त्यालगतचा ओढा तुंबल्याने ये- जा ठप्प झाली होती. श्री बाळेश्वर मंदिरात पाणी घुसल्याने मोठ्या प्रमाणात गाळ साचला. सकाळी ग्रामस्थांनी साफसफाई करून परिसर स्वच्छ केल्याचे बळवंत बोरगे यांनी सांगितले. नुकसानीचे फेर पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी "देसाई' कारखान्याचे संचालक विकास गिरीगोसावी व शेतकऱ्यांनी केली आहे. याबाबत गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनाही माहिती दिली असून, त्यांनीही यंत्रणेला आवश्‍यक सूचना दिल्याचे त्यांनी सांगितले. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

क्रिकेट विश्वात उडाली मोठी खळबळ! T20 World Cupवर दहशतवादी हल्ल्याचे संकट, पाकिस्तानमधून आली धमकी

ED Raid Video : झारखंडमध्ये ईडीची मोठी कारवाई; अनेक ठिकाणांवर मारली रेड, नोटांचा डोंगर बघून अधिकारीसुद्धा चक्रावले

Share Market Today: शेअर बाजारात नफा कमावण्याची मोठी संधी; आज 'या' 10 शेअर्सवर ठेवा लक्ष

Latest Marathi News Update : मतदान केंद्रावर मतदारांचे होणार फूल देऊन स्वागत; टक्केवारी वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाचा निर्णय

Nashik Crime News : बँकेच्या सेफ्टी लॉकरमधील 5 कोटींचे दागिन्यांवर डल्ला! घरफोडीचा गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT